वसंतराव नाईक कर्ज योजना | मिळवा १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज…| Vasantrao Naik Karj Yojana | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना | मिळवा १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज…| Vasantrao Naik Karj Yojana | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना –

     आपल्या राज्यांमधील बहुतांश लोक सुशिक्षित असले तरीसुद्धा प्रत्येकाकडे नोकरी उपलब्ध असेलच असे नाही म्हणून काही लोक व्यवसाय करू इच्छितात परंतु व्यवसायासाठी कर्ज किंवा पैसे नेमके कोणाकडून घ्यायचे, त्याची परतफेड कशी करायची यांसारखे असंख्य प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतात आणि त्यामुळे बरेच लोक बेरोजगार बनतात. परंतु वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज 

मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे तर जाणून घेऊयात हे कर्ज नेमके कोणाला मिळू शकते, वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात, पात्रता काय ,अर्ज कसा करायचा…

चला तर सुरू करूयात…

वसंतराव नाईक कर्ज योजना | Vasantrao Naik Karj Yojana –

– महाराष्ट्र राज्यामधील भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास वर्गामधील नागरिकांना त्यांचा आर्थिक विकास करता यावा या दृष्टीने वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना सुरू करण्यात आली.

– व्यवसाय करून इच्छिणाऱ्या भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास वर्गामधील नागरिकांना वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळू शकते.

– जेव्हा ही योजना सुरू झाली त्यावेळी ही कर्जाची रक्कम पंचवीस हजार रुपये होती परंतु कालांतराने ही रक्कम एक लाख रुपये इतकी करण्यात आली.

– या योजनेअंतर्गत 35 ते 40 व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

– या योजनेमुळे बऱ्याच लोकांना आत्मनिर्भर बनण्यामध्ये मदत होईल त्याचबरोबर त्यांचा आर्थिक विकास सुद्धा होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतील.

– या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे करण्यात आलेली आहे.

– जे लाभार्थी नियमितपणे कर्जफेड करतील त्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. जर लाभार्थ्यांनी कर्ज वेळेमध्ये भरले तर व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

– वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एक लाखांपैकी पहिला हप्ता 75 हजार रुपये इतका दिला जाईल तर दुसरा हप्ता 25 हजार रुपये प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार उपलब्ध करून दिला जाईल.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य | Preference given under Vasantrao Naik Loan Scheme –

– विधवा महिला

– निराधार व्यक्ती

– ज्या अनुभवी तरुण मुले/मुली यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत केली जाणारी कर्जवसुली | Loan recovery under Vasantrao Naik Loan Scheme –

– कर्ज वितरित केल्यानंतर कर्जाची परतफेड 90 दिवसानंतर सुरू करण्यात येते तर कर्जाच्या परतफेडीच्या रकमेइतके पुढील तारखेचे आगाऊ धनादेश घेण्यात येतात.

– लाभार्थ्यांना मुद्दल 2085/- रुपये नियमित 48 महिने परतफेड करावे लागणार आहेत.

– जे लाभार्थी नियमित कर्जाची परतफेड करू शकणार नाही त्यांचे कर्जाचे जेवढे हप्ते थकीत होतील त्यावर दसादशे चार टक्के इतके व्याज आकारण्यात येईल.

– लाभार्थी कर्जाचे हप्ते भरू शकले नाही तर अशावेळी महामंडळाकडे ठेवलेल्या तारण तसेच जामीनदारांद्वारे ही कर्जाची वसुली केली जाईल.

वसंतराव नाईक कर्ज योजनेची पात्रता,नियम व अटी | Eligibility, terms and conditions of Vasantrao Naik loan scheme –

– अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– अर्जदार हे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावेत.

– अर्जदाराची वयोमर्यादा 18 वर्ष ते 55 वर्षे दरम्यान आहे.

– अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असू नये.

– काही चुकीचा व्यवसाय म्हणजेच गैरकानूनी व्यवसाय केला तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल आणि त्या व्यक्तीला दिलेला लाभ सुद्धा वसूल करण्यात येईल.

– कुठल्याही बँकेची किंवा वित्तीय संस्थेची थकबाकी अर्जदाराकडे नसावी.

– किमान उद्योग सुरू केल्याचे दोन फोटो लाभार्थ्याने ऑनलाइन पोर्टल वर अपलोड करणे गरजेचे आहे.

– या किंवा इतर महामंडळांमधील इतर कोणत्याही योजनेचा लाभ अर्जदाराने घेतलेला नसावा.

– एका कुटुंबामधून एका व्यक्तीलाच या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.

– लाभार्थी जो काही व्यवसाय सुरू करेल त्या व्यवसायाचा विमा लाभार्थ्यांनी स्वतःच्या खर्चाने उतरवणे आवश्यक आहे आणि त्या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे सुद्धा बंधनकारक राहील.

वसंतराव नाईक कर्ज योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे | Required documents for Vasantrao Naik Loan Yojana –

– रहिवाशी दाखला

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– प्रतिज्ञा पत्र

– पॅन कार्ड

– वीज बिल

– जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)

– उत्पनाचा दाखला

– पासपोर्ट साईज फोटो

– डोमेसाइल सर्टिफिकेट

– जातीचा दाखला

– मोबाईल नंबर

– व्यवसाय सुरु करणार त्याचे कोटेशन

– बँक डिटेल्स 

वसंतराव नाईक विकास महामंडळ अर्ज | Vasantrao Naik Scheme Application –

ऑनलाईन अर्ज –

– अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जा.

– होम पेजवर “नोंदणी” या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

अशा रीतीने ऑनलाइन अर्ज करता येतो.

ऑफलाईन अर्ज –

– ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जिल्हा कार्यालयामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जावे लागेल आणि तेथून वसंतराव नाईक कर्ज योजनेचा अर्ज मिळेल.

– अर्जामधील माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत आणि तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करावा.

अशा रीतीने ऑफलाईन अर्ज करता येतो.

वसंतराव नाईक योजना संपर्क क्रमांक:

022-2620 2588

022-2620 2588

वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत पुढील व्यवसाय सुरू करता येऊ शकतात :

– कृषी क्लिनिक

– मत्स्य व्यवसाय

– संगणक प्रशिक्षण

– पॉवर टिलर

– हार्डवेअर व पेंट शॉप

– सायबर कॅफे

– चहा विक्री केंद्र

– सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र

– मसाला उद्योग

– झेरॉक्स

– सलुन

– स्टेशनरी

– मासळी विक्री

– आईस्क्रिम पार्लर

– भाजीपाला विक्री

– ब्युटी पार्लर

– मसाला मिर्ची कांडप उद्योग

– वडापाव विक्री केंद्र

– भाजी विक्री केंद्र

– ऑटोरिक्षा

– डी. टी. पी. वर्क

– स्विट मार्ट

– ड्राय क्लिनिंग सेंटर

– हॉटेल

– टायपिंग इन्स्टीटयुट

– ऑटो रिपेअरींग वर्कशॉप

– मोबाईल रिपेअरिंग

– गॅरेज

– फ्रिज दुरूस्ती

– ए. सी. दुरुस्ती

– चिकन/मटन शॉप

– इलेक्ट्रिकल शॉप

– फळ विक्री

– पापड उद्योग

– किराणा दुकान

– आठवडी बाजारामध्ये दुकान

– टेलिफोन बुथ 

– इतर लघु उद्योग

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment