विहीर अनुदान योजना | Vihir Anudan Yojana | मागेल त्याला विहीर योजना –
पैशाने अभावी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदता येणे शक्य होत नाही आणि त्यामुळे शेती करणे सुद्धा या शेतकऱ्यांना कठीण होऊन जाते आणि पाण्याचा मोठा प्रश्न सुद्धा उद्भवतो. म्हणूनच विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यांमधील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. चला तर जाणून घेऊयात विहीर अनुदान योजनेबद्दल अधिक माहिती…
विहीर अनुदान योजना | Vihir Anudan Yojana –
– विहीर अनुदान योजना राज्यांमधील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना पाणी मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे.
– या योजनेमुळे राज्यांमधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यामध्ये मदत होईल.
– शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यामध्ये सुद्धा या योजनेमुळे हातभार लागू शकतो.
– विहीर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता करावी लागणार नाही त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी इतर कोणाकडे पैशांसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.
– शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक राशी डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
विहीर अनुदान योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान –
– शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी विहीर अनुदान योजना अंतर्गत चार लाखांचे आर्थिक सहाय्य केले जाईल.