Web Developer Business in Marathi | Business Idea in 2022 in marathi

वेब डेव्हलपर बिसनेस

1.Introduction

मित्रांनो लॉकडाऊन नंतर जवळ जवळ सगळे बिसनेस ऑनलाईन आले आहेत. तुम्ही भाजीची लॉरी जरी पाहिली तरी तिथे यु.पी.आय.(U.P.I.) ने पैसे द्यायचं Q.R.Code भेटतो. आणि या डिजिटलाइझेशनला शासन सुद्धा डिजिटल इंडियाच्या माध्यामतून पुढे आणत आहे.आणि याचं फायदा घेऊन आपण आपला व्यवसाय सुरु करू शकतो. आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही कोडींग स्किलची आवश्यकता नाही. फक्त एक साचा तयार असेल त्याला drag and drop करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.

Advertisement

 

2.बिसनेस विषयी सविस्तर माहिती

आपण ज्या परिसरात राहतात त्याच्या आजूबाजू अनेक वेगवेगळे दुकान असतात. आणि त्या दुकानासाठी त्यांना एका वेबसाईटची गरज असते. कारण एक वेबसाईट त्यांच दुकान असेल ब्रांड असेल ते प्रेसेंट करते किंवा अशी वेबसाईट जी त्यांच्या दुकानातील वस्तू लोकांच्या घरापर्यंत पोहोचवू शकते आणि ते order जेथून येतील त्याला लागेल एक वेबसाईट म्हणून लोकांना गरज असते पण त्यांना असे वाटते कि, वेबसाईट बनविण्यासाठी 30-40 हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे ते वेबसाईट बनविण्याकडे दुर्लक्ष करतात. पण आपण ज्या पद्धतीने त्यांना वेबसाईट बनवून देऊ तर त्याचा खर्च खूप कमी असेल. त्यासाठी त्यांच्यापर्यंत आपण जाऊन त्यांना आपल्या सर्विस बद्दल सांगून कन्व्हेन्स करायचे आहे.

 

 

3.सर्विस देण्याबद्दल माहिती

आपण जी वेबसाईट क्लायंटला बनवून देणार आहोत. ती एक  wordpress वेबसाईट आहे. तिचे खूप सारे templates आधीपासूनच तयार असतात.आपल्याला लागणारी theme install करून drag आणि drop आपल्याला पाहिजे तशी वेबसाईट बनवू शकतो. wordpress एक फ्री ओपन सोर्स platform आहे. पण जसे आपण घरात राहतो तसेच वेबसाईटला जर या इंटरनेटच्या जगात प्रेसेंट करायचे असेल तर त्यासाठी वेबसाईटला पण एक घरासारखी जागा म्हणजेच होस्टिंग घ्यावी. लागते. आणि त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जसा एखाद्या घराचा पत्ता असतो. तस वेबसाईट पर्यंत जाण्यासठी domain असत. ज्यामाध्यामतून आपण वेबसाईटला भेट देऊ शकतो.

 

तर domain आणि होस्टिंग हे वर्षाच्या प्लॅननुसार विकत घ्यावे लागतात. आणि domain, होस्टिंग यासाठी साधारणतः 3 ते 5 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे आपल्याला क्लायंट जे सांगेल त्यानुसार custome वेबसाईट design करून देऊ  शकतो. तुम्हाला  5 हजार जरी खर्च एका वेबसाईटला बनविण्यासाठी आला तरी तुम्ही 8 हजार रुपयामध्ये एक वेबसाईट बनवून देऊ शकतात. तरीही सुरुवातील 3 हजार रुपये प्रॉफीट मार्जिन एका वेबसाईट मागे मिळेल. आणि तुम्ही पूर्ण तुमच्या शहरातून एका महिन्यात 5जरी वेबसाईट तयार केल्यात तरी तुम्हाला 15 हजार रुपये प्रति/महिना एवढा मार्जिन मिळेल. आणि तुमच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला तर तुम्ही चांगल्या level वर जाऊन पुढे अजून व्यवसाय वाढवू शकतात. आणि येथील अनुभवावर तुम्ही घरीबसून freelancing सुद्धा करू शकतात. freelancing मध्ये WordPress Developer डिमांड वाढली आहे. कारण जगातील 30% वेबसाईट म्हणजेच 75 मिलीयन एवढे वेबसाईट wordpress वर बनविण्यात आल्या आहेट.  त्यामुळे ते सुद्धा तुमच्यासाठी संधीचे साधन बनू शकते.

 

4.आम्हाला wordpress येत नाही तर आम्ही कसे शिकावे.

तुम्हाला wordpress मधून  वेबसाईट बनवता येत नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फ्री मध्ये wordpress शिकू शकतात. फक्त 6 तासांचा संपूर्ण कोर्स आहे. जास्त करून असे डिमांडेबल कोर्स इंग्रजीमध्ये असतात. पण काही लोकांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्यामुळे जो कोर्स तुम्हाला आम्ही दिला आहे तो हिंदी भाषेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने सगळ शिकवल आहे.

 

 

कोर्सची लिंक – http://bit.ly/3vzluJW

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment