What’s app selling | आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस व्हाट्सअप वर सेल कसे करावे ? | BEST product/services selling methods 2024 –

What’s app selling | आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस व्हाट्सअप वर सेल कसे करावे ? | BEST product/services selling methods 2024 –

    आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस सेल करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत परंतु हल्ली जास्त ट्रेडींगला असलेली पद्धत म्हणजे व्हाट्सअप सेलिंग ( What’s app selling). याबद्दल अजूनही बऱ्याच सेलर्सला जास्त माहिती नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत…

What’s app selling | आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस व्हाट्सअप वर सेल कसे करावे ?

What's app selling

– आपले व्हाट्सअप अकाउंट फेसबुक मेटामार्फत व्हेरिफाइड किंवा अपलोड करून त्यानंतर आपण ग्राहकांना मेसेजेस करू शकतो. 

– एका मेसेज साठी चार्जेस ०.८५ -२ रुपयांपर्यंत असू शकतात. हे चार्जेस लोकेशन तसेच इतर काही फॅक्टर्स वर अवलंबून असतात. 

– 89 टक्के लोक व्हाट्सअप बघतात तर फक्त 4% टक्के लोक जीमेल बघतात त्यामुळे व्हाट्सअप वर सेलिंग करण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. 

स्टेप्स | steps for what’s app selling –

१. सेल्स कॉन्टेन्ट तयार करा –

– ज्यावेळी आपण व्हाट्सअप मार्केटिंग किंवा व्हाट्सअप सेलिंग करण्याचा निर्णय घेतो त्यावेळी आपल्याकडे आपल्या प्रॉडक्टचे किंवा सर्व्हिसेसचे सर्व कंटेंट तयार असणे आवश्यक आहे. 

– या कंटेंटमध्ये फाइल्स, इमेजेस, videos, फोटोग्राफी, पीडीएफ तसेच कॅटलॉग आणि FAQ – यामध्ये डिस्काउंट किंवा ऑफर तसेच इतर काही प्रश्न जे ग्राहक विचारू शकतात अशा प्रश्नांचा समावेश असू शकतो.

– ज्यावेळी आपल्याकडे आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस बद्दल हे सर्व कंटेंट तयार असतं त्यावेळी ग्राहकाला आपला व्यवसाय समजावण्यामध्ये कमी वेळ जातो आणि ऑर्डर मिळण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. 

२. व्हाट्सअप स्टोअर तयार करा –

– आपल्याकडे असणारे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस यांचे व्हाट्सअप स्टोअर तयार करा जेणेकरून ग्राहकांना आपल्याकडील सर्व प्रॉडक्ट बद्दल माहिती मिळेल आणि जो प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ग्राहकांना आवडतील त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना तो प्रॉडक्ट खरेदी करता येईल. 

– व्हाट्सअप स्टोअर तयार केल्यानंतर त्या ठिकाणी ” बाय ऑन व्हाट्सअप” घेऊ शकतो. 

– पूर्वी किंवा अजूनही काही लोक इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा युट्युब या मार्फत ग्राहकांना त्यांच्या वेबसाईटवर घेऊन जातात परंतु आता वेबसाईटवरून ग्राहक व्हाट्सअप वर जोडले जातात त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्याकडून जास्तीत जास्त ऑर्डर मिळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. 

३. न्युज पेपर, फेसबुक तसेच इंस्टाग्राम यावर जाहिरात तयार करणे –

– हल्ली न्युज पेपर मध्ये आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेसची माहिती कमी शब्दांमध्ये देऊन त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटचा क्यूआर कोड दिला जातो. 

– वेबसाईटचा क्यूआर कोड दिल्यामुळे ग्राहक तो क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या वेबसाईट पर्यंत पोहोचतात आणि आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल ग्राहकांना पूर्ण माहिती मिळते. 

– हा क्यू आर कोड गुगल वरून ” क्यू आर कोड जनरेटर” या मार्फत तयार केला जाऊ शकतो. 

– तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुद्धा आपल्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल आकर्षक अशी जाहिरात तयार करणे.

४. चाट बोट –

–  ग्राहकांना जे काही प्रश्न असतात किंवा जे बेसिक कॉन्व्हर्सेशन असतात ते व्हाट्सअप बिजनेस एपीआय मार्फत सेट केले जाऊ शकतात. 

– असे केल्यामुळे मॅन्युअली जो वेळ जातो तो कमी लागेल आणि या मार्फत ऑटोमॅटिकली ग्राहकांचे प्रश्न हाताळले जातील आणि जास्तीत जास्त ग्राहकांशी संपर्क केला जाईल. 

– यासाठी आपल्याकडे जीएसटी नंबर आणि वेबसाईट असणे आवश्यक आहे व रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 

५. ऑटोमेशन –

– ही स्टेप सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची ऑटोमॅटिक उत्तरे तर दिली जातात त्याचबरोबर काही ऑफर किंवा सेल असतील तर त्याबद्दल ग्राहकांनी विचारल्यानंतर तशा प्रकारचे प्रश्न सुद्धा समाविष्ट करू शकतो. 

– अशा कंपन्या असतात की ज्यांच्या नावापुढे टिकमार्क येते अशा कंपन्या काही ऑफर्स किंवा सेल असल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर मेसेज करतात. उदाहरणार्थ ॲमेझॉन, अजीओ…

         आता आपल्याकडे ज्यावेळी ग्राहक ऑर्डर करतात त्यावेळी अशा ग्राहकांचे वेगवेगळे ग्रुप्स आपण तयार करून ठेवू शकतो आणि काही खास ऑफर्स किंवा सेल असल्यावर त्यांना सांगू शकतो असे केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर मिळण्याची शक्यता असते. 

व्हाट्सअप सेलिंग या पद्धतीमुळे ग्राहकांचा डेटाबेस आपल्याकडे तयार होतो आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त ऑर्डर मिळवू शकतो.

      अशाप्रकारे व्हाट्सअप सेलिंग ( what’s app selling) ही नवीन पद्धत असली तरी खूपच परिणामकारक पद्धत आहे असे म्हणता येईल आणि आपला व्यवसाय वाढवण्यामध्ये व्हाट्सअप सेलिंग ( what’s app selling) ही पद्धत मदत करू शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment