श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 

श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana  –

     प्रत्येकाचे आई-वडील त्यांचे बाळ लहान असल्यापासून ते अगदी कितीही मोठे झाले तरीसुद्धा सतत त्यांची काळजी घेत असतात परंतु हेच लहान मुलं किंवा मुली मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांप्रती आपले असणारे कर्तव्य विसरतात आणि काहीतरी कारणे देऊन त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देतात. मग अशावेळी ज्यांची मुलं बाळ त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा वृद्ध लोकांसाठी सरकारने श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. त्या योजनेचीच माहिती आज आपण बघणार आहे…

Advertisement

श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana  –

श्रावण बाळ योजना ही योजना दोन श्रेणीमध्ये विभागण्यात आलेली आहे ते पुढीलप्रमाणे

१ . श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ 

२ . श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट ब 

. श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट :

या योजनेअंतर्गत ज्यांचे वय ६५ वर्ष आहे त्यांना व ६५ वर्षावरील लोकांना तसेच दारिद्र्यरेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीमध्ये ज्या निराधार नागरिकांचे नाव आहे ,अशा नागरिकांना प्रति महिना चारशे रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल तर केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे प्रति महीना दोनशे रुपये असे निवृत्तीवेतन देण्यात येईल म्हणजेच एकूण सहाशे रुपये प्रति महिना निवृत्त वेतन मिळेल.

. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट :

ही योजना अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये नाही परंतु जे लोक खरोखरच गरजू आहेत. ज्या नागरिकांच्या कुटुंबांचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत आहे व ज्या नागरिकांचे वय ६५ व ६५ वर्षाच्या वरती आहे अशा नागरिकांना सहाशे रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Shravan Bal Yojana –

१ . दारिद्र्यरेषेखाली त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे नाव समाविष्ट असल्याचा अधिकृत असा पुरावा

२ . वयाचा दाखला :

३ . रहिवासी दाखला

नायब तहसीलदार किंवा तहसीलदार ,ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी दाखला

श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज | How to apply for Shravan Bal Yojana –

श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो त्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज व्यवस्थित भरावा. 

महाराष्ट्र आपले सरकार पोर्टल : येथे क्लिक करा

श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

श्रावण बाळ योजना फॉर्म पी डी एफ : येथे क्लिक करा

नवीन नोंदणी : येथे क्लिक करा

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version