महिला सन्मान बचत पत्र योजना २०२३ | Mahila Samman Bachat Patra Yojana 2023 |Mahila Samman Saving Certificate Scheme

महिला सन्मान बचत पत्र योजना २०२३ | Mahila Samman Bachat Patra Yojana 2023 |Mahila Samman Saving Certificate Scheme

      आपल्या भारत सरकार तर्फे वेळोवेळी विविध सरकारी योजना राबवल्या जात असतात आणि त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा काही योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना भारत सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली ती योजना म्हणजे महिला

Advertisement
सन्मान बचत पत्र योजना.या योजनेबद्दलच अधिक माहिती आपण बघणार आहोत…

महिला सन्मान बचत पत्र योजना २०२३ | Mahila Samman Bachat Patra Yojana 2023 –

  • संसदेमध्ये १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ – २४ सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्याची घोषणा केली.
  • ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेबद्दल ची घोषणा केली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सर्व सदस्यांनी टेबलवर हात मारून आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली.
  • महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू झाल्यामुळे मुली तसेच महिलांना बचत करण्याची मोठी संधी चालून आली असून जर योग्य त्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच या योजनेचा फायदा अधिक प्रमाणामध्ये होईल कारण या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर चांगले व्याज  प्राप्त होणार आहे.
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक मुलींच्या किंवा महिलांच्या नावावर केली जाऊ शकते आणि या गुंतवणुकीवर . % इतके व्याज मिळणार आहे.
  • महिलांना सक्षम बनवण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • मार्च २०२५ पर्यंत, भारत सरकारने सुरू केलेली महिला सन्मान बचत पत्र योजना लागू असणार आहे.
  • अगदी कुठल्याही वयोगटातील मुली तसेच महिला या महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे | Benefits of Mahila Samman Bachat Patra Yojana :

  • महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिलांना अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार असून महिला तसेच मुलींना बचत करण्यामध्ये नक्कीच या योजनेमुळे हातभार लागणार आहे.
  • तसेच महिला सन्मान बचत पत्र योजनेमुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना करा मध्ये सूट मिळू शकते.
  • तसेच जर समजा महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाख रुपये दोन वर्षांसाठी गुंतवले तर त्यावेळी ७.५ % व्याजदराने पहिल्या वर्षी मूळ रकमेवर १५,०००/-  रुपये मिळतील आणि दुसर्‍या वर्षी, तुम्हाला १६,१२५/- रुपये मिळतील.
  • म्हणजेच दोन वर्षांच्या नंतर एकूण ३१,१२५ व्याज मिळेल म्हणजेच एकूण रक्कम २,३१,१२५ रुपये इतकी मिळेल.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी पात्रता | Eligibility for Mahila Samman Bachat Patra Yojana –

  • महिला सन्मान बचत पत्र योजना ही फक्त भारत देशामधील मुली आणि महिलांसाठीच असणार आहे.
  • अगदी कोणत्याही वयोगटातील मुली किंवा महिला ” महिला सन्मान बचत पत्र योजने”अंतर्गत खाते उघडू शकतात.
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी महिला ही भारताची रहिवासी असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

Documents required for Mahila Samman Bachat Patra Yojana :

✓ पासपोर्ट फोटो

✓ अर्जदाराचे आधार कार्ड

✓ शिधापत्रिका

✓ मतदार ओळखपत्र

✓ जात प्रमाणपत्र

✓ पत्त्याचा पुरावा

✓ उत्पन्न प्रमाणपत्र

✓ मोबाईल नंबर

✓ ईमेल आयडी

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी अर्ज  | How to apply for Mahila Samman Bachat Patra Yojana ?

  • नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी चा फॉर्म मिळवा.
  • त्यानंतर अर्ज व्यवस्थित रित्या भरा आणि त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर जी काही गुंतवणूक आपल्याला करायची आहे ती गुंतवणूक करून , गुंतवणूक केल्याचा पुरावा मिळवा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version