५ असे व्यवसाय की ज्यासाठी शिक्षणाची अट नाही…| 5 BUSINESS IDEAS –

  ” शिक्षण हे नक्कीच महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे.” परंतू काही जणांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येतेच असे नाही आणि त्यांच्यासाठी या बिझनेस आयडिया नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. कमी शिक्षण असणाऱ्या व्यक्तींना जर काही बिझनेस सुरू करायचा असेल तर या बिझनेस आयडिया नक्की कामी येऊ शकतात. व्यवसायामध्ये शिक्षणाची अट जरी नसली तरी आपल्याकडे योग्य ते कौशल्य असणे नक्कीच गरजेचे आहे.

१ . कार वॉशिंग सेंटर –

हल्ली जवळपास घरोघरी चार चाकी गाडी असते परंतु सध्याच्या धावपळीच्या जगात गाडी घरी व्यवस्थितरीत्या साफ करणे शक्य नसते आणि म्हणूनच बरेच जण गाडी क्लीन करण्यासाठी बाहेर देतात. अशाप्रकारे हा व्यवसाय गरजेचा आहे त्यामुळे कार वॉशिंग सेंटर सुरू करणे हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो आणि या व्यवसायासाठी शिक्षणाची सुद्धा काही अट नाही.

२ . चहाचे दुकान –

आपल्या भारतीयांचे सर्वात जास्त पिले जाणारे पेय म्हणजे चहा. चहा घेतल्याशिवाय बऱ्याच जणांचा दिवस सुरू होत नाही तसेच कामाच्या गडबडीमध्ये ,काम करत असताना काही लोकांना तर दिवसातून दोन ते तीन वेळा चहा लागतो आणि म्हणूनच जर चहाचे दुकान सुरू केले तर फायदेशीर ठरू शकते. फक्त गरज आहे ती चहाचे दुकान नेमकी कुठे सुरू केले पाहिजे हे ठरवण्याची… चहाचे दुकान ज्या ठिकाणी गर्दी असते, कॉलेजच्या ठिकाणी, बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन, विविध कंपन्याजवळ अशा ठिकाणी सुरू केली तर चांगला व्यवसाय होऊ शकतो.

३ . भाजीपाल्याचा व्यवसाय –

भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा कुठल्याही शिक्षणाची अट नसते. जर तुमच्याकडे शेती असेल तर मात्र हा व्यवसाय अगदी सहज सुरू केला जाऊ शकतो परंतु जर तुमच्याकडे शेती नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांकडून होलसेल दराने भाजीपाला खरेदी करून योग्य त्या दराने ग्राहकांना विकू शकता आणि चांगला व्यवसाय करू शकता.

४ . कपड्याचे दुकान –

जर तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असेल तसेच कपड्यांबाबत जास्त जानकारी असेल तर नक्की कपड्यांचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी छोट्या मुला मुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचेच कपडे तुम्हाला ठेवता येऊ शकतात हा निर्णय तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे तुमच्या दुकानांमध्ये ठेवायचे आहेत.

परंतु हे मात्र नक्की की आपल्या कपड्यांची कॉलिटी आणि दर योग्य असेल तर ग्राहक हे नक्की आपल्या दुकानांमध्ये येतात.

५ . दुग्ध व्यवसाय –

दुग्ध व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आणि गरजेचा असा व्यवसाय आहे कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दूध, दुग्धजन्य पदार्थ हे लागत असतात. त्यामुळे गाव असो वा शहर सगळीकडेच हा व्यवसाय उत्तमरीत्या चालू शकतो. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे गाई – म्हशी असतील तर उत्तमच परंतु जर तसे नसेल तर तुम्ही विविध शेतकऱ्यांकडून दूध जमा करून नंतर त्याची विक्री करून नफा मिळवू शकता.

अशाप्रकारे बरेचसे असे व्यवसाय आहेत की ज्यांना शिक्षणाची अट नाही. शिक्षणाची अट जरी नसली तरी आपल्याकडे योग्य ती कौशल्य असणे तसेच मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment