इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना | Indira Gandhi Apang pension Yojana | Indira Gandhi Disability Pension Scheme

     भारत सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. आज आपण अशीच एक योजना ”  इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना ” या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेमार्फत अपंग व्यक्तींना काही आर्थिक सहाय्य केले जाते. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना – 

– इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आधार देणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे असे आहे.

– अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे त्यांना स्वावलंबी बनण्यामध्ये मदत होईल तसेच इतर लोकांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार नाही.

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे फायदे | Benefits of Indira Gandhi disability pension scheme –

– या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना दरमहा १५०० रुपये इतके आर्थिक सहाय्य केले जाते.

– या योजनेमुळे अपंग व्यक्तींना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये मदत होऊ शकते.

– तसेच अपंग व्यक्तींना इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागणार नाही.

– अपंग व्यक्तींच्या आयुष्यासाठी थोडासा का होईना हातभार लागेल.

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी पात्रता | Eligibility for Indira Gandhi disability pension scheme –

– अर्जदाराचे वय १८ ते ७९ असावे.

– जी व्यक्ती ८० टक्के अपंग आहे ती व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.

– अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– अर्जदार व्यक्ती सरकारी कार्यालयामध्ये कामाला नसावी.

– अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न ३५,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Documents required for Indira Gandhi disability pension scheme –

– पासपोर्ट साईज फोटो

– पॅन कार्ड

– आधार कार्ड

– जन्मदाखला

– ८० % अपंगत्व प्रमाणपत्र

– संपर्क क्रमांक

– बँक अकाउंट डिटेल्स

– रहिवासी पुरावा

– उत्पन्न दाखला

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज | Application process for Indira Gandhi disability pension scheme –

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज – 

– इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय सोबत संपर्क साधावा.

– त्या ठिकाणी या योजनेबाबत चौकशी करून त्यांच्यामार्फत फॉर्म मिळेल.

– या योजनेसाठी आवश्यक तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी.

– त्यानंतर हा फॉर्म जमा करावा.

– फॉर्मची आणि त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी झाल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जातो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment