डिस्पोजेबल पेपर कप आणि पेपर प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय –
Disposable Paper cup and paper plates making business –
चहाच्या दुकानांमध्ये ,ज्यूस सेंटर मध्ये तसेच हॉटेलमध्ये ,रेस्टॉरंट मध्ये आणि अगदी आपल्या घरात सुद्धा आवर्जून वापरले जाणारे प्रॉडक्ट म्हणजे पेपर कप किंवा पेपर प्लेट्स. पेपर कप आणि पेपर प्लेटच्या मदतीने इतर भांडी घेण्याचा खर्च सुद्धा वाचतो आणि ती भांडी घासून धुण्याचा वेळ सुद्धा वाचतो ,त्यामुळे हल्ली पेपर कप आणि पेपर प्लेट सर्रास वापरल्या जातात. आज डिस्पोजेबल पेपर कप आणि पेपर प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दलचा पण माहिती जाणून घेणार आहोत…
1 . बिझनेस प्लान तयार करा.
– डिस्पोजेबल पेपर कप आणि पेपर प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बिझनेस प्लॅन तयार करा.
– बिजनेस प्लान तयार केल्यामुळे आपल्याला व्यवसाय मध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे याची पूर्ण क्लियारीटी आपल्याला येते आणि भविष्यामधील येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी होतात.
2 . व्यवसायासाठी जागा निवडा.
– या व्यवसायासाठी तुम्ही कोणत्या मशिनरी घेणार आहात त्यानुसार तसेच तुम्ही रोजचे किती उत्पादन घेणार आहात ते उत्पादन साठवून ठेवण्यासाठी लागणारी जागा याचा एक अंदाज घेऊन तुम्ही व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेची निवड करू शकता.
– सध्या मार्केटमध्ये डिस्पोजेबल पेपर कप आणि पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणाऱ्या खूप सार्या मशिनरी उपलब्ध आहे.
– त्यामध्ये काही सेमी ऑटोमॅटिक मशिनरी असतात तर काही ऑटोमॅटिक असतात.
– सेमी ऑटोमॅटिक मशिनरी ऑटोमॅटिक मशिनरीपेक्षा कमी दरामध्ये मिळतील.
– जर तुमची थोडी जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर नक्कीच फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घ्या, कारण त्या मशीनचे उत्पादन क्षमता नक्कीच जास्त असेल.
4 . डिस्पोजेबल पेपर कप आणि पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे परवाने ( Licence ) –
– कंपनी रजिस्ट्रेशन
– GST रजिस्ट्रेशन
– ट्रेड लायसेन्स
– MSME/SSI लायसेन्स
तुम्ही तुमचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करत आहात यानुसार इतर कोणते लायसन्स लागू शकतात याची माहिती सुद्धा त्या त्यावेळी घेणे गरजेचे आहे.
5 . कच्चा माल ( Raw material) –
पेपर प्लेट आणि पेपर कप बनवण्याच्या व्यवसायासाठी मूलभूत कच्चा माले म्हणजे चांगल्या दर्जाचे स्क्रॅप पेपर. कागद सुद्धा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, एक थिनलेयर आणि दुसरा थिक लेयर आहे. पेपर प्लेट्स तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी पॅकिंगच्या उद्देशाने पॉलिथिन शीट आणि हेसियन सॅकची सुद्धा आवश्यकता असते. कच्चामाल जर होलसेलर कडून खरेदी केला तर अधिक फायदा होऊ शकतो.
6 . मार्केटिंग ( Marketing ) –
– पेपर प्लेट आणि पेपर कप बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर हा प्रॉडक्ट ऑलरेडी लोकांना माहीतच आहे त्यामुळे गरज आहे फक्त ती उत्तमरीत्या मार्केटिंग करण्याची.
– पेपर प्लेट्स आणि पेपर कप विकण्यासाठी तुम्ही स्वतः एखादे स्टोअर सुरू करू शकता.
– तसेच ज्या लोकांना पेपर प्लेट्स आणि पेपर कप दररोज लागत असतात उदाहरणार्थ चहाची दुकाने, ज्यूस सेंटर, नाष्टा सेंटर, हॉटेल्स ,रेस्टॉरंट अशा ठिकाणी संपर्क साधून त्यांच्याकडून फिक्स ऑर्डर्स मिळवू शकतात.
– तसेच सोशल मीडिया मार्केटिंग करून सुद्धा जास्तीत जास्त ग्राहक तुमच्या सोबत जोडू शकता.