मनरेगा योजना  | MNREGA scheme information in Marathi

मनरेगा योजना नक्की काय आहे ?

– मनरेगा ही योजना 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा NREGA ( National Rural Employment Guarantee Act ) असे होते कालांतराने ( MGNREGA Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act ) असे करण्यात आले.

Advertisement

– मनरेगा या योजनेअंतर्गत आपल्या देशामधील ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

– मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.

– किमान शंभर दिवसांचा रोजगार एका आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करून देणे असे मनरेगा या योजनेचे उद्दिष्ट आहे.

– जर समजा रोजगार उपलब्ध नाही झाला किंवा नोकरी मिळाली नाही तर लाभार्थ्यास बेरोजगारी भत्ता मिळू शकतो.

– देशातील गरीब कुटुंबांना सुद्धा त्यांचे घर व्यवस्थित चालवता यावे असा या योजनेचा हेतू असून भारतामधील पंचायती राज आस्थापना मजबूत करणे हा या योजनेचा उद्देश आहे..

मनरेगा योजनेचे फायदे | Benefits of MGNREGA Yojna –

– सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेमुळे एका आर्थिक वर्षामध्ये शंभर दिवसापर्यंत रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

– नोकरी न मिळाल्यास किंवा रोजगार उपलब्ध न झाल्यास लाभार्थी बेरोजगारी भत्त्यासाठी सुद्धा दावा करू शकतात.

– ही एक सर्वात मोठी सामाजिक कल्याणकारी अशी योजना आहे.

– आपल्या देशांमधील सर्वच राज्य मनरेगा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

– कल्याणकारी मंडळामध्ये मनरेगा कामगारांची नोंदणी केली जाईल.

– या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह, पेन्शन तसेच घर यांसारख्या सुविधा मिळू शकतात.

मनरेगा योजनेअंतर्गतील कामे –

कामांची विभागणी चार विभागांमध्ये केलेली आहे –

१. संसाधन व्यवस्थापनाशी संबंधित सार्वजनिक कार्ये जसे की  सूक्ष्म आणि लघु पाटबंधारे पायाभूत सुविधांची कामे, पाणलोट व्यवस्थापन,पारंपारिक जलस्रोत आणि वनीकरण,  जलसंधारण संरचना आणि कुरण विकास,जमीन विकास कामे.

२ . वैयक्तिक संपत्ती निर्माण करण्यासाठी भौतिक संसाधने निर्माण करणे, पशुपालनाला प्रोत्साहन देणे आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे,उपजीविका विकसित करणे आणि जमीन विकसित करणे, इंदिरा आवास योजनेत काम.

३ . राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत स्वयं-सहायता गटांसाठी भौतिक संसाधने निर्मितीची कामे जसे की कृषी उत्पादकता वाढवणे तसेच जैव खतांसाठी संरचना आणि कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी ठोस कामे.

४ .  ग्रामीण भौतिक संसाधनांशी संबंधित कामे जसे की ग्रामीण स्वच्छता कामे, क्रीडा मैदानाचे बांधकाम, सर्व रस्ते जोडणी, आपत्कालीन व्यवस्थापन व नूतनीकरणाची कामे, इमारत बांधकाम.

मनरेगा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents required for MGNREGA –

– आधार कार्ड

– रहिवाशी प्रमाणपत्र

– पासपोर्ट साईझ फोटो

– वय प्रमाणपत्र

– रेशन कार्ड

– उत्पन्न प्रमाणपत्र

– मोबाईल नंबर

पात्रता | Eligibility – 

– अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

– अर्जदार हा कायमचा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराच्या घरामध्ये असा कोणताही सदस्य नसावा जो पहिल्यापासूनच केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही खाजगी संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे.

– घर ग्रामीण भागात असणे आवश्यक आहे.

– तसेच घरामध्ये एक प्रौढ सदस्य असणे आवश्यक आहे.

– तसेच अर्जदाराच्या कुटुंबाकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी.

– तसेच कुटुंबाकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसावे.

अर्ज | Application –

– तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस या ठिकाणी भेट द्या.

– तेथून या योजनेअंतर्गत जॉब कार्ड साठी असलेला अर्ज घेऊन त्यामधील सर्व माहिती व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज जमा करा.

– अर्ज जमा केल्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment