अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय | Incense sticks making business –
आपल्या भारत देशामध्ये पूजा पाठ सारख्या धार्मिक गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि पूजा करतेवेळी अगरबत्ती आवर्जून लावली जाते. आज आपण अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत –
How to start Incense sticks making business ?
1. रिसर्च आणि प्लॅनिंग –
– मार्केटचा स्टडी करा आणि अगरबत्तीची किती मागणी आहे हे जाणून घ्या.
– त्याचबरोबर आपले जे केंद्रित ग्राहक आहेत त्यांना नेमकी कशा अगरबत्ती हवे आहेत याबद्दल सुद्धा अधिक माहिती मिळवा.
– अगरबत्ती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात, गुंतवणूक किती करणार आहात, या व्यवसायासाठी कोणते आवश्यक परवाने लागतात तसेच मार्केटिंग कशी कराल यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश असलेली व्यवसाय योजना तयार करा.
2. अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने –
– कंपनी रजिस्ट्रेशन
– जीएसटी रजिस्ट्रेशन
– व्यापार परवाना
– पोलुशन सर्टिफिकेट
– स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (SSI) नोंदणी
– फॅक्टरी परवाना
लोकल रेगुलेशन्स चेक करून आवश्यक ते परवाने मिळवा.
3. अगरबत्ती तयार करायला शिका/Training –
– अगरबत्ती बनवण्यासाठी कोण कोणती सामग्री लागेल तसेच अगरबत्ती कशी बनवायची या सर्व गोष्टीचे ज्ञान मिळवा.
– वेगवेगळे प्रयोग अगरबत्ती बनवत असताना करू शकता म्हणजेच विविध सुगंध ट्राय करू शकता आणि युनिक असे उत्पादन बनवू शकता.
4. कच्चा माल / raw materials –
– बांबूच्या काड्या : बांबूच्या काड्यांपासून जर अगरबत्ती बनवणार असाल तर आठ ते बारा इंच लांब बांबूच्या काड्या लागतील.
– परफ्युम्स
– क्रूड पेपर
– बाइंडिंग एजंट/स्टिकी पावडर/गम पावडर
– चंदनाचे तेल
– अगरबत्ती आकर्षक दिसण्यासाठी विविध रंगाची पावडर
– पॅकिंग मटेरियल
( अगरबत्ती हवाबंद राहिली पाहिजे ज्यामुळे अगरबत्तीचा सुगंध कायम टिकून राहील )
5. प्रॉडक्शन्स सेट अप –
जर अगरबत्तीचे उत्पादन कमी प्रमाणात घ्यायचे असेल किंवा गुंतवणूक कमी प्रमाणात करायची असेल तर मॅन्युअली सुद्धा अगरबत्ती बनवता येऊ शकते परंतु अगरबत्तीचे जास्त उत्पादन घेण्यासाठी ऑटोमॅटिक अगरबत्ती बनवण्याच्या यंत्रांचा उपयोग करू शकता.
A. हाय-स्पीड ऑटोमॅटिक अगरबत्ती बनवण्याचे यंत्र :
– हे यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक असल्यामुळे कमी श्रम लागतात.
– उत्पादित अगरबत्तीची लांबी बदलण्याची क्षमता ह्या यंत्रामध्ये आहे.
– या मशीनमध्ये मिनीटाला 300 ते 450 स्टिक्स तयार करण्याची क्षमता आहे.
B. ड्रायर मशीन :
– कच्ची अगरबत्ती सुकवण्यासाठी या मशीनची आवश्यकता असते त्याचबरोबर पावसाळ्यात सुद्धा हे मशीन खूप उपयोगी पडते.
C . पावडर मिक्सर मशीन :
– पावडर मिक्सर मशीन हे अगरबत्ती तयार करण्यासाठी कच्च्या मालाचे व्यवस्थित मिश्रण तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण ते ओल्या किंवा कोरड्या पावडरचे अचूक मिश्रण करू शकते.
– ह्या मशीनची मिक्सिंग क्षमता 10 ते 20 किलो प्रति मिनिट असते.
6. प्रॉडक्ट वरायटी –
– वैविध्यपूर्ण उत्पादने/अगरबत्ती देण्याचा प्रयत्न करा त्यासाठी विविध प्रकारचे फ्राग्रन्सेस ऑफर करा.
– बांबूलेस, शंकू किंवा धूप स्टिक्स सारख्या विविध प्रकारांचा सुद्धा विचार करा.
7. पॅकेजिंग –
– इन्फॉर्मेटीव्ह आणि ॲट्रॅक्टिव्ह अशी पॅकेजिंग डिझाईन करा.
– लेबलिंग वर जे काही लिगल गोष्टी छापणे गरजेचे आहे ते सुद्धा प्रिंट करा.
8. मार्केटींग /how to do marketing of incense sticks –
अगरबत्ती व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी पुढील पद्धती महत्त्वपूर्ण आहेत :
A. ऑनलाईन प्रेझेन्स –
तुमची उत्पादने दाखवणारी एक व्यावसायिक वेबसाइट तयार करा. प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा.
B. सोशल मीडिया मार्केटिंग:
सोशल मीडिया मार्केटिंग हे सुद्धा कुठल्याही व्यवसायासाठी खूप महत्त्वाची आहे,संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष्यित जाहिराती चालवा.
C.इव्हेंट आणि मार्केटमध्ये सहभाग:
तुमची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक बाजारपेठा, प्रदर्शने किंवा इतर व्यावसायिक कार्यक्रमांना उपस्थित राहा, तेथे ग्राहकांना सॅम्पल्स ऑफर करा , ग्राहकांशी थेट संवाद साधा.
D . हंगामी जाहिराती: सुट्ट्या किंवा सीझनसाठी विशेष जाहिराती तयार करा. विक्री वाढवण्यासाठी सणासुदीच्या वेळी विविध ऑफर्स ठेवा.