Business ideas 2024 : Cloud Kitchen business | क्लाऊड किचन व्यवसाय

Business ideas 2024 : Cloud Kitchen business | क्लाऊड किचन व्यवसाय –

    सध्या फूड इंडस्ट्री मध्ये क्लाऊड किचनचे आगमन झालेले असून या किचनलाच वर्चुअल किचन या नावाने सुद्धा ओळखले जाते.क्लाउड किचन हे फक्त डिलिव्हरी रेस्टॉरंट असून ह्यामध्ये जेवणासाठी बसायला जागा नसते तर  ऑनलाइन ऑर्डरिंग वेबसाइट किंवा मोबाइल ॲप द्वारे दिलेल्या ऑनलाइन ऑर्डरवर अवलंबून असते. ज्यांना कमी गुंतवणुकीमध्ये आणि अगदी कमी जागेमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही एक चांगली व्यवसाय कल्पना आहे. जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

Advertisement

How to start Cloud kitchen business?

क्लाऊड किचन व्यवसाय कसा सुरू करावा ?

1. मार्केट रिसर्च : 

– तुमच्या केंद्रित ग्राहकांची कोणत्या पाककृतींसाठी जास्त मागणी आहे हे ओळखा.

– त्याचबरोबर ग्राहकांची प्राधान्य तसेच इतर गोष्टींबद्दल सर्व माहिती मिळवा.

2. व्यवसाय योजना/Business Plan:

– क्लाऊड किचन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करा.

– यामध्ये ठिकाण,टारगेट ऑडियन्स, मेनू काय असेल, दर काय असेल, मार्केटिंग कशी करायची त्याचबरोबर आर्थिक गोष्टी या सर्वांचा त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश होईल.

3. लीगल आवश्यकता /Legal Requirements:

– आपला व्यवसाय रजिस्टर करा.

– तुमच्या परिसरामध्ये अन्न व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवा त्यामध्ये FSSAI (  Food Safety and Standards Authority of India ), राज्याच्या कायद्यानुसार अग्निसुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि इतर.

4 . लोकेशन निवडा :

– क्लाऊड किचन सुरू करण्यासाठी पाण्याची सोय, वीज पुरवठा आणि स्वच्छता या गोष्टींचा विचार करून लोकेशन निवडा.

– रेस्टॉरंट किंवा हॉटेल सुरू करण्यासाठी लोकेशन निवडताना जसा विचार करावा लागतो उदाहरणार्थ गर्दीचे ठिकाण, मार्केट यांसारख्या गोष्टींचा विचार क्लाऊड किचन सुरू करत असताना करणे गरजेचे नाही.

5 . किचन सेट अप / उपकरणे आणि इतर सामग्री खरेदी करा :

– व्यावसायिक किचन सुरू करण्यासाठी ज्या उपकरणांची आवश्यकता असते ती सर्व उपकरणे खरेदी करा त्यामध्ये रेफ्रिजरेटर ,मायक्रोवेव्ह, फूड स्टोरेज कंटेनर्स त्याचबरोबर अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व गोष्टी यांची खरेदी करा.

– किराणा – भाजीपाला यांसारख्या गोष्टी वेळोवेळी खरेदी करा.

– विश्वसनीय विक्रेत्यांकडून योग्य दरामध्ये उच्च गुणवत्तेची सामग्री खरेदी करा, शक्यतो होलसेल दराने खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आर्थिक बचत होईल आणि आर्थिक बजेट कोलमडनार नाही.

6. ऑनलाईन प्रेझेन्स/Online Presence:

– ग्राहकाकडून ऑनलाईन ऑर्डर घेण्याकरिता युजर फ्रेंडली अशी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप बनवा.

– आपल्याकडे उपलब्ध असलेला मेनूची म्हणजेच फूड फोटोग्राफी व्यवस्थित रित्या करा.

– प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सोबत रिच वाढवण्यासाठी कॉन्टॅक्ट करा.

7 . शेफ –

– तुम्ही स्वतःच जर उत्तम स्वयंपाक बनवत असाल तर उत्तमच,परंतु जर तसे नसेल तर अन्न योग्यरीत्या तयार करण्यासाठी त्याच बरोबर ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी योग्य शेफ आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे महत्त्वाचे ठरेल.

– या व्यवसायामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात त्यानुसार या गोष्टींचा विचार तुम्ही करू शकता.

8 . मार्केटींग /how to do marketing of cloud kitchen –

– सोशल मीडिया मार्केटिंग पद्धतीचा उपयोग करावा.

– त्याचबरोबर ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या पदार्थांचे आकर्षक असे इमेजेस आपल्या वेबसाईटवर तसेच ॲप वर अपलोड करू शकता.

– ग्राहकांकडून जास्तीत जास्त ऑर्डर मिळवण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी खाद्यपदार्थांवर डिस्काउंट देणे त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑफर वेळोवेळी ठेवणे अशा काही स्ट्रॅटेजी वापरू शकता.

– इन्फ्लूएनसर पार्टनरशिप किंवा युट्युब वरील फूड चॅनेल सोबत सुद्धा कोलेब्रेशन करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment