30% व्याज परतावा देणारी योजना …| Aai Tourism Scheme | Best Government schemes 2024

30% व्याज परतावा देणारी योजना …

      राज्य सरकार तर्फे तसेच केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात असतात त्यामध्ये काही योजना महिलांसाठी सुद्धा असतात. विविध योजनांचे वेगवेगळे उद्दिष्ट असते. आज सुद्धा अशाच एका योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत जी योजना महिलांसाठी आहे,आई पर्यटन योजना ( Aai Tourism Scheme ).जाणून घेऊयात अधिक माहिती…

– ही योजना महिलांसाठी असून पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये येणाऱ्या महिलांसाठी आहे. 

– महिलांना पर्यटन क्षेत्रामधील व्यावसायिक उभारणी करिता तसेच पर्यटन क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांसाठी जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील बँकेनुसार व्याज परतावा हा पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल.

आई पर्यटन योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य | Benefits under Aai Tourism Scheme:

– पर्यटन व्यवसायाकरता महिला उद्योजकांना बँकेने 15 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या महिलेने जर वेळेमध्ये कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत)  किंवा सात वर्षे कालावधीपर्यंत किंवा साडेचार लाख रक्कम मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंतचा व्याज परतावा पर्यटन संचालनालय करेल.

लाभार्थी अटी व शर्ती | Term and conditions for Aai Tourism Scheme –

– अर्जदार व्यक्ती महिला असावी.

– अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

– लाभार्थ्याचे कर्ज खाते हे आधार कार्डशी लिंक असावे.

– पर्यटन व्यवसाय हा महिलेच्या मालकीचाच असावा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे.

– पर्यटन संचालनालयामध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी या महिला असाव्यात.

इतर अटी व शर्ती :

– अस्तित्वातील वृद्धी किंवा क्षमता वाढविणे.

– क्रेडीट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणे आवश्यक असेल.

व्यवसायाचे प्रकार आणि क्षेत्र:

* पर्यटन व्यवसाय क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रातील असावे.

* व्यवसायाचे प्रकार :

१) कॅरेंव्हेंन, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अँड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, हॉटेल, व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, पॉडस,बीच शॅक इ.

२) रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्ट फुड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे

३) टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूज, टूर अँड ट्रॅव्हल एजंसी, आर्ट अँड क्राफ्ट किलेग, टूरिस्ट ट्रांस्पोटर्स ऑपरेटर,

४) आदिवासी / निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा, योगा केंद्र इ 

५ )इतर पर्यटन व्यवसाय

परताव्याच्या अटी :

– जर महिलांनी नियमीत कर्ज परत फेड केली नाही तर व्याज परतावा दिला जाणार नाही.

– पर्यटन व्यवसाय सुरु असल्याचे २ फोटो सादर करावेत किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात यावे.

पर्यटन संचालनालया मार्फत कर्जाच्या व्याज रक्कमेचा परतावा :

– महिला उद्योजकांनी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यात हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम   (१२% च्या मर्यादित) पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येईल.

– मर्यादित व्याज परताव्या व्यतिरिक्त इतर कुठलीही फी अदा केली जाणार नाही.

–  या योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये स्थापिक / कार्यरत असलेल्या (CBS) प्रणालीयुक्त व RBI च्या नियमा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बँकेकडूनच कर्ज घेणे अनिर्वाय असेल.

– पर्यटन स्थळांच्या परिसरामधील महिला पर्यटन उद्योजकांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

आई पर्यटन धोरण किंवा आई पर्यटन योजनेसाठी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे | Documents and Application process for Aai Tourism Scheme –

‘आई’ पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज अनुदान मिळविण्यासाठी अर्ज दाखल करून त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

–  विहित नमुन्यामधील अर्ज अर्जदाराने जेव्हा नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्याचा किंवा पर्यटन क्षेत्रात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला असेल फक्त तेव्हाच भरावा.

– आवश्यक कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून अर्जासोबत जोडावीत.

अधिकृत वेबसाईट : www.gras.mahakosh.gov.in या वेबसाईटवर रु. ५० ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरा.

– कोकण विभागासाठी पर्यटन संचालनालय

– इतर पावती आणि कोषागार जिल्ह्यांसाठी ठाणे जिल्हा निवडा

– पुणे विभागासाठी पुणे जिल्हा, नाशिक विभागासाठी नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजी नगर विभागासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्हा, अमरावती विभागासाठी अमरावती जिल्हा व नागपूर विभागासाठी नागपूर जिल्हा निवडा.

* आवश्यक कागदपत्रे : 

– आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र

–  ओळखपत्र पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योग यांच्या पत्त्याचा पुरावा : उद्योग नोंदणी किंवा वीज बिल किंवा लैंडलाइन टेलिफोन बिल किंवा दुकान आणि स्थापना परवाने,

– सदर व्यवसाय महिलाच्या मालकी हक्काचा असल्याचे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरीद्वारे दस्तऐवज असावा, तसेच पर्यटन प्रकल्पामध्ये किमान ५०% व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. (अनिवार्य)

– पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योगांची मालकी दस्तऐवज महिला अर्जदाराच्या नावावरील ७/१२ उतारा/ प्रॉपर्टी कार्ड/८-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार,(अनिवार्य)

– वैयक्तिक आधार कार्ड (अनिवार्य) 

– पॅन कार्ड प्रत (अनिवार्य)

– अन्न व औषध प्रशासन परवाना (खादय व्यवसायासाठी अनिवार्य)

– उद्योग आधार (पर्यायी)

– जीएसटी क्रमांक (पर्यायी)

– रद्द केलेला चेक (पर्यायी)

– महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र (पर्यायी)

– पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी परवाना कागदपत्रे, उदा. निधी पोर्टलवरील www.nidhi.tourism.gov.in या संकेतस्थळावरील नोंदणी किया पर्यटन संचालनालयाकडे केलेली नोंदणी / पर्यटन विकास महामंडळाकडे केलेली नोंदणी 

– प्रकल्प संकल्पना संक्षिप्त माहिती ५०० शब्दांपेक्षा (एक पान) जास्त नसावी. अहवाल (अनिवार्य)

* या योजने अंतर्गत निव्वळ व्याजाचा परतावा दिलेल्या कालावधीपर्यंत अनुज्ञेय असेल.

– ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. ज्या त्या विभागातील अर्जदारांनी ज्या त्या विभागांमध्ये पर्यटन संचालनालयाकडे अर्ज पाठवावा. 

– अर्ज भरुन स्वीकारल्यानंतर पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र (LOI) अर्जदारास पाठवले जाईल.

हे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त बँकेमध्ये दाखवून 15 लाख रु. पर्यंत कर्ज काढू शकता येते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version