आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना | Aavdel Tithe Kothehi Pravas Yojana

     बऱ्याच लोकांना फिरण्याची खूप आवड असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणास्तव त्यांना ते शक्य होत नाही. महाराष्ट्र राज्यामधील एसटी महामंडळाने नागरिकांसाठी कमी दरामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरता यावे यासाठी ही योजना सुरू केली आहे. चला तर जाणून घेऊयात आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना.

Advertisement

Aavdel tithe kothehi pravas yojana

– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामार्फत आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना सुरू करण्यात आलेली आहे.

– आवडेल तिथे कोठेही प्रवासी योजनेची सुरुवात 1988 मध्ये झालेली आहे, परंतु अजून सुद्धा या योजनेबद्दल म्हणावी अशी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही.

– या योजनेमुळे नागरिकांना कमी खर्चामध्ये आवडेल तेथे प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

– महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांना कमी खर्चामध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळे त्याचबरोबर धार्मिक स्थळे बघता यावीत हा या योजनेचा उद्देश असून या योजनेमुळे बरेचसे नागरिक एसटी मधून प्रवास करण्यासाठी उत्सुक होऊ शकतात.

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत चार किंवा सात दिवसांचा पास दिला जातो.

– या योजनेचे पास नियमित बस सोबत इतर कोणत्याही जादा बस मध्ये तसेच यात्रा करण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये सुद्धा ग्राह्य धरले जातील.

– या योजनेअंतर्गत दिले जाणारे पासेस दहा दिवस अगोदर पर्यंत देता येईल.

– या योजनेमुळे कमी खर्चामध्ये प्रवासी विविध ठिकाणी फिरू शकतात.

– या योजनेअंतर्गत जे व्यक्ती पास घेतील त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आंतरराज्य मार्गावर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बसने प्रवास करता येणार आहे.

– या योजनेअंतर्गत लाभार्थी एसटीच्या सर्व बसेस म्हणजेच साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी),शिवशाही (आसनी) ने प्रवास करू शकता.

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेसाठी महाराष्ट्र राज्यांमधील सर्व व्यक्ती पात्र असतील.

७ दिवसाच्या पासाचे मूल्य –

साधी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, व यशवंती (मिडी) आंतरराज्यसह –

प्रौढ – २०४० रुपये

मुले – १०२५ रुपये

शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह –

प्रौढ – ३०३० रुपये

मुले – १५२० रुपये

४ दिवसाच्या पासाचे मूल्य –

साधी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, व यशवंती (मिडी) आंतरराज्यसह –

प्रौढ – ११७० रुपये

मुले –  ५८५ रुपये

शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह –

प्रौढ – १५२० रुपये

मुले – ७६५ रुपये

– आधारकार्ड

– पासपोर्ट साइज फोटो

– ज्या व्यक्तीचे नाव पास वर असेल म्हणजेच ज्या व्यक्तीने पास काढलेला असेल तीच व्यक्ती त्या पासने प्रवास करू शकते.

– या योजनेअंतर्गत पासधारक त्यांना जे आसन आवडेल तेथे हक्क सांगू शकत नाही परंतु पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येऊ शकते.

– या योजनेअंतर्गत मिळालेल्या पासची वैधता संपल्यानंतर सुद्धा एखादा प्रवासी त्या पासचा उपयोग करून प्रवास करताना आढळला तर त्यांच्याकडून तिकीट आकारले जाते.

– पास सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्याची असेल जर तो पास हरवला तर दुसरा पास दिला जाणार नाही किंवा त्या पासाचा कुठलाही परतावा सुद्धा दिला जाणार नाही. 

– पासधारकाकडून पासचा गैरवापर होत असल्यास पास जप्त करण्यात येईल.

– जर समजा संप किंवा काम बंद आंदोलन यांसारख्या काही अडचणींमुळे बस वाहतूक बंद झाली तर लाभार्थ्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा दिला जाईल किंवा बस सेवा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत उर्वरित सेवेचा लाभ घेता येईल.

– या योजनेमध्ये पाच वर्षापेक्षा जास्त व बारा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुले मुली हे लहान मुलांच्या कॅटेगिरी मध्ये बसतील.

– प्रौढ पासधारकास या योजनेअंतर्गत  30 किलो तर 12 वर्षाखालील मुलांना 15 किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येऊ शकते.

– नजीकच्या बस स्टॅन्ड मध्ये जाऊन या योजनेचा अर्ज तिथून घ्यावा.

– अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पैसे भरावे व पास घ्यावा.

हेही वाचू शकता…

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाखांपर्यंत कर्ज मिळते…

जाणून घ्या नक्की योजना काय आहे...

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/sheli-palan-yojana/?amp=1: आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना | Aavdel Tithe Kothehi Pravas Yojana
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment