Book store business | बूक स्टोअर बिझनेस | How to start a profitable book store or book shop business?

Book store business | बूक स्टोअर बिझनेस | How to start a profitable book store or book shop business?

   बऱ्याच लोकांचा आवडीचा छंद पुस्तके वाचणे हा आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये ई-बुक्स, ऑडिओ बुक्स किंवा डिजिटल मासिके उपलब्ध असली तरी सुद्धा बऱ्याच लोकांना पुस्तके विकत घेऊन ते वाचायला आवडतात आणि त्यांना त्यामध्ये आनंद सुद्धा मिळतो. तुम्ही सुद्धा पुस्तक प्रेमी असाल तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत असेल आणि तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर बुक स्टोअर बिजनेस

Advertisement
 हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

– मार्केटमधील बुक स्टोअरचे ऑब्झर्वेशन तसेच अभ्यास केल्यामुळे त्या बुक स्टोअर मध्ये कोणकोणत्या प्रकाशनांची पुस्तके असतात त्यांची किंमत यांसारख्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

– जगभरामध्ये पुस्तकांचे विविध प्रकार आणि विविध पुस्तके उपलब्ध आहे त्यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके किंवा पुस्तकांची कोणती कॅटेगिरी तुमच्या बुक स्टोअर मध्ये विक्रीसाठी ठेवणार आहे हे ओळखून तसा निर्णय घेतला पाहिजे.

– आपल्या सर्वांना माहीतच असेल की कोणत्याही व्यवसायासाठी व्यवसाय योजना खूपच महत्त्वाची असते.

– बुक स्टोअर बिजनेस सुरू करत असताना तुम्ही तुमच्या बुक स्टोअर मध्ये कोणती पुस्तके ठेवणार आहात, बुक स्टोअर कुठे उघडणार आहात, सर्व गोष्टींना अंदाजे गुंतवणूक किती लागू शकते यांसारख्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय योजना तयार करणे गरजेचे आहे.

– जर समजा आपल्याला व्यवसायासाठी लोन घ्यायचे असेल तर त्यावेळी ही व्यवसाय योजना कामी येऊ शकते त्याचबरोबर तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही एखादा फायनान्सर शोधत असाल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित रित्या तुम्ही तुमची व्यवसाय योजना दाखवू शकता.

– पुस्तकांचे विविध प्रकार बघण्यास मिळतात मग त्यामध्ये धार्मिक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, कॉमिक बुक्स, शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, व्यायामाची पुस्तके, पाककृती चे पुस्तके यांसारखे पुस्तकांचे कित्येक प्रकार उपलब्ध आहेत.

– यापैकी तुम्ही आपल्या बुक स्टोअर मध्ये कोणत्या प्रकारची पुस्तके ठेवणार आहात आणि ती पुस्तके कोणत्या प्रकाशनाची असणार आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

– बुक स्टोर बिजनेस उभारण्यासाठी जागेची योग्य निवड करणे खूप गरजेचे आहे.

– बुक स्टोअर सुरू करण्यासाठी तुम्ही मार्केटच्या ठिकाणी जागा निवडू शकता किंवा ज्या ठिकाणी गर्दी जास्त असते म्हणजेच ग्राहक जास्त असतात त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता.

उदाहरणार्थ शाळा – कॉलेजेस जवळ, बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टेशन जवळ.

– तुमच्या बुक स्टोअर ला योग्य ते ब्रँड नेम द्या.

– बुक स्टोअर ला नाव देत असताना ते नाव पुस्तकांशी जुळते मिळते ठेवले म्हणजे वाचायला सुद्धा छान वाटेल आणि ग्राहकांना सुद्धा बुकशॉप कडे आकर्षित करेल.

– आपण आपल्या बुक स्टोअर मध्ये पुस्तकांचा स्टॉक किती आहे, याची इन्व्हेंटरी मॅनेज केली पाहिजे त्यामध्ये उपलब्ध असलेली पुस्तके , कोणत्या प्रकाशनांची पुस्तके आहे ही सर्व माहिती टाकू शकता.

– इन्व्हेंटरी मॅनेज केल्याचा फायदा म्हणजे कोणत्या पुस्तकांचा खप जास्त होत आहे याची माहिती मिळते आणि त्या प्रकारची पुस्तके किंवा त्या प्रकाशनांची पुस्तके तुम्ही तुमच्या बुक स्टोअर मध्ये वाढवू शकतात.

– कुठल्याही व्यवसायासाठी संवाद कौशल्य चांगले असणे खूप गरजेचे असते.

– बुक स्टोअर सुरू केल्यानंतर सुद्धा आपला ग्राहकांची संवाद कशा प्रकारचा आहे, हे खूप महत्त्वाचे ठरते.

– ग्राहकांना पुस्तकांबद्दल व्यवस्थित रित्या माहिती समजावून सांगणे हे हे खूप गरजेचे आहे. ज्यावेळी आपण ग्राहकांशी संवाद साधतो त्यावेळी ग्राहकांना सुद्धा पुस्तकांबद्दल अधिकाधिक माहिती होत चालते आणि पुस्तक खरेदी करण्यामध्ये ग्राहकांचा रस वाढत चालतो.

– आपल्या बुक स्टोअर बद्दल वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊ शकता.

– सोशल मीडिया मार्केटिंग हे मार्केटिंग साठी एक प्रभावी माध्यम आहे, ही पद्धत सुद्धा मार्केटिंग साठी निवडू शकता.

– रेडिओ किंवा टीव्ही यावर सुद्धा जाहिरात देऊ शकता.

– पॅम्प्लेट तयार करून पॅम्प्लेटचे वाटप सुद्धा करू शकता.

– वेगवेगळ्या मासिकांमध्ये आपल्या बुक स्टोअर बद्दल जाहिरात देऊ शकता.

– आपले जे ग्राहक तयार होतील त्यांच्याकडून त्यांचा मेल आयडी तसेच व्हाट्सअप नंबर घेऊन त्यावर नवीन येणाऱ्या पुस्तकांबद्दल माहिती वेळोवेळी देऊ शकता.

– पुस्तकांवर वेगवेगळ्या ऑफर्स येऊ शकतात तसेच नेहमी येणाऱ्या ग्राहकांसाठी सुद्धा काही खास सवलत देऊ शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment