Aawdel tithe Kothehi Pravas Yojana | एकदाच पैसे भरून राज्यामध्ये 4 दिवस किंवा 7 दिवस कुठेही फिरा | Shivshahi Bus Yojana I Best Government Schemes

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana | एकदाच पैसे भरून राज्यामध्ये 4 दिवस किंवा 7 दिवस कुठेही फिरा | Shivshahi Bus Yojana 

      आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की जी योजना ज्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे त्यांच्यासाठी नक्कीच खास असणार आहे. या योजनेचे नाव आहे ” आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना ( Aawdel tithe Kothehi Pravas Yojana ) “. या योजनेअंतर्गत आपण एकदाच पैसे भरून चार दिवस किंवा सात दिवस महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रवास करू शकतो. जाणून घेऊयात नक्की ही योजना काय आहे….

Advertisement

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना –

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना ही योजना राज्य सरकार तर्फे सुरू करण्यात आलेली आहे. 

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचे उद्दिष्ट प्रवाशांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा असे आहे. 

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचा मुख्य लाभ कमी खर्चामध्ये प्रवास पास प्रवाशांना मिळतो.

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेअंतर्गत प्रवाशांना महाराष्ट्रामधील पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरता येतील. 

– या योजनेअंतर्गत असणारा प्रवास चार दिवसांचा किंवा सात दिवसांचा असणार आहे, पहिल्या दिवसाच्या रात्री बारा वाजल्यापासून शेवटच्या दिवसाचे रात्री बारा वाजेपर्यंत अशी या प्रवासाची वैधता असेल.

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचे उद्दिष्ट –

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रवाशांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा असे आहे. 

– त्याचबरोबर प्रवाशांना बसने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे असा सुद्धा उद्देश आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचा आहे.

– तसेच महाराष्ट्र राज्यांमधील नागरिकांना बसने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे असा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे.

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana Pass fee | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेची पास फी –

७ दिवसाच्या पास फी –

साधी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, व यशवंती (मिडी) आंतरराज्यासह –

प्रौढ – २०४० रुपये

मुले – १०२५ रुपये

शिवशाही (आसनी) आंतरराज्यासह –

प्रौढ – ३०३० रुपये

मुले – १५२० रुपये

अशाप्रकारे प्रौढ व्यक्तींनी सात दिवस जरी शिवशाही बसने राज्यामध्ये कुठेही प्रवास केला तरी फक्त ३०३० रुपये लागणार आहेत.

४ दिवसाच्या पास फी  –

साधी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, व यशवंती (मिडी) आंतरराज्यासह –

प्रौढ – ११७० रुपये

मुले –  ५८५ रुपये

शिवशाही (आसनी) आंतरराज्यासह –

प्रौढ – १५२० रुपये

मुले – ७६५ रुपये

अशाप्रकारे प्रौढ व्यक्तींनी 4 दिवस जरी शिवशाही बसने राज्यामध्ये कुठेही प्रवास केला तरी फक्त १५२० रुपये लागणार आहेत.

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana Benefits | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचे फायदे –

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेमुळे नक्कीच प्रवाशांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रवास करता येणार आहे आणि त्यामुळे पैशाची बचत होऊ शकते. 

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचा पास प्रवाशांनी काढल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस आंतरराज्य मार्गावर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. 

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना सर्व प्रकारच्या बसमध्ये कमी खर्चामध्ये कुठेही प्रवास करता येणार आहे त्यामध्ये पुढील प्रकारच्या बसचा समावेश होतो : 

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana Documents | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेसाठी लागणारे कागदपत्रे –

– आधार कार्ड 

– पासपोर्ट साईज फोटो 

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana Terms and Conditions | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेच्या अटी आणि शर्ती – 

– ज्या व्यक्तीच्या नावे पास काढला आहे त्या व्यक्तीलाच या पाचचा उपयोग करून आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच फक्त ती व्यक्तीच प्रवास करू शकते. 

– समजा एखाद्या व्यक्तीची या योजनेसाठी असणाऱ्या पाचची वैधता संपली आणि तरीसुद्धा ती व्यक्ती बसने प्रवास करत असेल तर त्यासाठी तिकडाचे पैसे आकारले जातील.

– या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीकडे पास आहे ती व्यक्ती बसमधील कुठल्याही सीटवर हक्क सांगू शकत नाही परंतु हव्या असणाऱ्या सीट साठी आरक्षण भरून सीट बुक करू शकते.

– जर प्रवाशाचा प्रवास करत असताना किंवा त्याआधी पास हरवला तर प्रवाशाला दुसरा पास दिला जाणार नाही तसेच हरवलेल्या पासची रक्कम सुद्धा परत दिली जाणार नाही.

– प्रवास करत असलेल्या व्यक्तीची मौल्यवान वस्तू किंवा इतर वैयक्तिक वस्तू प्रवासामध्ये हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास किंवा इतर कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही.

– या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या पासचा एखादी व्यक्ती गैर उपयोग करत असेल तर पास जप्त केला जाईल.

– जर समजा एखाद्या व्यक्तीने पास काढला आणि नेमकी प्रवास सुरू करण्याच्या वेळी किंवा त्या कालावधीमध्ये बसचा काही कारणास्तव संप असल्यास अशावेळी पास काढलेल्या दिवसापासून तीन महिन्यांपर्यंत कधीही प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा प्रवाशाला दिला जाईल म्हणजेच जितक्या दिवस प्रवाशाने प्रवास केलेला नसेल तितक्या दिवस प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

– या योजनेमध्ये मुले या कॅटेगिरी मध्ये पाच ते बारा वर्षापर्यंत वय असणाऱ्या मुलांचा समावेश असेल.

– या योजनेच्या माध्यमातून चार ते सात दिवसांचा प्रवास प्रवाशांना करता येईल. 

– वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमध्ये विविध प्रकारच्या बसने प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळेल, बसच्या प्रकारानुसार पासचे मूल्य वेगवेगळे असेल.

– आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेअंतर्गत प्रवास करत असताना मुलांना 15 किलो पर्यंत तर प्रौढांना 30 किलो पर्यंत वजन म्हणजेच सामान विना आकार नेण्याची परवानगी असेल.

– या योजनेअंतर्गत काढलेल्या पासचा उपयोग फक्त बसने प्रवास करण्यासाठी होईल इतर वाहनांनी प्रवास करण्यासाठी होणार नाही. 

– शिवशाही बस साठी काढलेल्या पासचा उपयोग करून इतर बस मध्ये सुद्धा प्रवास करता येईल.

Aawdel tithe Kothehi Pravas Yojana Application | आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेसाठी अर्ज – 

– आवडेल तिथे कोठेही प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील बस स्टॅन्ड मध्ये जाऊन या योजनेसाठी असणारा अर्ज मिळवायचा आहे.

– या योजनेसाठी असणारा अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आपल्याला जितक्या दिवसांचा प्रवास ज्या बसने करायचा आहे त्यानुसार पाच मूल्य भरून अर्ज जमा करायचा आहे. 

– ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बसचा पास आपल्याला दिला जातो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version