शेती विषयक व्यवसाय | कृषी विषयक व्यवसाय| Agriculture related business ideas | Best business ideas 2024

शेती विषयक व्यवसाय | कृषी विषयक व्यवसाय| Agriculture related business ideas –

      आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि भारतामधील बहुतेक लोक शेती हा व्यवसाय करतात, त्यापैकी बरेचसे लोक शेती सोबत शेती निगडित इतर व्यवसाय सुद्धा करतात. शेती निगडित व्यवसाय केल्यामुळे शेतीमध्ये जर कधी काही नुकसान झाले तर या दुसऱ्या व्यवसायाची साथ आपल्याला असते त्यामुळे आपण आर्थिक संकटांशी सामना करू शकतो. यापूर्वी सुद्धा आपण शेती विषयक बरेचसे व्यवसाय बघितले आहे, आजच्या लेखामध्ये असेच काही शेतीविषयक व्यवसाय ( Agriculture related business ideas) आपण बघणार आहोत…

Advertisement
Agriculture related business ideas

१. रेशीम उद्योग | Reshim Business –

– रेशीम उद्योग हा एक अतिशय चांगला असा शेतीशी निगडित असा व्यवसाय असून हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये चांगल्या रीतीने करता येऊ शकतो.

– रेशीम वर्म्स वाढवण्यासाठी, तुती, गवत, पलाश इत्यादी झाडे लावणे, कीटक पाळणे, रेशीम साफ करणे, सूत बनवणे, कापड बनवणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

– रेशीम वर्म्स वाढवण्यासाठी तुतीची लागवड शेतीमध्ये केली जाते, या व्यवसायामध्ये सुरुवातीला रेशीमच्या किड्यांचे छोटे छोटे अंडे आणले जातात आणि कालांतराने त्यापासून रेशीम किडे तयार होतात या किड्यांचे अन्न म्हणजे तुतीची पाने.

– ही किडे तुतीची पाने खातात आणि हळूहळू मोठी होऊ लागतात आणि कालांतराने स्वतःभोवतीच कोश तयार करतात आणि यापासूनच रेशीम बनवले जाते.

– हे रेशीम बाजारपेठेमध्ये विकले जाते.

२ . वेअर हाऊस | Ware House Business –

– शेती विषयक सामग्री किंवा शेती विषयक माल हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी नेला जातो, परंतु विक्रीपूर्वी ही सामग्री किंवा हा शेतीविषयक माल साठवण्यासाठी प्रत्येकाकडे जागा असतेच असे नाही त्याचबरोबर विविध व्यवसाय करत असणारे व्यावसायिक किंवा व्यापारी यांच्याकडे प्रोडक्शन सेटअप किंवा इतर गोष्टींसाठी जरी त्यांनी गुंतवणूक केलेली असली तरी प्रत्येक जण वेअर हाऊस साठी गुंतवणूक करेलच असे नाही आणि म्हणूनच जर आपण विविध सामग्री साठवण्यासाठी जर जागा दिली, वेअरहाऊस बनवून दिले आणि त्या बदल्यामध्ये आपण रेंट घेऊ शकतो किंवा व्यावसायिकाला जितक्या दिवसांसाठी किंवा जितक्या महिन्यांसाठी त्यांचा माल आपल्या वेअर हाऊस मध्ये ठेवायचा आहे तितक्या दिवसांचे रेंट त्यांच्याकडून घेऊ शकतो.

– आपल्या शेतीच्या ठिकाणी तेथील आसपासच्या परिसराचा अभ्यास करून आपण वेअरहाऊस सुरु करणे फायदेशीर ठरेल की नाही याचा विचार करून निर्णय घेऊ शकतो, परंतु ही सुद्धा एक वेगळी अशी बिजनेस आयडिया आहे.

३ . रेडीमेड पीठ विक्री | Readymade flour sales business –

– शहरामध्ये रेडीमेड पीठ बरेच लोक पूर्वीपासूनच खरेदी करतात आणि  ही पद्धत आता गावाकडे सुद्धा सुरू झालेली दिसून येते मग यामध्ये फक्त पिठामध्ये गव्हाचे पीठ मर्यादित न राहता बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, ढोकळा पीठ, इडली प्रिमिक्स असे विविध प्रकार येतात.

– म्हणूनच जर आपल्या शेतामध्ये आपल्याला जर या धान्याचे उत्पादन घेता आले तर आपण या धान्यापासून अशी वेगवेगळी पीठे बनवून मार्केटमध्ये विकू शकतो. हे करण्यासाठी आपल्याला पिठाच्या गिरणीची आवश्यकता असेल, म्हणून आपण या व्यवसायासोबत इतरांना दळण दळून देऊ शकतो आणि अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळवता येऊ शकते.

४ . रोपवाटिका व्यवसाय | Nursery Business –

– आपल्याकडे जर स्वतःची शेतजमीन असेल तर रोपवाटिका व्यवसाय सुरू करणे खूप सोपे जाऊ शकते म्हणजे आपल्याला रोपवाटिका सुरू करण्यासाठी जी जागा हवी असते ती खूप महत्त्वाची असते आणि ही जागा जर स्वतःची असेल तर या जागेसाठी जाणारे भाडे आपले या ठिकाणी वाचते.

– रोपवाटिका सुद्धा विविध प्रकारांमध्ये येतात, रोपवाटिका व्यवसाय हा सुरू कसा करायचा याबद्दल डिटेल माहिती असणारा लेख आपण यापूर्वी प्रसिद्ध केला आहे,त्याची लिंक पुढे देत आहोत.

https://iconikmarathi.com/nursery-business/

    अशा रीतीने शेतीविषयक किंवा शेतीशी निगडित बरेचसे व्यवसाय (Agriculture related business ideas) आहेत हे व्यवसाय करून आपण चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाची सर्वप्रथम सखोल माहिती घेऊन त्याबद्दल रिसर्च करावे आणि त्यानंतर हा व्यवसाय करणे आपल्यासाठी योग्य असेल की नाही हे ठरवावे आणि त्यानंतरच तो व्यवसाय करण्याचा निर्णय घ्यावा.

⭕ 5 Best Agriculture business ideas 

⭕ शेती विषयक व्यवसाय कल्पना*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕Agriculture related business idea 

⭕ शेती संदर्भामधील काही हटके बिझनेस

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment