Pickle making business | लोणचे बनवण्याचा व्यवसाय –
जवळजवळ सर्वांनाच “लोणचे” खायला आवडते. लोणच्याचे विविध प्रकार पडतात जसे की कैरी,लिंबू, मिरची आणि इतरही बरेच.विविध व्यवसाय असे आहेत की जे कमी भांडवलामध्ये सुद्धा सुरू करू शकतो, त्यापैकीच एक व्यवसाय म्हणजे लोणचे बनवण्याचा व्यवसाय (Pickle making business).
Table of Contents
Pickle making business | लोणचे बनवण्याचा व्यवसाय –
१. व्यवसाय योजना तयार करा| Pickle making Business plan –
– लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करा.
– व्यवसाय योजनेमध्ये,
हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात?
या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागू शकते?
या व्यवसायासाठी कोणता कच्चामाल किंवा सामग्री आवश्यक आहे?
लोणच्याचे पॅकेजिंग कसे करणार आहात?
मार्केटिंग कसे करणार आहात?
यांसारख्या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थित व्यवसाय योजना तयार करा.
२. व्यवसायाचे ठिकाण | Location for Pickle making business –
– लोणचे बनवण्याचा व्यवसाय तुम्ही घरातून देखील सुरू करू शकता किंवा लोणचे बनवण्याच्या व्यवसायाचे उत्पादन युनिट देखील स्थापन करू शकता.
– जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी प्रमाणात लोणच्याचे उत्पादन घेणार असाल तर अगदी घरून सुद्धा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, परंतु मोठ्या स्तरावर किंवा जास्त गुंतवणुकीमध्ये आणि जास्त उत्पादन तुम्हाला घ्यायचे असेल तर यासाठी लागणाऱ्या मशिनरीचा विचार करून तसेच इतर गोष्टींचा विचार करून जागा निश्चित करू शकता.
३ . व्यवसायाला ब्रँड नेम | Brand name for Pickle making business –
लोणच्याच्या व्यवसायाला लोणच्याला समर्पक असे आकर्षक आणि कॅची ब्रँड नेम द्या, जेणेकरून लोकांना लक्षात राहील.
४ . लोणच्याचे प्रकार | Types of pickle –
– तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोणचे तयार करायचे आहे हे ठरवा.
– लिंबू लोणचे, मिरची आणि लसूण लोणचे, आंब्याचे लोणचे, गाजराचे लोणचे, मिश्र भाजीचे लोणचे, कोबीचे लोणचे इ. अशा अनेक प्रकारचे लोणचे आहेत.
– लोणचे विविध प्रकारच्या चवीमध्ये येतात जसे की आंबट, गोड, आंबट – गोड लोणचे.
५. लोणचे बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी आवश्यक सामग्री | Raw material OR other equipments for Pickle making Business –
– लोणचे बनवण्याच्या व्यवसायाला इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये कमी उपकरणे लागतात, जर हा व्यवसाय घरी करण्याचे ठरवले तर आपल्या घरी बऱ्यापैकी भांडे उपलब्ध असतात परंतु जर या व्यवसायासाठी स्वतंत्र उत्पादन युनिट तुम्ही सुरू करणार असाल तर त्यासाठी कटिंग मशीन, पिकलिंग मशीन आणि मिक्सिंग मशिनरी यासारख्या मोठ्या यंत्रसामग्रीची आवश्यकता असेल.
– तसेच लोणचे साठवण्यासाठी मोठ्या कंटेनरची, तसेच पॅकेजिंगसाठी जार किंवा इतर साहित्य आवश्यक असेल.
– उपकरणांसोबतच इतर कच्चामाल : जे लोणचे बनवायचे आहे, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री.
६. नोंदणी आणि परवाने | Registration and licence –
– FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food safety and standards authority of India)
– शॉप अॅक्ट परवाने shop act licence
– जीएसटी नोंदणी
– उद्योग आधार नोंदणी
– पॅन कार्ड नोंदणी
– आणि इतर आवश्यक
७. स्टोरेज आणि प्रीझर्वेशन | Storage and preservation
– योग्य स्टोरेज आणि प्रीझर्वेशन सुविधा देखील आवश्यक असतील.
– तुम्हाला लोणचे व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि लोणच्यासाठी स्टोरेज आणि जागा देखील लागेल.
– जर तुम्ही घरूनच हा व्यवसाय सुरू करणार असाल, तर कमीतकमी स्टोरेजची आवश्यकता असेल.
– परंतु, जर व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या कच्च्या मालासाठी आणि लोणचे साठवण्यासाठी मोठ्या स्टोरेजची आवश्यकता असेल.
८ . लोणचे पॅकेजिंग आणि किंमत | Pickle packaging and pricing
– लोणच्याची पॅकेजिंग ग्लास किंवा प्लास्टिक जार मध्ये करू शकता किंवा पॅकेजिंग साठी ज्या बॅग्स येतात त्यामध्ये करू शकता.
– लोणच्याची योग्य किंमत देखील ठरवावी लागेल.
९ . लोणच्याची मार्केटिंग | Marketing of pickle making business –
– लोणच्याची गुणवत्ता आणि चव नेहमी चांगली ठेवा, असे केल्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून जे ग्राहक जोडले जातात ते नेहमी आपल्या सोबत राहतात त्याचबरोबर हेच ग्राहक इतर ग्राहकांना सुद्धा आपल्या उत्पादनाबद्दल कळवतात आणि अशा रीतीने आपली ग्राहकांची संख्या सुद्धा वाढत जाते.
– सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत वापरू शकता.
– हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करणार असाल तर व्यवसायाची वेबसाईट सुद्धा तयार करू शकता.
– त्याचबरोबर काही पारंपारिक मार्केटिंग पद्धती उदाहरणार्थ, पॅम्प्लेट्स ,वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात, बॅनर्स लावणे या पद्धती सुद्धा वापरू शकता.
– त्याचबरोबर सुपर मार्केट, किराणा दुकान, खानावळ, हॉटेल्स ,रेस्टॉरंट, मेस, केटरर्स यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात.
अशा रीतीने कमी गुंतवणुकीमध्ये परंतु योग्य रीतीने केल्यास चांगला नफा मिळवून देणारा असा लोणचे बनवण्याचा व्यवसाय ( Pickle Making Business) आहे.
⭕ रोपवाटीका व्यवसाय
⭕ Nursery Business
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
⭕NIACL Recruitment
⭕ न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |