Amazon Scholarship | Amazon free laptop scholarship | पात्र विद्यार्थ्यांना प्रति महा 50 हजार रुपये स्कॉलरशिप तसेच लॅपटॉप आणि इतरही फायदे | Best Scholarships 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण ॲमेझॉन मार्फत विद्यार्थ्यांसाठी जी स्कॉलरशिप ( Amazon Scholarship ) दिली जाते त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ॲमेझॉन स्कॉलरशिप ही ॲमेझॉन फ्री लॅपटॉप स्कॉलरशिप तसेच AFE- FFE Scholarship या नावाने सुद्धा ओळखली जाते. जाणून घेऊयात या स्कॉलरशिप पासून विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे, पात्रता, अर्ज कसा करायचा आणि इतर माहिती..
Amazon Scholarship | Amazon free laptop scholarship | ॲमेझॉन स्कॉलरशिप –
Advertisement
Table of Contents
Amazon Scholarship Eligibility criteria| Amazon free laptop scholarship Eligibility criteria | ॲमेझॉन स्कॉलरशिप पात्रता :
AFE – FFE स्कॉलरशिपसाठी अर्जदार पुढील पात्रता असलेले आणि भारतीय नागरिक असले पाहिजेत :
– फक्त BE/BTech/Integrated MTech कोर्सेस (शक्यतो CS/IT ब्रांचेस ) शिकणाऱ्या मुलीच शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
– फक्त प्रथम वर्षाचे अर्जदार बी.ई., बी.टेक.मध्ये जे शिकत आहेत ते उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
– 2021 नंतर अर्जदारांनी त्यांची उच्च माध्यमिक / पूर्व-विद्यापीठ / इंटरमीडिएट / CBSE/ISC किंवा समकक्ष बोर्ड पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे.
– प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम/संस्थांमध्ये प्रवेश हे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये किंवा राज्य स्तरावर आयोजित केलेल्या कौन्सिलिंग प्रोसेस द्वारे मिळालेल्या गुणवत्ता रँकवर आधारित असतात.
टीप: B.E., B.Tech कोर्सला लॅटरल बेसिस वर प्रवेश घेतलेले डिप्लोमा विद्यार्थी पात्र नाहीत.
आर्थिक पात्रता :
वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखांपेक्षा कमी असावे.
टीप: सकल उत्पन्न ( gross income) म्हणजे कर किंवा इतर कारणांसाठी वजावटीपूर्वीचे उत्पन्न.
एकूण कौटुंबिक उत्पन्नाव्यतिरिक्त, पालकांचे शिक्षण आणि व्यवसाय तसेच मोठा भाऊ आणि बहीण, कुटुंबाची राहणीमान आणि अर्जदाराच्या शिक्षणावर कुटुंबाकडून होणारा एकूण खर्च अर्जदाराची आर्थिक पात्रता ठरवण्यासाठी विचारात घेतली जाईल.
कुटुंबातील प्रथम पदवी घेत असलेल्या अर्जदारांना पदवी प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील दुसरे किंवा तिसरे अपत्य असलेल्या अर्जदारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल.
Amazon Scholarship award information/ benefits| Amazon free laptop scholarship benefits | ॲमेझॉन स्कॉलरशिप फायदे :
– लाभार्थी म्हणून निवडल्यास, विद्यार्थ्याला पदवीपर्यंत ५०,००० रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल.
– अंदाजे 500 पर्यंत AFE स्कॉलर्स सुरुवातीला निवडले जातील, ही संख्या नंतर वाढू शकते. बॅचलर पदवी मिळेपर्यंत स्कॉलरशिप चा लाभ दिला जाईल.
– रिन्यूअल हे अर्जदाराने मान्यताप्राप्त चार वर्षांच्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात अभ्यासाच्या पात्र अभ्यासक्रमात पूर्णवेळ नावनोंदणी सुरू ठेवण्यावर, त्यांच्या विद्यापीठात चांगली स्थिती राखणे आणि Amazon द्वारे हा प्रोग्रॅम सुरू ठेवण्यावर अवलंबून असते.
– आर्थिक लाभाबरोबरच, Amazon लॅपटॉप, मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटी, नेटवर्किंगच्या संधी आणि AFE स्कॉलर्सना Amazon इंटर्नशिपसाठी संधी देखील उपलब्ध करेल.
* ही स्कॉलरशिप फक्त पदवी पूर्व विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे.
* ही AFE-FFE स्कॉलरशिप अर्जदाराची जात, समुदाय किंवा धर्म विचारात न घेता सर्व विद्यार्थ्यांना,त्यामध्ये प्राधान्याने मुलींसाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक कामगिरी आणि कौटुंबिक उत्पन्न हेच या स्कॉलरशिप साठी मुख्य पात्रता निकष आहेत. लाभार्थ्याची निवड फाउंडेशन फॉर एक्सलन्सदमार्फत केली जाते.
Amazon free laptop scholarship selection process | ॲमेझॉन स्कॉलरशिप निवड प्रक्रिया :
– विद्यार्थी ऑनलाइन अर्जाद्वारे AFE – FFE स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.
– एकदा विद्यार्थ्याची पात्रता निश्चित झाल्यानंतर, विद्यार्थी 27 राज्यांमध्ये FFE च्या स्वयंसेवक “फॅसिलिटेटर्स” च्या वितरित नेटवर्कपैकी एकाशी जोडले जातात. फॅसिलिटेटर संभाव्य विद्यार्थ्याला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गरज आणि आर्थिक अडचणीची वास्तविकता निश्चित करण्यासाठी भेटतात, virtually.
– कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक क्रेडेन्शियल्सची पडताळणी केल्यानंतर, विद्यार्थी सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स आणि AFE-FFE स्कॉलरशिप साठी आवश्यक असलेल्या डॉक्युमेंट्स सह अर्ज ऑनलाइन सबमिट करतात.
– शॉर्टलिस्टेड AFE-FFE स्कॉलर्सला फॉर्ममध्ये दिलेला निबंध सबमिट करावा लागेल.
– एफएफईचा शिष्यवृत्ती कार्यक्रम प्रतिपूर्ती ( reimbursement ) मॉडेलवर आधारित आहे कारण विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी (कॉलेजचे पहिले सत्र) अर्ज केल्याच्या आधीच खर्च झालेला असतो.
– FFE हे जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही.
* अर्जदारांना ३१ मार्च २०२५ पर्यंत कळवले जाईल. पडताळणी आणि निवड झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. निवड मेरिट कम एप्लीकेशन बेसिस वर होईल. ह्या स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी सर्व अर्जदारांना लाभार्थी म्हणून निवडले जाणार नाही.
* फाउंडेशन फॉर एक्सलन्स ॲमेझॉनच्या वतीने शिष्यवृत्ती पेमेंट प्रक्रिया करते. प्रत्येक वर्षी ३१ मार्चपूर्वी एका हप्त्यात पेमेंट केले जाते.
Amazon Scholarship | Amazon free laptop scholarship | ॲमेझॉन स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याकरता आणि या बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |