Amrut Yojana | अमृत योजना | टायपिंग येत असणाऱ्यांसाठी सरकार मार्फत आर्थिक सहाय्य | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना | Amrut Yojana Online Application | Amrut Yojana Typing | Best Government schemes 2024 –

Amrut Yojana | अमृत योजना | टायपिंग येत असणाऱ्यांसाठी सरकार मार्फत आर्थिक सहाय्य | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना | Amrut Yojana Online Application | Amrut Yojana Typing | Best Government schemes 2024 –

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण अमृत योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अमृत योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांना टायपिंग येते आणि ज्यांनी त्यामध्ये सर्टिफिकेशन केलेले आहे अशा पात्र उमेदवारांना शासनामार्फत आर्थिक लाभ मिळणार आहे. अमृत योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत, यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना किती लाभ मिळणार आहे , अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती या ब्लॉगमध्ये जाणून घेऊयात…

Advertisement

Amrut Yojana | अमृत योजना | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना  –

अमृत योजनेचा उद्देश | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेचा उद्देश –

महाराष्ट्रामध्ये खुल्या प्रवर्गांमधील अमृतच्या लक्षीत गटामधील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकांमधील उमेदवारांना शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षेच्या (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमांमधून उद्योगाभिमुख स्वयंरोजगार आणि रोजगार क्षम बनवणे असा या योजनेचा उद्देश आहे.

लक्षीत गट – 

खुल्या प्रवर्गामधील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र अशा शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळा अंतर्गत समक्ष योजनेचा लाभ मिळत नाही असे खुल्या प्रवर्गामध्ये अमृतच्या लक्षित गटातील जातींचा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थी तसेच युवक आणि युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण आहेत असे उमेदवार.

Amrut Yojana Eligibility | अमृत योजना पात्रता | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना पात्रता निकष  –

– अमृत संस्थेचे जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत त्या निकषांची पूर्तता अर्जदाराने करणे बंधनकारक आहे.

– अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेकरिता कोणत्याही संस्थेमार्फत प्रोत्साहन पर आर्थिक सहाय्य घेतले नाही असे स्वयंघोषणापत्र आणि संस्थाचालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा अर्जदाराने उत्तीर्ण केली असल्याचे निकालाची सेल्फ अटेस्टेड प्रत सादर करणे बंधनकारक आहे. 

– अर्जदाराकडे  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फीची सेल्फ अटेस्टेड पावती असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराचे बँक अकाउंट हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड असे बँक अकाउंट डिटेल्स आणि रद्द केलेल्या चेकची प्रत जोडणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरूप:

– जे उमेदवार मराठी, हिंदी आणि इंग्रजी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या स्पीडने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची

 शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना एकरकमी  ६,५००/- रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक लाभ दिला जाईल.

– जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी व हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना एकरकमी  ५,३००/- रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक लाभ दिला जाईल. 

– या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.

– याव्यतिरिक्त इतर कुठलाही लाभ या योजनेअंतर्गत मिळणार नाही. 

अमृत योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेत www.mscepune.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो.

– अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 

– अर्जाची प्रत ,सेल्फ अटेस्टेड आवश्यक कागदपत्रांसहित विहित मुदतीमध्ये अमृतच्या कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक असेल.

अशा प्रकारे पात्र उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट वरुण अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

संस्थाचालकांचे घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version