Gauri Ganpati Festival Anandacha Shidha I Anandacha Shidha I गौरी गणपती उत्सवनिमित्ता आनंदाचा शिधा –

गौरी गणपती उत्सव निमित्त शासनातर्फे आनंदाचा शिधा (Anandacha Shidha ) वाटप केला जाणार आहे, याबद्दलच आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. यापूर्वी सुद्धा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती विभागामधील सर्व जिल्हे व नागपूर विभागामधील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्यरेषेवरील ( APL ) शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरामध्ये खाद्य वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या, केव्हा उपलब्ध करून देण्यात आल्या ते पुढील प्रमाणे :
– सन 2022 ची दिवाळी
– गुढीपाडवा – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023
– गौरी गणपती उत्सव व दिवाळी
– श्रीराम प्रतिष्ठा सोहळा , 2024, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रति शिधापत्रिका
आता याप्रमाणेच यावर्षीच्या म्हणजेच 2024 च्या गौरी गणपती उत्सवानिमित्त चणाडाळ, रवा, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर सोयाबीन तेल या चार गोष्टींचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रती शिधा पत्रिका एक शिधा जिन्नस वाटप करण्यात येणार आहे.
– आपल्या राज्यामधील वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती विभागामधील सर्व जिल्हे व नागपूर विभागामधील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्यरेषेवरील ( APL ) केशरी शिधापत्रिका धारकांना ( एकूण १,७०,८२,०८६ ) गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे.
– एक किलो रवा
– एक किलो चणाडाळ
– एक किलो साखर
– एक लिटर सोयाबीन तेल
यावर्षी म्हणजेच 2024 ला गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिदा मिळणार असून 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या तारखेदरम्यान इपॉस प्रणाली द्वारे शंभर रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे.
* आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक असलेले शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी Mahatenders या online पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात ऐवजी ८ दिवसांच्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यता दिली आहे.
आपल्याला एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल १०० रुपयांमध्ये मिळणार आहे.
यासाठी खर्च अंदाजे किमतीनुसार ५४३.२१ कोटी व इतर अनुषंगिक खर्च १९.३ कोटी असा एकूण ५६२.५१ कोटी अंदाजे खर्चाला मान्यता दिली गेलेली आहे.
अशाप्रकारे गौरी गणपती उत्सव निमित्त वर सांगितल्याप्रमाणे पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा ( Anandacha Shidha ) मिळणार आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी नक्कीच याचा लाभ घेतला पाहिजे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |