अपार आयडी कार्ड | APAAR ID CARD – ONE NATION ONE STUDENT ID CARD |APAAR (Automated Permanent Academic Account Registry ID)

अपार आयडी कार्ड | APAAR ID CARD – ONE NATION ONE STUDENT ID CARD |APAAR (Automated Permanent Academic Account Registry ID)

     अगदी कुठलेही शिक्षण घेत असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्यांनी आत्तापर्यंत मिळवलेले मार्क्स किंवा इतर यश याबद्दलची माहिती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रीझुम तयार करतात आणि त्यामध्ये ही सर्व माहिती टाकतात. परंतु आता असे एक आयडी कार्ड आले आहे की ज्याद्वारे तुम्ही आतापर्यंत मिळवलेले मार्क्स तसेच इतर कौशल्य व संपादन केलेले यश याबद्दलची सर्व माहिती या कार्डमध्ये सेव करता येईल आणि ते कार्ड आहे “अपार आयडी कार्ड”

Advertisement
.याचा नक्कीच खूप उपयोग सर्वच विद्यार्थ्यांना होईल.चला तर जाणून घेऊया अपार आयडी कार्ड बद्दल अधिक माहिती….

लाँग फॉर्म –

APAAR – Automated Permanent Academic Account Registry ID

अपार आयडी कार्ड | APAAR ID CARD –

– भारत सरकारने अपार आयडी कार्ड जारी करण्यासाठी अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC बँक) सुरू केली. हे कार्ड एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री म्हणून काम करते, ज्याला ‘इज्युलॉकर ’ म्हणून संबोधले जाते.

– भारतातील खाजगी आणि सरकारी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ” अपार आयडी कार्ड ” हे डिजिटल आय डी आहे. 

– अपार आयडी कार्डचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्रेडिट, पदव्या आणि इतर माहिती ऑनलाइन गोळा करता यावी हे आहे.

– तसेच एका शाळेतून दुसर्‍या शाळेत ट्रान्सफर करणे सुद्धा  ह्या कार्ड मुळे सोपे होईल. 

– शाळा आणि महाविद्यालये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे कार्ड देऊ शकतात. 

–  नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी अपार कार्ड डाउनलोड करू शकतात. 

–  12-अंकी अपार क्रमांक असणार आहे आणि हा युनिक ओळख क्रमांक असेल.ह्या कार्ड द्वारे विद्यार्थी शैक्षणिक नोंदी सोयीस्करपणे संग्रहित करू शकतात.

– अपार आयडी कार्ड मुलांच्या आधार कार्ड क्रमांकाशी सुद्धा जोडले जाणार आहे. 

अपार आयडी कार्डचे फायदे | Benefits of APAAR ID card

– अपार आयडी कार्ड हा लाईफ लाँग आयडी क्रमांक असणार आहे आणि जो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास आणि यशाचा मागोवा ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे.

– सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांच्या जसे की  शाळा, पदवी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षणासह अगदी सर्वच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदींचा मागोवा अपार आयडी कार्ड घेईल.

– अपार आयडी कार्ड विद्यार्थ्याचा सर्वच डेटा एका ठिकाणी डिजिटली सेव्ह करेल, त्या मध्ये परीक्षेचे निकाल, रिपोर्ट कार्ड, हेल्थ कार्ड, ऑलिम्पियाडमध्ये रँकिंग तसेच इतर  विशेष कौशल्य प्रशिक्षण घेणे, शिष्यवृत्ती, बक्षिसे इ.

– तसेच एका शाळेतून दुसर्‍या शाळेत ट्रान्सफर करणे सुद्धा  ह्या कार्ड मुळे सोपे होईल. 

– तसेच गव्हर्मेंटला अशा विद्यार्थ्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित करता येईल की जे मधेच आपले शिक्षण सोडून देतात आणि त्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करता येईल.

– सर्वात महत्वाची गोष्ट अपार आयडी थेट ABC बँकेशी जोडला जाईल, त्यामुळे जेव्हा एखादा विद्यार्थी सेमिस्टर किंवा कोर्स पूर्ण करतो तेव्हा क्रेडिट्स थेट ABC मध्ये झळकतील आणि हे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व्हॅलिड असेल.

– विद्यार्थ्यांचे अपार आयडीद्वारे डिजीलॉकर खाते तयार केले जाईल.

– सरकारकडून सरकारी योजनेचे लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अपार आयडी कार्डचा उपयोग होईल.

– अपार आय डी द्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आलेला क्रेडिट स्कोअर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विद्यापीठांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांसाठी वापरला जाऊ शकतो.

– विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो, क्रीडा उपक्रम, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, पुरस्कार इत्यादी माहिती अपार आयडी कार्ड द्वारे मिळू शकते.

अपार आयडी नोंदणी  | रजिस्ट्रेशन –

– अपार आयडी कार्ड नोंदणी करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 

– विद्यार्थ्यांनी डिजीलॉकरवर खाते तयार करणे आवश्यक आहे,जे ई-केवायसीसाठी वापरले जाईल. 

– शाळा आणि महाविद्यालयांनी पालकांची संमती घेतल्यानंतरच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी कार्डसाठी नोंदणी सुरू करणे आवश्यक आहे. पालक अगदी कधीही त्यांची संमती मागे घेऊ शकतात.

–  शाळा आणि महाविद्यालयांनी मुलांना एक फॉरमॅट फॉर्म द्यावा, जो पालकांनी भरून सबमिट करावा. पालकांची संमती घेतल्यानंतरच शाळा आणि महाविद्यालये अपार आयडी कार्ड तयार करतील.

अपार आयडी नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया –

–  https://www.abc.gov.in/ (ABC बँक) वेबसाइटला भेट द्या. 

– ‘माय अकाउंट’ वर क्लिक करा आणि ‘विद्यार्थी’ पर्याय निवडा. 

-DigiLocker खाते तयार करण्यासाठी ‘साइन अप’ वर क्लिक करा आणि मोबाइल, पत्ता आणि आधार कार्ड इत्यादी डिटेल्स व्यवस्थित भरा. 

-क्रेडेन्शियल्स वापरून DigiLocker खात्यात लॉग इन करा. 

– केवायसी पडताळणी करण्यासाठी डिजिलॉकर आधार कार्ड तपशील ABC सोबत शेअर करण्यासाठी तुमची संमती विचारेल. ‘मी सहमत आहे’ असे निवडा.

– शैक्षणिक माहिती जसे की शाळा किंवा विद्यापीठाचे नाव, वर्ग, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी व्यवस्थित रित्या भरून फॉर्म सबमिट करा,ह्या नंतर अपार आयडी कार्ड तयार केले जाईल.

अपार आयडी कार्ड डाउनलोड – 

https://www.abc.gov.in/ (ABC बँक) वेबसाइटवर लॉग इन करा. 

डॅशबोर्डवर, ‘APAAR कार्ड डाउनलोड’ या ऑप्शनवर क्लिक करून त्या ठिकाणावरून अपार आयडी कार्ड डाऊनलोड करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment