आयुषमान भारत योजना कार्ड  | Ayushman Bharat Yojana Card |प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना –

आयुषमान भारत योजना कार्ड  | Ayushman Bharat Yojana Card |प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना –

     सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आरोग्य विमा काढणे हे खूप गरजेचे झाले आहे. परंतु सर्वांनाच आरोग्य विमा काढणे परवडेलच असे नाही काहींची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आरोग्य विमा काढणे त्यांना शक्य होत नाही म्हणूनच आता आयुष्मान भारत योजना कार्ड

Advertisement
 ही योजना सुरू झाली आहे ,या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…

आयुषमान भारत योजना कार्ड  | Ayushman Bharat Yojana Card | प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना –

–  आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ही योजना सुरू केली. 

– आपल्या देशातील 40 कोटीं पेक्षा जास्त नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचे लक्ष्य सरकारचे आहे.

– प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. 

– तसेच या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलीकृत रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार सुद्धा दिले जातील.

– आयुष्मान भारत या योजनेला जन आरोग्य योजना म्हणून सुद्धा ओळखले जाते.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे फायदे | Benefits of Pradhanmantri Ayushman Bharat Yojana –

– या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.

– या योजनेंतर्गत औषधांचा आणि उपचाराचा खर्च शासन करणार असून जवळपास 1350 आजारांवर उपचार केले जाणार आहेत,त्यामुळे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.

– या योजनेअंतर्गत 10 कोटीं पेक्षा अधिक दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबाचा समावेश केला जाणार आहे.

– 2011 मध्ये जी कुटुंबे लिस्टेड आहेत त्यांचाही PMJAY या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Pradhanmantri Ayushman Bharat Yojana –

– शिधापत्रिका

– पत्त्याचा पुरावा

– कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड

– मोबाईल नंबर

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज | Application

– pmjay.gov.in ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे चेक करू शकता आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.

– ह्या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

✓ ह्या योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या लोकसेवा केंद्र (CSC) वर जाऊन तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती त्या ठिकाणी सबमिट कराव्या लागतील.

✓त्यानंतर तुम्ही सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि योजनेअंतर्गत नोंदणी सुनिश्चित केली जाते.

✓ त्यानंतर काही दिवसांनंतर कार्ड प्रदान केले जाते. त्या नंतर नोंदणी यशस्वी होते.

आयुष्मान भारत योजना: हेल्पलाइन क्रमांक

टोल-फ्री कॉल सेंटर नंबर- 14555/1800111565

ह्या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी: येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment