अटल पेंशन योजना | Atal Pension scheme

अटल पेंशन योजना | Atal Pension scheme –

     केंद्र सरकारतर्फे तसेच राज्य सरकारतर्फे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना आहे अटल पेन्शन योजना. या योजनेबद्दलच अधिक माहिती आज आपण बघणार आहोत..

अटल पेंशन योजना | Atal Pension Yojana –

Advertisement

– केंद्र सरकार मार्फत 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

– वरिष्ठ नागरिकांना जर इतर कुठला आर्थिक आधार नसेल तर अशावेळी त्यांना इतर कुणाकडून मदत घ्यावी लागते परंतु त्याऐवजी जर त्यांना पेन्शन मिळाले तर नक्कीच त्यांच्यासाठी चांगले होईल. 

– अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दर महिन्याला काही ठराविक रक्कम भरावी लागते व आपल्याला वय वर्ष साठ पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

अटल पेंशन योजना पात्रता | Atal Pension Yojana Eligibility –

– वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष

– जी व्यक्ती आयकर भरते ती व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

– अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये खाते उघडावे लागेल.

– असंघटित क्षेत्रातील कामगार अटल पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत.

दर महिन्याला किती रक्कम भरल्यास साठ वर्षांनंतर दर महिन्याला किती पेन्शन मिळू शकेल ?

अटल पेंशन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Documents required for Atal Pension Yojana –

– अर्जदाराचे आधार कार्ड

– ओळखपत्र

– अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डसोबत लिंक असावे.

-मोबाइल नंबर

– रहिवासी पुरावा

– पासपोर्ट साईझ फोटो

अटल पेंशन योजनेसाठी नियम व अटी | Terms and conditions –

– लाभार्थीच्या अकाउंट मधून दर महिन्याला ठराविक रक्कम कट होते, त्यामुळे जेवढी रक्कम आपण या योजनेसाठी भरत आहोत ती रक्कम अकाउंट मध्ये ठेवावी.

– पहिली रक्कम आपण ज्या दिवशी भरतो शक्यतो दर महिन्याला त्याच तारखेला रक्कम कट केली जाते.

– जर रक्कम भरण्यामध्ये काही उशीर झाला तर ठराविक दंड सुद्धा आकारण्यात येईल.

अटल पेन्शन योजनेसाठी फॉर्म | Application for Atal Pension Yojana –

– बँकेमध्ये जाऊन एपीआय फॉर्म म्हणजेच अटल पेन्शन योजनेसाठी लागणारा फॉर्म घेऊन त्या संबंधित सर्व माहिती त्यांना विचारू शकता आणि त्यानंतर फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्यांच्याकडे सबमिट करा.

– तसेच ऑनलाईन सुद्धा हा फॉर्म डाऊनलोड करू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.

– तसेच PFRDA च्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment