गावामध्ये सुरू करता येतील असे पाच व्यवसाय | 5 Businesses You Can Start in a Village

      व्यवसाय हे आजूबाजूच्या परिसरावर सुद्धा अवलंबून असतात म्हणजेच काही व्यवसाय असे असतात की जे फक्त शहरात चालू शकतात तर काही व्यवसाय असे असतात की ते फक्त गावांमध्ये आपण सुरू करू शकतो. तर काही व्यवसाय अगदी गावात किंवा शहरात कुठेही सुरू केले जाऊ शकतात. आज आपण असेच काही व्यवसाय बघणार आहोत की जे गावांमध्ये आपण सुरू करू शकतो…

१ . खते/ कीटकनाशकांचे दुकान –

    गावामध्ये आवर्जून शेती केली जाते. शेतीसाठी खते तसेच कीटकनाशके अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजेच आपल्या गावामध्ये नेमकी कोणती पिके घेतली जातात याचा अभ्यास करून त्यानुसार खते किंवा कीटकनाशकांचे दुकान सुरू करता येऊ शकते.

२ . कपड्याचे दुकान –

  गावामध्ये शहरी भागासारखी जास्त कपड्याचे दुकाने उपलब्ध नसतात, त्यामुळे पहिल्यापासून जरी थोडेफार कपड्याचे दुकान गावांमध्ये उपलब्ध असले तरीसुद्धा अजून कपड्याचे दुकान आपण सुरू करू शकतो. आपण आपल्या दुकानांमध्ये कपड्याची किती व्हरायटी ठेवतो तसेच कपड्याची क्वालिटी कशी आहे ,दर काय आहे यानुसार ग्राहक ठरवतात की कोणत्या कपड्याच्या दुकानांमधून खरेदी केली पाहिजे. त्यामुळे कपड्याचे दुकान सुरू करणे हा सुद्धा फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

३ . डेअरी सेंटर –

   गावामध्ये हमखास घरोघरी गाई, शेळ्या ,म्हशी असतात त्यामुळे डेअरी सेंटर सुरू करणे सहज शक्य आहे. हा व्यवसाय फायदेशीर सुद्धा आहे. डेअरी सेंटरमध्ये विविध लोकांकडून दूध एका ठिकाणी जमा केले जाते आणि दुधाचा एकत्रित साठा दुसरीकडे पाठवला जातो तसेच शहरी ठिकाणी सुद्धा दूध वितरित केले जाऊ शकते.

४ . किराणा स्टोअर – 

गावामध्ये किराणा स्टोअर असणे खूप महत्त्वाचे आहे कारण गावातील बरेचसे लोक वस्तीवर म्हणजेच गावापासून दूर राहत असतात त्यामुळे नेहमीच गावापासून दूर किंवा शहरी भागामध्ये जाऊन किराणा आणणे किंवा इतर सामान आणणे त्यांना शक्य नसते.त्यामुळे गावामध्येच जर किराणा दुकान सुरू केले तर नक्की हा सुद्धा फायदेशीर व्यवसाय ठरेल. गावात एकापेक्षा अधिक किराणा दुकान असले तरीसुद्धा हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

५ . पिठाची गिरणी –

शहरी भागामधील बरेचसे लोक पॅकेजड फ्लोअर/पॅकिंग मध्ये उपलब्ध असलेले पीठ वापरतात परंतु गावामध्ये शक्यतो असे पीठ वापरले जात नाही,कारण त्या ठिकाणी धान्याची उपलब्धता असते मग त्यामध्ये गहू ,ज्वारी, बाजरी, मका अशा विविध धान्यांचा समावेश होतो. म्हणूनच गावातील लोक त्यांच्याकडील धान्य पिठाची गिरणी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन दळून घेतात. हल्ली जरी छोट्या पिठाच्या गिरण्या उपलब्ध असल्या तरीसुद्धा प्रत्येक घरातील लोक ते घेतातच किंवा घेऊ शकतीलच असे नाही त्यामुळे एक साईड बिझनेस म्हणून हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करावा ?

Advertisement

Leave a Comment