Axis Bank Young Banker’s Program (ABYB) | अॅक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम | Best training programs 2025
आजच्या ब्लॉगमध्ये अॅक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम ( Axis Bank Young Banker’s Program ) या प्रोग्राम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…
Axis Bank Young Banker’s Program (ABYB) | अॅक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम | Best training programs 2025
Table of Contents
अॅक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम (Axis Bank Young Banker’s Program ) का निवडावा ?
हा प्रोग्रॅम अॅक्सिस बँकेने एनआयआयटी आयएफबीआयच्या सहकार्याने सुरू केलेला एक इनिशिएटिव्ह आहे आणि भविष्यासाठी तयार रेडी बँकिंग प्रोफेशनलला तयार करण्यासाठी कॅम्पस आणि ऑन द जॉब लर्निंग यांचे कॉम्बिनेशन आहे.
वैशिष्ट्ये :
- ॲक्सिस बँक सोबत सुरुवात करण्याची संधी.
- अॅक्सिस बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून खात्रीशीर नोकरी मिळवण्याची संधी.
- एक वर्षाचा NIIT युनिव्हर्सिटी कडून पीजी डिप्लोमा.
- एमबीए लेव्हल स्टार्टिंग सॅलरी ४.४ LPA onwards
Axis Bank Young Banker’s Program Earning potential :
प्रोग्रॅम दरम्यान कमाईची शक्यता ~ रु. २.१५ लाख
- ४ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. ५,००० चा स्टायपेंड मिळवा.
- अॅक्सिस बँकेत ३ महिन्यांच्या इंटर्नशिप दरम्यान दरमहा रु. २४,४९१ कमवा.
- अॅक्सिस बँकेत ५ महिन्यांच्या ऑन द जॉब ट्रेनिंग दरम्यान पगार सुरू होतो.
- अॅक्सिस बँकेकडून सोप्या ईएमआयवर शैक्षणिक कर्ज उपलब्ध.
प्रोग्रॅम फी:
रु. २,३७,२८८/- (१८% जीएसटी वगळून)
Axis Bank Young Banker’s Program Structure | प्रोग्रॅम स्ट्रक्चर :
- ४ महिने निवासी प्रशिक्षण / residential Training @ NIIT विद्यापीठ
- ३ महिने इंटर्नशिप @ अॅक्सिस बँक शाखेत
- ५ महिने नोकरीचे प्रशिक्षण @ अॅक्सिस बँक शाखेत
- पदव्युत्तर पदविका/ Post Graduate Diploma
4 Months Residential Training @ NIIT University | ४ महिने निवासी प्रशिक्षण
- बँकिंग एन्व्हायरमेंट
- कम्युनिकेशन फॉर बँकर्स
- कस्टमर सर्विस
- कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट
- बँकिंग प्रोडक्ट अँड इट्स प्रोसेस
- डाटा ड्रीवन डिसिजन मेकिंग
- मार्केटिंग फोर बँकर्स
- बँकिंग ऑपरेशन्स फॉर रिटेल कन्सुमर्स
- सेलिंग स्किल्स
- फायनान्शियल प्लॅनिंग
- Finacle वर्कशॉप
Eligibility criteria | पात्रता निकष
पात्रता: पदवीच्या अंतिम वर्षात ५०% आणि त्याहून अधिक गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर किंवा पदवीच्या सर्व वर्षांमध्ये एकूण ५०% आणि त्याहून अधिक गुणांसह.
पदवी/पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील ज्या उमेदवारांनी त्यांची परीक्षा दिली आहे आणि निकालाची वाट पाहत आहेत ते देखील या प्रोग्राम साठी पात्र आहेत. परंतु अकादमीमध्ये सामील होताना मूळ अंतिम वर्षाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ग्रॅज्युएशन डीग्री (१०+२+३ पॅटर्न) अनिवार्य आहे.
वय: ३० वर्षांपेक्षा जास्त नाही
आवश्यक कागदपत्रे :
पत्त्याचा पुरावा/ओळखपत्र/स्वाक्षरीचा पुरावा
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदार ओळखपत्र
- नरेगा कार्ड
जन्मतारखेचा पुरावा (कोणतेही १ कागदपत्र)
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- एसएससी/एचएससी प्रमाणपत्र
- निवडणूक कार्ड/मतदार कार्ड
आवश्यक ओळखपत्र
- पॅन कार्ड (अनिवार्य)
- यूआयडीएआयने दिलेले आधार कार्ड (अनिवार्य)
शैक्षणिक प्रमाणपत्रे (सर्व मूळ कागदपत्रे)
- १०वी एसएससी आणि १२वी एचएससी गुणपत्रिका
- पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Selection Process I निवड प्रक्रिया
स्टेप १:
या साइटवर तुमचा ऑनलाइन अर्ज भरून रजिस्टर करा. कृपया लक्षात ठेवा, तुमचा अर्ज पूर्ण झाल्यावरच पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाईल, ज्यामध्ये अर्ज फी भरणे समाविष्ट आहे. ही अर्ज शुल्क फी असेसमेंटसाठी आहे आणि यंग बँकर्स प्रोग्रामसाठी किंवा अॅक्सिस बँकेत नोकरीसाठी निवडीची हमी देत नाही.
स्टेप २: सिलेक्शन प्रोसेस मध्ये प्रोक्टोर केलेले ऑनलाइन असेसमेंट आणि फेस टू फेस इंटरॅक्शन असे २-टप्पे असतात.
अ. लेव्हल १/ लेखी परीक्षा: वर्बल ऍबिलिटी, ऍनालिटीकल ऍबिलिटी, न्यूमेरिकल ऍबिलिटी, लेखी इंग्रजी चाचणी, ऐकण्याची आकलन चाचणी
ब. लेव्हल २/ व्हिडिओ मुलाखत: ऑनलाइन एआय व्हिडिओ असेसमेंट
क. एनआयआयटी पॅनेलशी फेस टू फेस इंटरॅक्शन
स्टेप ३:
निवडलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र दिले जाईल. प्रवेशाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना कॅम्पसमध्ये नोंदणी केली जाईल.
लर्निंग आऊट कम्स :
- रोल क्लॅरिटी
- नॉलेज आणि टूल सेट
- ग्रुमिंग अँड कम्युनिकेशन
- कस्टमर सर्विस
- डीपन कस्टमर रिलेशनशिप
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |