बँक ऑफ बडोदा 👌मासिक उत्पन्न योजना । mis scheme in bank of baroda | MIS scheme in marathi
बँक ऑफ बडोदा Monthly Income Scheme काय आहे ?
“बँक ऑफ बडोदाची मासिक उत्पन्न योजना ही एक फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे.
यामध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम एकदाच गुंतवता, आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळतं.”
बँक ऑफ बडोदा {MIS } या योजनेत कोण कोण गुंतवणूक करू शकत
गुंतवणूक करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असायला हवा
एक व्यक्ती किंवा संयुक्त खाते तुम्ही खोलू शकणार आहात
१० वर्ष किंवा जास्त वयाच्या व्यक्ती या मध्ये खाते उघडू शकणार आहे
कोणतीही संस्था भागीदारी मध्ये खाते खोलू शकणार आहे पण ती संस्था रेजिस्टेंड पाहिजे
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफt
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
बँक ऑफ बडोदा {MIS } फायदे कोण कोणते आहे
१. मासिक व्याज मिळतो – दर महिन्याला निश्चित रक्कम बँकेतून तुमच्या खात्यात जमा होते.
2. सुरक्षित गुंतवणूक – सरकारी मालकीची बँक असल्याने गुंतवणूक सुरक्षित आहे.
3. ऑटो क्रेडिट सुविधा – व्याज थेट तुमच्या सेव्हिंग खात्यात जमा केलं जातं.
4. वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर – ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दराचा लाभ मिळतो.
5. Loan Against FD – FD वर कर्ज घेण्याची सोय आहे.
बँक ऑफ बडोदा {MIS } या योजनेचे नियम
किमान गुंतवणूक: ₹१,०००
आणि १०० रुपयांच्या पटीत रक्कम कितीही वाढवता येते
उदाहरणार्थ :– या मध्ये तुम्ही १००० , १२०० , १५०० , अशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकता पण १२१० , १५२० अशा प्रकारे नाही करू शकत
बँक ऑफ बडोदा {MIS } कालावधी काय आहे
गुंतवणूक कालावधी: कमीत कमी १२ महिने म्हणजे एक वर्ष आणि जास्तीत जास्त १२० महिने म्हणजेच १० वर्षांपर्यंत या पेक्षा जास्त वर्षेंसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही
बँक ऑफ बडोदा {MIS } व्याजदर किती आहे
जर तुम्ही १ वर्षासाठी गुंतवणूक केली तर —– सामान्य नागरिकांना -६. ८५% व्याजदर मिळतो
जेष्ठ नागरिकांना —-७.३५% व्याजदर मिळतो
जर तुम्ही १ वर्षापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक केली तर
सामान्य नागरिकांना —- ७. ००% व्याजदर मिळेल
जेष्ठ नागरिकांना —-७. ५०% व्याजदर मिळेल
८० वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना ७. ६०% व्याजदर मिळेल
मासिक व्याज तुमच्या खात्यात जमा केलं जातं
वरिष्ठ नागरिकांना विशेष व्याजदराचा लाभ
बँक ऑफ बडोदा {MIS } नॉमिनेशन
जर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचे सर्व पैसे हे त्यांनी ज्या व्यक्तीला नॉमिनी लावलं आहे त्याला दिले जातात
यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीच नाव वय त्या व्यक्ती सोबत तुमचं नातं काय आहे त्याचे सर्व कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतात.
आणि महत्व्याच म्हणजे तुम्ही ३ व्यक्तींचं नाव नॉमिनी म्हणून देऊ शकता
बँक ऑफ बडोदा {MIS } टॅक्स किती लागेल
जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि ५० हजारांपेक्षा जास्त व्याज तुम्हाला एका वर्षात मिळालं तर त्यावर tds कपात केली जाईल ५० हजारांपेक्षा कमी व्याज मिळालं तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही
जर तुम्ही जेष्ठ नागरिकांना असाल तर १ लाखांपेक्षा जास्त व्याज तुम्हाला एका वर्षात मिळालं तर त्यावर tds कपात केली जाईल पण जर तुमहाल १ लाखानपेक्षा कमी व्याज मिळालं तर त्यावर कोणताही टॅक्स तुमहाला भरावा लागणार नाही
बँक ऑफ बडोदा {MIS } कर्ज सुविधा
तुमच्या खात्यात जमा रकमेच्या ९५% कर्ज तुम्हाला मिळू शकत
समजा तुमच्या खात्यामध्ये
२००००० आहे तर तुम्ही १९०,००० पर्यंत कर्ज तुम्ही घेऊ शकणार आहात
बँक ऑफ बडोदा {MIS } खात कसं ओपन करायचं
तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या बँक ऑफ बडोदा च्या कोणत्याही शाखे मध्ये जाऊन अकाउंट ओपन करू शकता बँकेत जाताना KYC डॉक्युमेंट्स सोबत बँकेत भेट द्या किंवा बँक ऑफ बडोदा नेट बँकिंग वरून देखील खात उघडू शकता किंवा बँक ऑफ बडोदा च्या मोबाइल अप्लिकेशन वरून देखील खात उघडू शकता
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |