Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया | Best business ideas 2024

Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –

   हल्ली अगदी कुठलाही कार्यक्रम असेल तरीसुद्धा डेकोरेशन केले जाते आणि त्यामध्ये महत्त्वाचे रोल प्ले करतात ते म्हणजे फुले आणि फुगे. काही लोक फुलांचे डेकोरेशन करणे पसंत करतात तर काही लोक फुग्यांचे डेकोरेशन करणे पसंत करतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बलून डेकोरेटर बिजनेस ( Balloon decorator business) कसा सुरू करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

Balloon decorator business

1. व्यवसाय योजना तयार करा | balloon decorator business plan –

– बलून डेकोरेटर हा व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना तयार करा त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो..

– हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर तुम्ही सुरू करणार आहात त्यानुसार किती गुंतवणूक लागू शकेल ?

– बलून सप्लायर किंवा क्लाइंट्स

– आवश्यक परवाने

यांसारख्या गोष्टींचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होईल. व्यवसाय योजना तयार केल्यामुळे आपल्याला आपल्या गोल्स वर जास्त प्रमाणामध्ये फोकस करता येते आणि ग्राहकांना टार्गेट करण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होतो.

2. आवश्यक परवाने | Licences required for balloon decorator business –

आपल्या देशामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या परवान्यांची आवश्यकता आहे ती परवाने काढणे गरजेचे आहे मग त्यामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन, जीएसटी रजिस्ट्रेशन यांसारख्या परवान्यांचा समावेश होऊ शकतो.

3. ठिकाण निवड | Location for Balloon decorator business –

– बलून डेकोरेटर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच मोठ्या जागेची आवश्यकता नाही हा व्यवसाय तुम्ही अगदी घरामधून सुरू करू शकता परंतु आपला ऑनलाईन प्रेझेन्स चांगला असणे गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय पोहोचू शकेल.

– कालांतराने जसा आपला व्यवसाय वाढू लागेल त्यावेळी आपण यासाठी एखादे ऑफिस तयार करू शकतो आणि आपली टीम सुद्धा वाढवू शकतो.

4 . सर्विसेस आणि चार्जेस | Services under balloon decorator business and charges –

बलून डेकोरेटर या व्यवसाय अंतर्गत विविध सर्विसेस येऊ शकतात, त्या पुढील प्रमाणे त्यापैकी आपण कोणत्या सर्विसेस देणार आहोत ते निश्चित करा आणि योग्य ते चार्जेस सुद्धा ठरवा.

१. ईव्हेंटसाठी बलून डेकोर

२. थीम पार्टी अँड इव्हेंट्स

३. बॅलून रिलीझेस अँड ड्रॉप्स

४. बलून स्कल्प्चर्स अँड इन्स्टॉलेशन्स

५. बलून प्रिंटिंग

६. बलून डिलिव्हरी/बलून होलसेलर्स

७. बलून ट्विस्टिंग अँड एंटरटेनमेंट 

८. DIY बलून किट्स

९. बलून डेकोरेशन वर्कशॉप्स

१०. ट्रेनिंग/कन्सल्टन्सी सर्विसेस

5 . Balloon decorator business साठी महत्त्वाच्या गोष्टी –

* जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करायचा असेल तर एक टीम तयार करणे आपल्याला आवश्यक आहे.

* फुग्यांची खरेदी शक्यतो मॅन्युफॅक्चरर कडून किंवा होलसेलर कडून करावी जेणेकरून प्रॉफिट मार्जिन चांगले निघेल.

6 . बलून डेकोरेटर व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी | How to do marketing of Balloon decorator business –

अगदी कोणत्याही व्यवसायासाठी त्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य पद्धतीने होणे अतिशय महत्त्वाचे आहे जर मार्केटिंग योग्य पद्धतीने केली आणि आपल्याला कस्टमर मिळत गेले तर आपला व्यवसाय नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तर बघूया आता बलून डेकोरेटर व्यवसायाची मार्केटिंग कशी करता येईल :

– बलून डेकोरेटर व्यवसायासाठी ऑनलाईन प्रेझेंस असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच आपली स्वतःची वेबसाईट असणे गरजेचे आहे त्यासोबतच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले अकाउंट असणे किंवा आपल्या ब्रँडचे पेजेस असणे आवश्यक आहे.

– जर आपल्याला व्यवसायाच्या सुरुवातीलाच वेबसाईट सुरू करणे शक्य नसेल तर किमान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध असणे आवश्यक आहे, याचे कारण असे की या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचे डेकोरेशन यापूर्वी केलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे डेकोरेशन आपण करू शकतो याबद्दलचे फोटोज यावर आपण अपलोड करू शकतो आणि यामुळे आपल्या ग्राहकांना डेकोरेशन बद्दल एक पूर्वकल्पना मिळते आणि त्यामुळे ते आपले ग्राहक बनण्याचे शक्यता सुद्धा वाढते.

– ई-मेल मार्केटिंग ही पद्धत सुद्धा वापरू शकता.

– आपले जे नेटवर्क आहे त्याद्वारे सुद्धा आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

– विविध इव्हेंट वेंडर्स सोबत कोलॅब करू शकता.

– विविध ऑफर्स किंवा डिस्काउंट ऑफर करू शकता.

– आपल्या पूर्वीच्या ग्राहकामार्फत सुद्धा चांगली ॲडव्हर्टायझिंग करता येऊ शकते, आपले काम जर आपले यापूर्वीचे ग्राहक आहे त्यांना आवडले तर हेच ग्राहक नक्कीच दुसऱ्या ग्राहकांना सुद्धा आपल्या बलून डेकोरेटर बिजनेस बद्दल कळवतील आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ग्राहक मिळू शकतात.

    अशा रीतीने बलून डेकोरेटर बिजनेस ( Balloon decorator business) सुरू करता येणे शक्य आहे.

⭕ लखपती दीदी योजना 

⭕जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/lakhpati-didi-yojana/?amp=1

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment