Best Business Ideas For 2025 I बिझनेस आयडियाज I Low investment business idea I Best business ideas 2025
काहीजण नोकरी करतात तर काहीजण व्यवसाय करतात प्रत्येकाच्या गरजा सुद्धा वेगवेगळ्या असतात. काही जणांना नोकरी करत असून सुद्धा व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु भांडवलाची कमतरता किंवा इतर काही अडचणी यामुळे व्यवसाय सुरू करता येत नाही. जर कमी भांडवलामध्ये चांगला व्यवसाय सुरू करता आला तर व्यवसाय करू इच्छिणारे बरेच लोक व्यवसाय करू शकतील. व्यवसाय हा फक्त भांडवलावर अवलंबून नसून तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे यावर सुद्धा अवलंबून असतो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही बिझनेस आयडियाज ( Best Business Ideas For 2025 ) जाणून घेणार आहोत…
Best Business Ideas For 2025 I बिझनेस आयडियाज I Low investment business idea I Best business ideas 2025
Table of Contents
Best Business Ideas For 2025
Best Business Ideas For 2025 I बिझनेस आयडियाज I Low investment business idea I Best business ideas 2025
Print on Demand | प्रिंट ऑन डिमांड :
कस्टम प्रॉडक्ट्स विकणे ही एक बिझनेस आयडिया आहे प्रिंट ऑन डिमांड (POD) या वाढत्या व्यवसायामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डिझाइनसह कस्टम प्रॉडक्ट विकता येतात.
तुम्हाला स्वतः कोणतेही प्रॉडक्ट बनवण्याची किंवा स्टोअर करण्याची गरज नाही. तुम्हाला इन्व्हेंटरी ठेवण्याची काळजी करण्याची गरज नाही.
रेड बबल आणि टीस्प्रिंग यांनी कस्टम टी-शर्ट विकून सुरुवात केली. आता त्यांची किंमत लाखो आहे.
steps:
१. एक खास तुमचे आवडीचे क्षेत्र निवडा: त्या खास क्षेत्राशी संबंधित डिझाइन तयार करा. संबंधित इंस्टाग्राम पेज वापरा.
२. एक पार्टनर शोधा:क्विक लिंक, blink स्टोअर किंवा प्रिंटरोव्ह सारख्या प्रिंट ऑन डिमांड पार्टनरसह रजिस्ट्रेशन करा.हे प्लॅटफॉर्म प्रॉडक्ट पासून शिपिंगपर्यंत सर्वकाही हाताळतात.
३. डिझाइन तयार करा आणि अपलोड करा: डिझाइन बनवणे आणि अपलोड करणे सुरू करा. जर तुमच्याकडे डिझाइन कौशल्ये नसतील तर कोर्स करा किंवा फ्रीलांसर अपॉइंट करा.
४. विक्री सुरू करा: तुमच्या उत्पादनांचे Amazon, Flipkart, Instagram आणि Facebook वर मार्केटिंग करा.
Ebook :Best Business Ideas For 2025
हल्लीच्या युगामध्ये ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना तर ईबुकचा फायदा होतोच त्यासोबतच सध्या नवनवीन स्किल्स मार्केटमध्ये येत आहेत आणि त्या स्किल चा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो हे स्किल्स शिकण्यासाठी बरेच लोक ईबुकचा उपयोग करतात.
तसेच वेगवेगळे कोर्सेस हे सुद्धा ई-बुक मार्फत सेल केले जातात.
शहरांमध्ये लोकांसोबतच गावांमध्ये सुद्धा जवळपास सर्व लोकांकडे सध्या मोबाईल आहेत त्यामुळे ई बुकचा फायदा बरेच लोक करून घेतात.
ईबुक ही एक अशी व्यवसाय कल्पना सुद्धा आहे की तुम्ही स्वतः ई-बुक लिहून ते प्रतिलिपी, ॲमेझॉन किंडल, मातृभारती यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सेल करू शकता.
चाट जीपीटी सारख्या प्लॅटफॉर्म चा उपयोग करून सुद्धा तुम्हाला ई-बुक लिहिता येऊ शकते आणि कॅनव्हासारख्या ॲपचा उपयोग करून ते ई बुक तुम्ही डिझाईन करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स तयार करून सेल करायचा असेल तर Udemy, teachable, sellfy,gum road यांसारखे वेबसाईटवर सेल करू शकता.
ई बुक बनवण्यासाठी तुम्ही योग्य टॉपिक निवडणे खूप गरजेचे आहे तसेच जर क्वालिटी कंटेंट बनवायचे असेल तर त्यासाठी वेळ देणे सुद्धा आवश्यक आहे जरी तुम्ही याची मदत घेत असाल तरीसुद्धा त्यासाठी कौशल्य असणे आवश्यक आहे. फक्त ईबुक पब्लिश करून पैसे कमावता येणार नाही तर त्यासाठी योग्य मार्केटिंग सुद्धा आवश्यक आहे.
डिजिटल मार्केटिंग एजन्सी:
छोट्या व्यवसायांना वाढण्यास डिजिटल मार्केटिंग करून मदत होऊ शकते.
लोकल डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणे ही एक बिझनेस आयडिया आहे.
आज भारतात सुमारे ६.५ कोटी लहान व्यवसाय आहेत. धक्कादायक म्हणजे, त्यापैकी ९०% डिजिटल मार्केटिंग वापरत नाहीत. २०२५ मध्ये तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. लहान व्यवसायांना ऑनलाइन अधिक ग्राहक मिळवून देऊन दरमहा १ लाख रुपये कमवू शकता. सुरुवातीला हे कोणत्याही गुंतवणूकीशिवाय, ऑफिसशिवाय किंवा टीमशिवाय करू शकता.
व्यवसाय मार्केटिंगवर पैसे खर्च करण्यास तयार असतात. त्यांना त्यांच्यासाठी काम करण्यासाठी लोकांची आवश्यकता असते. प्रत्येक दुकान आणि ब्रँड ऑनलाइन राहू इच्छित असतो म्हणून ही एक चांगली संधी आहे.
तुम्हाला आवश्यक असलेली टूल्स :
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पदवीची आवश्यकता नाही. पण तुम्ही ही टूल्स वापरायला शिकली पाहिजेत:
*गुगल अॅनालिटिक्स: वेबसाइट ट्रॅफिक आणि ॲड ट्रॅक करण्यासाठी उपयुक्त आहे.
*सेम्रश Semrush : कीवर्ड शोधण्यासाठी उपयुक्त.
* हूटसुइट Hootsuite : सोशल मीडिया पोस्ट शेड्यूल करण्यासाठी आणि मार्केटिंग ऑटोमॅटिक करण्यासाठी उपयुक्त.
* मेलचिंप: ईमेल मार्केटिंग सोपे करा. ही टूल्स तुम्हाला एकाच वेळी अनेक व्यवसाय मॅनेज करण्यास मदत करतात.
इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायामध्ये सुद्धा काही चॅलेंजेस आहेत.
या व्यवसायात जास्त मागणी, कमी गुंतवणूक आणि चांगले उत्पन्न आहे. पण ते सोपे नाही. सर्वात मोठे आव्हान म्हणजे जास्त स्पर्धा.
स्टेप्स :
१. एक niche निवडा: रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स किंवा जिम सारख्या उद्योगावर लक्ष केंद्रित करा. त्या क्षेत्रात तज्ञ व्हा.
२. कोर सेवा ऑफर करा: सोशल मीडिया मार्केटिंग, एसइओ, कंटेंट मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंगसह सुरुवात करा.
३. क्लायंट मिळवा: व्यवसायांपर्यंत पोहोचा आणि सुरुवातीला ऑफर द्या.
Affiliate ब्लॉगिंग :
Affiliate ब्लॉगिंग ही सुद्धा एक चांगली बिझनेस आयडिया आहे. ज्यांना ब्लॉगिंग करता येते ते अगदी सहजरीत्या ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर जे affiliate प्रोग्राम्स आहेत त्यांना जॉईन करून Affiliate ब्लॉगिंग करू शकतात आणि ज्यांना ब्लॉगिंग करता येत नाही ते सुद्धा Affiliate ब्लॉगिंग सुरू करू शकता.
यासाठी सुरुवातीला ब्लॉगिंग करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निवडून त्यावर एक निष पकडून ब्लॉग लिहावे.
उदाहरणार्थ, टॉप 5 बॅग्स अंडर 2500… आणि यामध्ये Affiliate link ऍड कराव्या यामुळे ज्यावेळी या लिंक वरून परचेस करेल त्यावेळी कमिशन आपल्याला मिळेल.
फेसलेस youtube चैनल / ऑटोमॅटिक युट्युब :
काही लोकांना यूट्यूब चैनल सुरू करायचे असते परंतु त्यांचा चेहरा किंवा आवाज वापरायचा नसतो अशावेळी वेगवेगळे ए आय टूल्स उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून यूट्यूब चैनल सुरू करू शकता.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
Amazon merch on demand :Best Business Ideas For 2025
यामध्ये तुम्हाला डिझाईनिंग मध्ये इंटरेस्ट असायला हवा, जर तुम्हाला डिझाईन करता येत असेल तर वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्ही अपलोड करू शकतात आणि या डिझाइन्स जेव्हा टी-शर्ट, हुडी किंवा मग यामध्ये वापरले जाऊन हे प्रॉडक्ट खरेदी केले जाते त्यावेळी आपल्याला रॉयल्टी मिळते.
अशाप्रकारे या काही बिझनेस आयडिया ( Best Business Ideas For 2025 )आहेत यापैकी कुठल्याही बिझनेस आयडिया वर जर डिटेल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा.