ETF benefits and drawbacks I ETF म्हणजे काय? ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे I What is ETF I Investing in ETF benefits and drawbacks I Best investment options 2025
ETF benefits and drawbacks I ETF म्हणजे काय? ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे I What is ETF I Investing in ETF benefits and drawbacks I Best investment options 2025
ETF (Exchange Traded Fund) हे एक प्रकारचे गुंतवणूक साधन आहे जे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड केले जाते. ETF मध्ये एकाच पोर्टफोलिओमध्ये विविध स्टॉक्स, बाँड्स, किंवा इतर प्रोपर्टी असतात, जे गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या संपत्तींमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. हे साधन पारंपारिक म्युच्युअल फंड्सपेक्षा कमी खर्चिक आणि लवचिक आहे. ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. आजच्या ब्लॉग मध्ये आपण ( ETF benefits and drawbacks ) या बद्दलच माहिती जाणून घेणार आहोत…
ETF benefits and drawbacks I ETF म्हणजे काय? ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे I What is ETF I Investing in ETF benefits and drawbacks I Best investment options 2025
Table of Contents
ETF म्हणजे काय? ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे ETF benefits and drawbacks
ETF (Exchange Traded Fund) हा एक प्रकाराचा फंड आहे जो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होतो.
शेअर्समधील ट्रेडिंग सारखेच ETF ट्रेडिंग सुद्धा आहे शेअर मार्केटच्या कामकाजाच्या वेळेमध्ये शेअर्स सारखीच खरेदी विक्री करू शकतात.
ETF मध्ये अनेक प्रकारच्या सिक्योरिटीज जसे की स्टॉक्स, बॉण्ड्स, कमोडिटीज इत्यादींचा समावेश असतो आणि तो एक प्रकारे म्युच्युअल फंड प्रमाणेच कार्य करतो. परंतु म्युच्युअल फंड्स आणि ईटीएफ यामध्ये मुख्य फरक हा आहे की ETF ट्रेडिंग डायरेक्ट मार्केटमध्ये, स्टॉकसारखा, दररोज केला जातो.
ETF खरेदी आणि विक्री स्टॉकसारखीच केली जातात, आणि ट्रेडिंग दिवसभर सुरू राहते. आपल्याला ETF खरेदी करण्यासाठी एक ब्रोकर अकाऊंट असणे आवश्यक आहे.
ETF benefits and drawbacks
ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
1. कमीत कमी खर्च
म्युच्युअल फंडा पेक्षा ईटीएफ हा स्वस्त आहे.
ETF चा मुख्य फायदा म्हणजे त्याचे कमी खर्च.
व्यवहारासाठी कमिशन शुल्क असते परंतु कमी ब्रोकरेज मध्ये सुद्धा व्यवहार करता येतात, दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ETF फायदेशीर ठरू शकतो.
2. पारदर्शकता
ETF मध्ये खरेदी केलेल्या सिक्योरिटीजची लिस्ट सध्या इंटरनेटवर उपलब्ध असते, त्यामुळे गुंतवणूकदाराला सध्याच्या पोर्टफोलिओबद्दल पूर्ण माहिती मिळते.
3. लिक्विडीटी
ETF चा व्यापार स्टॉक मार्केटमध्ये होत असल्यामुळे त्याचे खरेदी-विक्री करणं सहज आणि जलद असते. यामुळे आपल्याला आपली गुंतवणूक लवकर काढता येते.
4. विविधता/ Diversity
ETF मध्ये अनेक प्रकारच्या स्टॉक्स किंवा सिक्योरिटीजचा समावेश असतो, त्यामुळे आपली गुंतवणूक विविध क्षेत्रात, स्टॉक्समध्ये पसरवता येते. यामुळे रिस्क कमी होते.
5. टॅक्स फायदे
ETF मध्ये सामान्यतः म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत कमीत कमी कर आकारले जातात. त्यामुळे, दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास कर वाचवण्याचे फायदे होऊ शकतात.
6. एजी ऍक्सेस :
सामान्य गुंतवणूकदारांनाही मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा सुलभ मार्ग मिळतो.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
ETF मध्ये आपण तज्ज्ञ मॅनेजरचे नियंत्रण नसल्यामुळे, आपल्याला थोडी जास्त जोखिम स्वीकारण्याची तयारी असावी लागते.
2. व्यापार शुल्क
ETF खरेदी-विक्री करतांना ब्रोकर शुल्क लागते. त्यामुळे कमी गुंतवणूक असलेल्या व्यक्तींना हे महाग पडू शकते.
3. रिस्क
ETF मध्ये विविध सिक्योरिटीज असल्या तरी त्यात असलेल्या मार्केटमधील जोखीम अजूनही जास्त असू शकतात. इंडेक्सचे मूल्य खाली गेले तरी आपला ETF किंमतीत कमी होऊ शकतो.
4. लिक्विडिटीची समस्या
सर्व ETF च्या लिक्विडिटीची समानता नाही. काही ETF च्या खरेदी-विक्रीला कमी वॉल्यूम असू शकतो, ज्यामुळे विक्री किंवा खरेदी करतांना वेळ लागतो.
ETF मध्ये गुंतवणूक करणे विविध फायदे देऊ शकते जसे की विविधता, कमीत कमी खर्च, आणि उच्च पारदर्शकता. परंतु, त्याचे काही तोटे आहेत, विशेषत: जोखीम आणि नियंत्रणाची कमतरता. गुंतवणूक करतांना या फायदे आणि तोट्यांचा विचार करूनच निर्णय घ्या. जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक इच्छिणारे असाल, तर ETF हे एक उत्तम पर्याय ठरू शकते.