Best places to visit in Winter in Maharashtra | महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरण्यासाठी काही उत्तम ठिकाणे | Some of the best places to visit in Maharashtra in winter
Best places to visit in Winter in Maharashtra | महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरण्यासाठी काही उत्तम ठिकाणे | Some of the best places to visit in Maharashtra in winter –
आपला महाराष्ट्र हा निसर्गाने नटलेला असून महाराष्ट्रामध्ये विविध धार्मिक ठिकाणे, तीर्थस्थळे, थंड हवेची ठिकाणे, किल्ले,नैसर्गिक ठिकाणे यांसारखी अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोणत्या ठिकाणी गेले पाहिजे हे तेथील हवामानानुसार आपण ठरवतो आणि त्यामुळे तेथील जागेचा आनंद आपल्याला घेता येतो. आजच्या लेखामध्ये अशी कोणती ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये आपण जाऊ शकतो त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत….
1 . गणपतीपुळे –
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असून कोकण किनारपट्टीवर आहे. गणपतीपुळे या ठिकाणी गणपती बाप्पाचे सुंदर असे मंदिर आहे, हे मंदिर चारशे वर्षांपूर्वीचे आहे असे म्हटले जाते. गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने या ठिकाणी फिरण्यासाठी एक वेगळाच आनंद घेता येतो. तसेच गणपतीपुळे हे निसर्गाने नटलेले आहे त्यामुळे येथे आल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न वाटते.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च
2 . महाबळेश्वर –
आपल्या सर्वांनाच माहीतच आहे की महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून हे उत्तम असे प्रेक्षणीय स्थळ सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. येथील हिरवळ बघण्यासारखी आहे, तसेच या ठिकाणी महाबळेश्वराचे म्हणजेच महादेवांचे मंदिर , पंचगंगा मंदिर ,कृष्णाबाई मंदिर आहे त्याचबरोबर प्रतापगड किल्ला ,माउंट माल्कम ,धबधबा आणि इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी आहेत.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळ्यात
3 . माथेरान-
हे मुंबईपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर वसलेले असून माथेरान हे धबधबे आणि नयनरम्य टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
माथेरान हे छान असे हिल स्टेशन आहे.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मे
4 . अलिबाग –
अलिबाग हे समुद्रकिनाऱ्याला लागून असून अलिबागला “मिनी गोवा” म्हणून सुद्धा संबोधले जाते. अलिबागच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इतर काही प्रेक्षणीय स्थळे सुद्धा आहेत ,मुरुड जंजिरा, बालाजी मंदिर, पद्माक्षी रेणुका मंदिर, गणेश मंदिर आणि इतर खूप सारी ठिकाणे आहेत तसेच सासवणे या ठिकाणी करमरकर शिल्पालय आहे.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: नोव्हेंबर ते फेब्रुवारी
5 . पाचगणी –
पर्यटकांमध्ये पाचगणी हे प्रसिद्ध असून येथील पारसी पॉईंट तसेच टेबल लँड ही जास्त बेट दिली जाणारे ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी असून महाबळेश्वर पासून फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. धबधबे ,कमलगड, पाचगणीच्या गुफा यांसारखे विविध प्रसिद्ध अशी प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी बघण्यासारखी आहेत.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: डिसेंबर ते फेब्रुवारी