कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना |Kadba Kutti Yojana 2023 | कडबा कुट्टी मशीन योजना

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना |Kadba Kutti Yojana 2023 | कडबा कुट्टी मशीन योजना –

    शेतकर्‍यांना त्यांची शेतीची कामे करणे सोपे जावे ह्या साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना शेती करता यावी ह्या साठी आवश्यक ती मशीन शेतकऱ्यांना खरेदी करता यावी म्हणून सरकार तर्फे विविध योजना राबवल्या जात असतात. शेतकरी शेती सोबतच इतर काही जोडधंदे सुद्धा करतात त्यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांचा समावेश होतो. गायी, शेळी ,म्हशी यांना लागणारा चारा कट करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना सरकारने सुरू केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट सुद्धा वाचतील.

कडबा कुट्टी मशीनचे फायदे | Benefits of Kadba Kutti Machine/Chaff Cutter Machine –

– कमी कालावधीमध्ये चारा कट केला जातो त्यामुळे मेहनत आणि वेळ दोन्हीही वाचते.

– चारा बारीक कट केल्यामुळे जनावरांना सुद्धा खाण्यास सोपा जातो.

– तसेच चाऱ्याची नासाडी सुद्धा कमी प्रमाणामध्ये होते.

– कमी जागेमध्ये जास्तीचा चारा साठवून ठेवला जातो.

– तसेच मकाची कुटी करून बॅगा सुद्धा भरून ठेवल्या जातात आणि त्या जास्त कालावधीसाठी उपयोगात येतात म्हणजेच या बॅगमध्ये दीर्घकाळ मकाची कुटी साठवून ठेवली जाते.

कडबा कुट्टी मशीन अनुदान व किंमत | Chaff Cutter Price and Subsidy –

– कडबा कुट्टी मशीनची किंमत साधारणतः 10 ते 40 हजारापर्यंत असते. या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मागे पुढे होऊ शकते 

– 3HP,5HP यावरून कडबा कुट्टी मशीनची किंमत ठरते.

– या मशीनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे प्रकार पडतात. ऑटोमॅटिक मशीन मॅन्युअल मशीन पेक्षा महाग असते.

अनुदान –

 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के ( 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत ) अनुदान मिळू शकते तर इतर शेतकऱ्यांना अनुदान 16 हजार रुपयापर्यंत मिळू शकते.

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents –

– 8 अ उतारा

– जमिनीचा 7/12 उतारा

– आधारकार्ड 

– बँक पासबुक 

– पिकांची माहिती

– जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

– हमीपत्र, GST बिल, कोटेशन, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज |Application –

– कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा. 

–  अर्जदाराने शासनाच्या Mahadbt पोर्टलवर जावे आणि  रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

– त्या नंतर युजर नेम आणि पासवर्ड किंवा आधारकार्ड, ओटीपी टाकून लॉगीन करायचे आहे.

– लॉगीन झाल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा.

– आता ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या योजना दिसत असेल. ह्या योजनेचा अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेवर क्लिक करावे लागेल.

–  कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज ओपन होईल,त्यामध्ये  कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करा.नंतर  कडबा कुट्टी ह्या ऑप्शन वर क्लिक करा.

– त्यानंतर मानवचलित यंत्र किंवा ट्रॅक्टरचलित अवजारे या पैकी एक ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, जर तुम्हाला ट्रॅक्टरचलित कडबा कुट्टी यंत्र हवे असेल तर त्यावर क्लिक करू शकता परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि मानवचलित यंत्र हवे असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करा.

– यानंतर अर्ज सेव करून सबमिट करा.

– तसेच अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे, त्यानंतर त्या संबंधित मेसेज तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल.

– योजनेसाठी तुमची निवड झाल्यानंतर तो मेसेज सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल.

– यानंतर पूर्वसंमती पत्र मिळेल, आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि मशीन खरेदी करून अनुदानाची मागणी करायची आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना – येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment