Business growth strategies| व्यवसाय वाढ करण्यासाठी काही योजना | Some plans for business growth –

Business growth strategies| व्यवसाय वाढ करण्यासाठी काही योजना | Some plans for business growth –

    व्यवसाय अगदी छोटा असो किंवा मोठा नक्कीच त्या व्यवसायाची वाढ व्हावी असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटते मग त्या व्यावसायिकाचा व्यवसाय कितीही मोठा झाला तरीसुद्धा त्या व्यवसायामध्ये अधिकाअधिक वाढ होत राहावी असे त्या व्यावसायिकाला वाटत असते आणि व्यवसायामध्ये जर वाढ हवी असेल तर वेळोवेळी योग्य त्या योजना आखणे आणि योग्य ते निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते. आज आपण अशाच काही योजना या लेखांमध्ये बघणार आहोत की ज्या व्यवसाय वाढीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

१ . उद्योगांबद्दल तसेच बाजारपेठेंबद्दल संशोधन करा.

Research the industries as well as markets.

   तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीचा व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाबद्दल इतर बाजारपेठांमध्ये संशोधन केले पाहिजे.

तसेच तुमची सध्याची जी उत्पादने आहेत ती उत्पादने कोणकोणत्या बाजारपेठांमध्ये पोहोचले आहे ,अजून कोण कोणत्या ठिकाणी पोहोचायची बाकी आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे.

   ज्या ठिकाणी अजून तुमची उत्पादने पोहोचली नाही त्यामागील कारणे सुद्धा शोधून काढली पाहिजे आणि तुमची उत्पादने जास्तीत जास्त बाजारपेठापर्यंत कसे पोहोचतील याबद्दल विचार केला पाहिजे.

  बाजारपेठेचा आणि उद्योगाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की अजून कोणती उत्पादने आपण बाजारात आणली पाहिजे.

२ . कंपनीच्या किंवा ऑफिसच्या जागेमध्ये वाढ करणे.

Increase in company or office space –

तुम्हाला जर तुमची उत्पादने वाढवायची असतील किंवा तुमच्या सध्याच्या उत्पादनांची कॉन्टिटी वाढवायची असेल आणि त्यासाठी जास्त मशिनरीची आवश्यकता असेल तर त्यासाठी नक्कीच कंपनीसाठी जागा सुद्धा आधीच्या जागेपेक्षा जास्त लागू शकते ,त्यासाठी तुम्ही कंपनीची जागा सुद्धा वाढवून घेऊ शकता.

   नक्कीच जास्त मशीन असल्यावर तुमची जी काही उत्पादने असतील त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल.

३ . कर्मचाऱ्यांची वाढ करणे – 

Increase of employees-

तुमचे सध्याचे जे काही उत्पादन आहे ते जर तुम्हाला वाढवायचे असेल आणि त्यासाठी जास्त मशीनची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे सुद्धा गरजेचे राहील.

  ( बाजारपेठेबद्दल संशोधन केल्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता की तुम्हाला कर्मचारी वाढवणे किंवा कंपनीच्या जागेमध्ये वाढ करणे हे गरजेचे आहे की नाही.)

४ . तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी पोहोचला नाही त्या ठिकाणी पोहोचवला पाहिजे.

Your business must reach places where it has not been reached –

तुम्ही बाजारपेठेबद्दल संशोधन करत असताना तुमची उत्पादने किंवा तुमचा व्यवसाय कोण कोणत्या ठिकाणी पोहोचला आहे तसेच कोणत्या ठिकाणी पोहोचला नाही याची सर्व माहिती जमा करून ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय अद्यापही पोहोचलेला नसेल त्या ठिकाणी तो कसा पोहोचवता येईल याबद्दल विचार करून काही मार्केटिंग स्टेटसजचा उपयोग करून नवनवीन ठिकाणी सुद्धा व्यवसाय पोहोचवला पाहिजे.

    तुमचा व्यवसाय इतर ठिकाणी पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायाची फ्रेंचायसी देऊ शकता किंवा विविध ब्रांचेस सुद्धा उघडू शकता किंवा तुमची जी काही उत्पादने असेल त्यानुसार तुम्ही इतर दुकानदारांकडे सुद्धा तुमची उत्पादने ठेवू शकता.

   तुमची जी काही उत्पादने आहे त्यानुसार तुम्ही हा निर्णय घेऊ शकता.

५ . तुमच्या उत्पादनांमध्ये किंवा सेवेमध्ये वाढ करणे.

    Enhancing your products or services –

    तुम्ही बाजारपेठेबद्दल संशोधन केल्यानंतर नक्कीच तुमच्या हे लक्षात येईल की तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ केली पाहिजे की नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार उत्पादनांमध्ये किती वाढ केली पाहिजे किंवा कोणती उत्पादने मार्केटमध्ये आणले पाहिजे हे नक्कीच ठरवू शकता.

    तसेच तुमचा व्यवसाय असा असेल की ज्या द्वारे तुम्ही वेगवेगळ्या सर्विसेस पुरवतात तर त्यामध्ये सुद्धा नेहमी अपडेट राहिले पाहिजे आणि नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन सर्विसेस ग्राहकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.

६ . गुंतवणुकीमध्ये वाढ –

Growth in investment –

   जर समजा तुम्हाला तुमची उत्पादने वाढवायची असेल किंवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची असेल किंवा कंपनीच्या जागेचा विस्तार करायचा असेल तर नक्कीच तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक करणे तुम्हाला गरजेचे असेल.

   जर समजा गुंतवणुकीमध्ये वाढ करून फायदा होणार असेल तर नक्कीच गुंतवणूक करण्यामध्ये काही हरकत नाही.

७ . उत्पादनांची किंवा सर्विसेसची क्वालिटी –

Quality of products or services –

अगदी तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा नेहमी आपल्या उत्पादनांची किंवा सर्विसेसची गुणवत्ता चांगली ठेवली पाहिजे. ज्यावेळी आपली उत्पादने किंवा सर्विसेस चांगली असतात नक्कीच त्यावेळी जास्तीत जास्त ग्राहक आपल्याला मिळतात. कुठल्याही व्यवसायाचा स्ट्रॉंग पॉईंट  उत्पादनांची किंवा सर्विसेसची कॉलिटी हा असतो.

८ . ग्राहकांमध्ये वाढ  –

Growth of customers –

    आपल्याला सध्या जे ग्राहक जोडले गेलेले आहे त्या व्यतिरिक्त इतर ग्राहक आपल्याशी कसे जोडले जातील आणि तसेच सध्याचे ग्राहक नेहमी आपल्याशी कसे जोडलेले राहतील याचा विचार करून वेगवेगळ्या योजना आखल्या पाहिजेत.

    आणि नक्कीच ग्राहकांमध्ये वाढ म्हणजेच व्यवसायामध्ये वाढ. जे ग्राहक आपल्याशी जोडले जातात ते आपल्याशी भविष्यामध्ये सुद्धा कसे जोडलेलेच राहू शकतात याची काळजी घेऊन योग्य त्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही आपल्या उत्पादनांचा दर्जा कमी होऊ देता कामा नये.

अशाप्रकारे वरील योजनांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून तुमच्या व्यवसायामध्ये नक्की कोणते बदल केले पाहिजे, हे तुम्ही ठरवू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment