AICTE Laptop Scheme | One student one laptop| विद्यार्थ्यांना सरकारी योजनेमधून मिळणार लॅपटॉप…जाणून घ्या संपूर्ण माहिती…

AICTE Laptop Scheme | One student one laptop| विद्यार्थ्यांना सरकारी योजनेमधून मिळणार लॅपटॉप…जाणून घ्या संपूर्ण माहिती…

     जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की, सरकारी योजनेमधून त्यांना लॅपटॉप मिळणार आहे. परंतु हा लॅपटॉप नेमके कोणते शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ,तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत…

Advertisement

    आजच्या जगामध्ये तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे म्हणूनच आज डिजिटल युग आहे असे सुद्धा कित्येकदा आपण म्हणत असतो. शिक्षण घेत असताना बऱ्याचदा लॅपटॉपची आवश्यकता असते. परंतु काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता नक्की असते अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेता येत नाही परंतु आता या योजनेमुळे अशा विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकतो.

AICTE Laptop Scheme | एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना –

– एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (AICTE Laptop Scheme) भारतीय तंत्रशिक्षण परिषदने सुरू केली आहे. 

– या योजने अंतर्गत अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असलेल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

– आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेता यावे हा या योजनेमागील उद्देश आहे.

– तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अभ्यासामध्ये कुठलीही अडचण येऊ नये असेही या योजनेमागील उद्दिष्ट आहे.

एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (AICTE Laptop Scheme) योजनेसाठी अर्ज करताना अटी –

Eligibility –

– भारतामधील नागरिकांना एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

– सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अपंग प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

– अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (AICTE) ने त्यांच्या सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पत्र लिहून ही योजना सुरू करण्याबद्दल सांगितले असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे लवकरच ही योजना सुरू होऊ शकते.

एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (AICTE Laptop Scheme) योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

Required documents –

– पासपोर्ट साईझ फोटो

– आधार कार्ड

– ओळखपत्र

– रहिवासी दाखला

– उत्पन्नाचा दाखला

– जातीचा दाखला

– शैक्षणिक पात्रता कागदपत्र 

– अपंगत्वाचा दाखला 

– मोबाईल क्रमांक 

एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (AICTE Laptop Scheme) योजनेसाठी अर्ज –

Application –

अद्याप पर्यंत एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (AICTE Laptop Scheme) योजनेसाठी अर्ज कसा करता येईल याबद्दल माहिती मिळालेली नाही परंतु लवकरच याबद्दल माहिती मिळू शकते.

हे ही वाचू शकता … प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment