कुठलीही अधिकची गुंतवणूक न करता करता येणारे दोन व्यवसाय |Business Ideas without any extra investment –
व्यवसाय म्हटलं की गुंतवणूक आलीच असे आपल्याला वाटते आणि ते बऱ्यापैकी खरे सुद्धा आहे. परंतु आजच्या लेखांमध्ये अशा काही बिझनेस आयडिया सांगणार आहे की ज्या कुठलीही अधिकची गुंतवणूक न करता आपण ते व्यवसाय सुरू करू शकतो. चला तर सुरुवात करूया …
१ . YouTube चॅनल –
आता यूट्यूब चॅनल हे नाव ऐकूनच काहींना वाटले असेल की यामध्ये काय नवीन आहे …..तर तुम्ही रोज जे करता त्यापेक्षा वेगळे काहीही न करता तुम्ही ज्या गोष्टींमध्ये जास्त तरबेज आहात म्हणजेच उदाहरणार्थ स्वयंपाक बनवणे, रांगोळी काढणे, शिवणकाम यांसारखी कामे जर तुम्ही करत असाल म्हणजेच स्वयंपाक तर आपण रोज बनवतो.
मग ज्या महिलांना स्वयंपाकामध्ये आवड आहे त्या महिलांनी रोजच्या जेवणामध्ये जो काही मेनू असेल त्याचा फक्त व्हिडिओ काढून यूट्यूबला अपलोड करायचा आहे, त्यामध्ये सातत्य ठेवायचे आहे, हळूहळू यूट्यूब बद्दल अधिक माहिती आपणास भेटू लागेल. काही दिवसातच युट्युब मोनेटायझेशन सुद्धा मिळू शकते आणि चांगला इन्कम सोर्स आपला तयार होऊ शकतो.
तसेच बऱ्याचशा महिला शिवणकाम करतात म्हणजेच ब्लाउज शिवून देणे, ड्रेस शिवून देणे हे काम करतात आणि हा व्यवसाय सुद्धा त्यांचा चांगला चालू असतानासुद्धा शिवणकामाचे व्हिडिओज काढून युट्युब ला अपलोड करू शकतो, कारण बऱ्याच अशा महिला सुद्धा आहेत की ज्या युट्युब वर व्हिडिओ बघून ब्लाउज शिवणे म्हणा किंवा इतर कामे शिकलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामुळे युट्युब हे सुद्धा काही शिकण्यासाठी एक चांगले माध्यम असून त्याद्वारे चांगली कमाई सुद्धा केली जाऊ शकते.
आता काही महिलांना रांगोळी काढण्याची आवड असते त्यात काही महिला तर अशा सुद्धा आहेत की ज्या घरासमोर, तुळशी समोर किंवा दारासमोर रोज नवनवीन सुरेख अशा रांगोळ्या काढत असतात. आता यामध्ये बदल न करता फक्त एवढं करायचे आहे की ती रांगोळी काढत असताना त्या रांगोळीचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढायचा आहे आणि तो व्हिडिओ युट्युब वर अपलोड करायचा आहे. हळूहळू युट्युब वर views मिळू लागतील आणि चॅनल सुद्धा ग्रो होऊ लागेल.
२ . ऑनलाइन क्लासेस –
तुमच्याकडे जे कोणते कौशल्य आहे त्याचे क्लासेस घेऊन तुम्ही चांगली इन्कम मिळवू शकता, चला तर बघुयात असे कोणकोणते मार्ग आहेत…..
– तुम्ही स्वयंपाक जर उत्तम बनवू शकत असाल तर ऑनलाईन कुकिंग क्लासेस घेऊ शकतात.
– तुम्हाला जर छानपैकी रांगोळ्या काढता येत असेल तर रांगोळी काढण्याचे सुद्धा क्लास घेऊ शकता.
– तुम्हाला जर चित्र काढायला छान पैकी जमत असेल तर चित्रकलेचे सुद्धा क्लासेस तुम्ही घेऊ शकता.
– तुम्हाला जर शिवणकाम येत असेल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन करणे, नवनवीन गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर अति उत्तम. तुमच्याकडे असणारे कौशल्य तुम्ही जगाला सुद्धा दाखवू शकता आणि ज्यांना क्लासेस करायचे आहे त्यांचे क्लासेस सुद्धा घेऊ शकता.
– तुम्हाला कॅलिग्राफी जमत असेल तर त्याचे सुद्धा क्लास तुम्ही घेऊ शकता.
– तुम्ही एखाद्या विषयामध्ये तज्ञ असाल किंवा तुम्ही शिक्षक किंवा शिक्षिका असाल तर तुमच्या आवडीच्या विषयामध्ये क्लासेस तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही ऑलरेडी ट्युशन्स घेत असाल तर त्या ट्युशनची रेकॉर्डिंग करून सुद्धा पेड ऑनलाइन क्लासेस तुम्ही घेऊ शकता.
या प्रकारे गायन, नृत्य अशी जी कोणती कौशल्य तुमच्याकडे आहे ,त्यांचा योग्य वापर करून योग्य ती कमाई करता येऊ शकते त्यासाठी जास्तीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त ” मेहनत,स्मार्ट work आणि patience ची….”
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |