गोल्‍ड मोनेटायझेशन स्‍कीम | Gold Monetisation Scheme | सुवर्ण मुद्रिकरण योजना

    बऱ्याच वेळा आपण आपले सोने घरामध्ये सुरक्षित नसते म्हणून लॉकरमध्ये ठेवतो परंतु अशावेळी ते सोने लॉकर मध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यालाच पैसे मोजावे लागतात. परंतु आता अशी एक योजना आली आहे की ज्याद्वारे आपल्याला सोन्यावर काही टक्के व्याज मिळणार आहे आणि ती योजना आहे गोल्ड मोनेटायझेशन स्कीम… तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

गोल्‍ड मोनेटायझेशन स्‍कीम | Gold Monetisation Scheme | सुवर्ण मुद्रिकरन योजना –

– सुवर्ण मुद्रीकरण योजनेमागील सरकारचे उद्दिष्ट आर्थिक व्यवस्था मजबूत करणे असे आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना सुद्धा निष्क्रिय पडलेल्या सोन्यावर व्याज मिळावे आणि लाभ मिळावा हा सुद्धा हेतू आहे.

– सुवर्णमुद्रीकरण योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली असून कोणीही व्यक्ती त्यांच्या जवळील सोने मग ते वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात म्हणजेच दागिने,गोल्ड बार,गोल्ड कॉइन्स हे सोने या योजनेमध्ये गुंतवू शकतात आणि त्या बदल्यात काही टक्के व्याज गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

सुवर्ण मुद्रीकरण योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचे फायदे | Benefits of Gold Monetization Scheme –

– सुवर्णमुद्रीकरण योजना हे भारत सरकार तर्फे असल्यामुळे आपले सोने हे सुरक्षित असल्याची खात्री मिळते.

– आपल्याकडील सोने कुठल्याही स्वरूपात असले म्हणजेच दागिने,गोल्ड बार,गोल्ड कॉइन्स तरीसुद्धा या योजनेमध्ये गुंतवणूक करता येऊ शकतात.

– आपण या योजनेमध्ये सोने गुंतवणूक केल्यामुळे आपल्या जवळील सोने सुरक्षित सुद्धा राहील त्याचबरोबर त्यावर व्याज सुद्धा आपल्याला मिळणार आहे. हे व्याज योजनेच्या कालावधीनुसार मिळते.

– टॅक्स आकारला जात नाही.

किती कालावधीसाठी सोन्याची गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळते हे बघुयात –

१ . शॉर्ट टर्म – १ ते ३ वर्ष , बँक त्यांच्या पद्धतीने व्याज देते.

२ . मिडियम टर्म – ५ ते ७ वर्ष,२.२५ % व्याज मिळते.

३ . लाँग टर्म  – १२ ते १५ वर्ष,२.५० % व्याज मिळते.

सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा लाभ कसा घेता येईल ?

– बँकेमध्ये सर्वप्रथम गोल्ड डिपॉझिट अकाउंट ओपन करा व केवायसी पूर्ण करा. सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.

– त्यानंतर बँकेकडून ग्राहकांजवळील सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाते व 995 गोल्ड फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते.

– त्यानंतर बँकेकडून ग्राहकांना त्यादिवशी किंवा तीस दिवसांच्या आत डिपॉझिट स्कीमचे सर्टिफिकेट दिले जाते.

लक्षात घेण्यासारख्या काही बाबी…

– या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या सोन्यावर तीस दिवसानंतर व्याज मिळण्यास सुरुवात होते.

– कमीत कमी दहा ग्रॅम ( काही ठिकाणी 30 ग्रॅम असाही उल्लेख आहे त्यामुळे बँकेत चौकशी करावी )  आणि जास्तीत जास्त कितीही अशी मर्यादा आहे.

– मॅच्युरिटी नंतर सोन्यावर मिळणारे व्याज दिले जाते.

महत्वाची सूचना – 

या ठिकाणी सुवर्णमुद्रीकरण योजनेबद्दलची माहिती दिलेली आहे ,गुंतवणूक करण्याचा कुठल्याही प्रकारचा सल्ला दिलेला नाही.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment