Car Insurance Renewal TIPS | कार इन्शुरन्स रिन्युअल टिप्स | Best Car Insurance tips 2025 | Car Insurance Renewal guide
आपल्याकडे असणाऱ्या कार विम्याचे नूतनीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे जर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे पॉलिसी धारकाकडून विम्याचे नूतनीकरण करण्याचे राहून गेले आणि अशावेळी काही आर्थिक धोके आले तर आपण आर्थिक अडचणी मध्ये येऊ शकतो म्हणूनच विम्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विम्याचे नूतनीकरण करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे यासाठी आजच्या ब्लॉगमध्ये काही टिप्स (Car Insurance Renewal Tips)आपण जाणून घेणार आहोत…
Car Insurance Renewal TIPS | कार इन्शुरन्स रिन्युअल टिप्स | Best Car Insurance tips 2025 | Car Insurance Renewal guide
Table of Contents
Car Insurance Renewal Tips
Car Insurance Renewal Tips
पुढे काही कार इन्शुरेंस रिन्युअल टिप्स (Car Insurance Renewal Tips) दिलेल्या आहेत :
१. प्लॅनचा टाईप :
पॉलिसी रिन्यूअल करत असताना थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी किंवा कॉम्प्रेहेन्सीव्ह प्लॅन खरेदी करू शकता.
हे प्लॅन वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी ही किमान कव्हरेज देते तर कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन कारच्या नुकसान भरपाई सह मोठ्या प्रमाणामध्ये कव्हरेज उपलब्ध करते तुलनेने कॉम्प्रेसिव्ह प्लॅनचा प्रीमियम जास्त असतो. यापैकी कोणती पॉलिसी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त उपयुक्त आहे हे ठरवून तुम्ही प्लॅनची निवड करू शकता.
२. ॲड-ऑन:
तुमच्या कार पॉलिसीसाठी ॲड-ऑन खरेदी करणे बंधनकारक नसले तरी, ऑफरवर असलेल्या विविध गोष्टींवर एक नजर टाकणे कधीही चांगलेच आहे. छोटा प्रीमियम भरून, ॲड-ऑन्ससह कारसाठी अधिक चांगले आणि व्यापक असे कव्हरेज सेक्यूअर करू शकता. काही सर्वात लोकप्रिय असे ॲड-ऑन्स झिरो डेप्रिसिएशन कव्हर, एनसीबी कव्हर, इनव्हॉइस प्रोटेक्शन कव्हर आणि इंजिन प्रोटेक्ट कव्हर हे आहेत.
३.कॅशलेस गॅरेजचे नेटवर्क तपासा.
पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, नेटवर्क गॅरेजची लिस्ट शोधण्यासाठी तुम्ही विमा कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही या गॅरेजला भेट दिल्यास, तुम्ही कॅशलेस फायदे मिळवू शकता जेथे विमाकर्ता थेट गॅरेजला दुरुस्तीचे बिल भरेल. असे करण्यासाठी तुम्ही तुमच्या पसंतीच्या गॅरेजशी कोणती विमा कंपनी जोडलेली आहे ते तपासून त्यानंतर सुद्धा त्या कंपनीची पॉलिसी खरेदी करू शकता.
४. पुरेसा IDV:
विम्यामध्ये IDV चा अर्थ आहे की कारचे विमा उतरवलेले घोषित मूल्य (IDV insured declared value) कदाचित पॉलिसीवर परिणाम करू शकणारा एकमेव महत्त्वाचा घटक आहे. योग्य IDV असलेली पॉलिसी घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून पॉलिसीचे फायदे नंतर उपभोगता येतील कार इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी, आयडीव्हीशी तडजोड करू नये.रिन्युअल करतांना, कारच्या बाजार किंमतीत बदल होऊ शकतात, आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या कव्हरेज प्रमाणानुसार प्रीमियम बदलावे लागू शकतात. जेव्हा तुमची कार जुनी होईल, तेव्हा तिचा मूल्य कमी होईल आणि तुम्हाला त्यानुसार कव्हरेज कमी करण्याचा विचार करावा लागेल.
५. डिडक्टिबल
डिडक्टिबल ही किमान रक्कम आहे जी पॉलिसीधारकाने क्लेमच्या दरम्यान भरली पाहिजे. विमाधारकांना सहसा अनिवार्य डिडक्टिबल आणि ऐच्छिक डिडक्टिबल असते. पॉलिसी जारी करताना ऐच्छिक डिडक्टिबलची निवड करणे प्रीमियम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते परंतु ते क्लेमची रक्कम देखील कमी करू शकते. म्हणून निवड करताना योग्य ते निवडा.
६. नो क्लेम बोनस किंवा NCB :
जर तुम्ही एक्सपायर्ड झालेल्या कार विम्याचे नूतनीकरण करणार असाल, तर NCB ही परवडणारी आणि न परवडणारी पॉलिसी यातील फरक असू शकते. प्रत्येक वर्षासाठी (जास्तीत जास्त पाच वर्षे) तुम्ही तुमच्या पॉलिसीवर क्लेम केला नाही तर तुम्ही सवलतीसाठी पात्र ठरू शकता. हे पहिल्या वर्षासाठी 20% पासून सुरू होते आणि पाचव्या वर्षासाठी 50% पर्यंत असते. NCB वाहनाला लागू नाही तर ओनरला लागू होते. प्रत्येक रिन्यूअल साठी तुमचा NCB तपासण्याचे लक्षात ठेवा,जरी तुम्ही तुमची योजना दुसऱ्या विमा कंपनीकडे पोर्ट करणे निवडले तरीसुद्धा एनसीबी तपासा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
विमाकर्त्याकडून पॉलिसी खरेदी करतेवेळी किंवा खरेदी करावी की नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्या विमाकर्त्याची क्लेम हिस्टरी ही मदत करू शकते. विमा पॉलिसी काढणारी व्यक्ती ही विम्याची प्रोसिजर पटकन व्हावी याच्या शोधामध्ये असते म्हणून तुम्ही ऑनलाईन रिसर्च करून कोणत्या विमा कंपनीकडून पॉलिसी काढली पाहिजे हे शोधू शकता.
८. इन्हान्सड सिक्युरिटी :
तुमच्या वेहिकल वर सिक्युरिटी डिव्हायसेस इन्स्टॉल करून, तुम्ही केवळ त्याची सुरक्षा वाढवत नाही तर प्रीमियम किंमती देखील कमी करू शकता. एआरएआय किंवा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने उपकरणांच्या यादीची शिफारस केली आहे. तुम्ही त्यापैकी कोणतेही इंस्टॉल केले असल्यास, तुम्ही या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. तुमच्या कारमधील अँटीथेप्ट डिव्हायसेस तुमची कार विमा प्रीमियम रक्कम कमी करू शकतात. याबद्दल तुमच्या विमा कंपनीकडे चौकशी करू शकता.
९. ऑनलाइन कोट्सची तुलना करा:
तुम्ही कार विम्याचे ऑनलाइन रिन्यूअल सुद्धा करू शकता, जे केवळ जलदच नाही तर अधिक परवडणारे देखील आहे. तुम्हाला पॉलिसी घ्यायची आहे की नाही हे ठरविण्यापूर्वी तुम्ही विमा कंपन्यांना पॉलिसी कोट्ससाठी विचारू शकता.
१० पॉलिसीचे डिटेल्स काळजीपूर्वक वाचा
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीच्या डिटेल्सचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. पॉलिसीच्या शर्ती, कव्हरेज, समर्पक एक्सीडंट कव्हरेज आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळवा. प्रत्येक वर्षी पॉलिसी रिन्युअल करतांना, त्यात बदल असू शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या पॉलिसीचा पुनरावलोकन करण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या आवश्यकतांनुसार अधिक योग्य पॉलिसी निवडता येईल.
अशाप्रकारे या काही टिप्स (Car Insurance Renewal Tips)आहेत ज्याचा उपयोग कार इन्शुरन्स रिन्यूअल करतानी नक्कीच तुम्हाला होऊ शकतो.