12वी नंतर करता येतील हे 3 जास्त डिमांड असणारे करीयर | Top 3 demanding career option after 12th in Marathi

मित्रांनो रोज नवनवीन करीयरच्या संधी विध्यार्थ्यांसाठी येत आहेत, आणि काही असे करीयर आहेत ज्याबद्दल आपण शिक्षण तर घेतो पण शिक्षणानंतर जेव्हा जॉब शोधायला जातो तेव्हा एकही जॉब मिळत नाही. कारण खूप मोठा करीयर gap इंडस्ट्री मध्ये निर्माण झालेला आहे. कारण जॉबसाठी ज्या महत्त्वाच्या स्किल्स असतात त्या खूप कमी आपल्याला शाळेत शिकविल्या जातात, म्हणून मुलांकडे इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स नसल्यामुळे त्यांना जॉब लागत नाही. पण या आर्टिकल मध्ये तुम्हाला ६ असे करीयर सांगतो, त्यापैकी एका क्षेत्रात तुम्ही करीयर करून घेताय तर तुम्हाला जॉबसाठी खूप डिमांड असेल किंवा स्वतःच तुम्ही डेव्हलप करून बिसनेस सुद्धा करू शकतात.

Advertisement

1)Cyber Security Expert

मित्रांनो दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे, त्याचबरोबर इंटरनेट वापरणारे users देखील भारतात वाढत चालले आहेत. भारतात ६९२ million active internet users आहेत हा आकडा येत्या २ वर्षात ९०० million पर्यंत पोहचू शकतो. एकाबाजूला सर्व ऑनलाईन कनेक्ट होत आहेत, सर्वांची काम इंटरनेटमुळे सोपी जरी होत असेल तरी दुसऱ्याबाजूला चिंताजनक बाब सुद्धा आहे. कारण रोज हजारो cyber attacks भारतासह जगात hackersच्या माध्यमातून होत आहेत. रोज एखादा नवीन cyber attack लोकांवर होतो, त्यामध्ये कोणाचे बँकेतील पैसे गायब होतात तर कोणाचा पर्सनल data चोरून चुकीच्या पद्धतीने सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. असे अनेक cyber fraud दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

सध्याच्या स्थितीत ३.५ million म्हणजे ३५ लाख jobs या क्षेत्रात पूर्ण जगात आहे. जे अजून ती जागा कोणी घेऊ शकले नाही. त्यामुळे तुम्ही Cyber Security Expert म्हणून करीयर करताय आणि चांगली स्कील तुमच्याकडे असेल तर फक्त भारतात नाही तर जगभरात तुम्हाला मागणी असेल. cyber fraud करणारे black hat hacker किंवा grey hat hacker असतात जे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना नुकसान पोहोचवतात किंवा कोणी सांगितल्यानुसार data चोरी करणे, computer system disrupt करणे यांसारखे काम करत असतात. पण यांच्या attack पासून जे white hat hacker असतात ते लोकांना वाचवत असतात. आणि अश्या white hat hacker ची गरज आज सर्व जगाला आहे.

या क्षेत्रात विविध प्रोफेशन मध्ये तुम्ही करीयर करू शकतात ते खालीलप्रमाणे

  • Cybersecurity analyst
  • Penetration tester
  • Security architect
  • Security manager
  • Chief information security officer (CISO)
  • etc.

2)Prompt Engineering

मित्रांनो आजच्या स्थितीत तुम्ही युट्युब, Instagram, T.V., News, सर्वीकडे एकच नाव ऐकत असाल ते म्हणजे “AI” Artificial Intelligence. मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या employees ला जॉब वरून काढताय. सर्वीकडे layoffs सुरु आहे. आणि लोक त्याच एकच कारण सांगताय ते म्हणजे AI पण खरच AI हा एवढा भयंकर आहे का? कि जो लोकांची काम काही क्षणातच पूर्ण perfection ने करेल. तर हो. सध्या AI हि technology ची सुरुवात आहे. काही AI चे टूल्स फक्त beta mode ला आहेत तरी ते माणसाहून जास्त वेगाने काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि त्यामुळेच जे खूप simple task असायचे जे करण्यासाठी माणसाला वेळ लागायचा ते AI खूप लवकर करतो म्हणून कंपन्या अश्या लोकांना कामावरून काढत आहे.

पण जरी जुने काही करीयर AI मुळे नाहीसे होत असले तरी AI नवीन संधी सुद्धा सर्वांसाठी घेऊन आला आहे. याला एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजू. सुरुवातीला जेव्हा मशील यायला लागली industrialization व्हायला लागल तेव्हा मशिन हि माणसांपेक्षा १० पट वेगाने जास्त उत्पादन देत होती त्यामुळे लोकांना वाटले कि आपले काम आता जाणार पण असे झाले नाही. उलट मशिन आल्यामुळे ते मशिन चालविण्यासाठी स्कीलफुल लोकांची आवश्यकता कंपन्यांना लागली आणि आजसुद्धा कंपनीमध्ये मशिन असेल तर त्या मशिनला operate करणारी माणसे आहेत. same कंडीशन computer जेव्हा नवीन मार्केट मध्ये आल तेव्हा होती कि, आता computer सर्व करेल तर लोकांच्या नोकऱ्या जाणार. पण अस झाल नाही आज सर्वात highest paying जॉब मध्ये software engineers सारखे अनेक प्रोफेशन्स आहेत जे computer चा वापर करूनच काम करतात. आणि AI सोबत पण असच होतय लोकांनी सर्वीकडे पसरवून दिल आहे कि, सर्वांचे जॉब जातील पण अस होणार नाही. जे AI आले आहेत ते स्वतःहून स्वतःला कमांड देत नाही त्यामुळे chatGPT सारखे AI टूल्स आहेत जे कंपन्यांचे काम खूप वेगाने करतात अश्या टूल्सला काहीतरी prompt द्यावे लागते तेव्हा ते AI आपल्याला आउटपुट देतात.

तर एक नवीन करीयर आल आहे ज्याची डिमांड भारतापासून US पर्यंत सर्व कंपन्यांना आहे ते म्हणजे Prompt Engineering. यामध्ये तुम्हाला AI टूल्स वापरण्याची salary दिली जाते. म्हणजेच कंपनीचे काम AI कडून तुम्हाला करून घ्यायचे असते. AI ला योग्य तो Prompt देऊन आवश्यक तो आउटपुट मिळविणे हि खूप महत्त्वाची स्कील आहे.

3)Data Scientist

तुम्ही खूप लोकांकडून कुठेतरी ऐकल असेलच “Data is the new Oil”. भारताचे पंतप्रधान Houston Texas, USA येथे एका इव्हेंट मध्ये बोलत असतांना म्हणाले होते कि, “Data is the new Gold” कारण आजच्या डिजिटल युगामध्ये Data च्या अभ्यास करून मोठ मोठ्या कंपन्या तयार होत आहेत. Data Research करून लोकांचे प्रोब्लेम सोडवण्यासाठी नवनवीन टेक भारतात येत आहेत. जस शास्त्रज्ञ रिसर्च करून त्यावर उपाय शोधतात तसच काम data साठी सुद्धा केल जात आहे.

यामध्ये बिसनेसेस, कंपन्यांना गरज आहे कि, त्यांच्या कडे असणारा data analysis करून लोकांना कोणत्या गोष्टी चांगल्या वाटताय कोणत्या गोष्टी लोकांना आवडत नाहीये त्यावर काय डेव्हलप केले जाऊ शकते. ज्यामुळे त्या कंपनीचे प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांना आवडतील हे सर्व काम data scientist, data analyst सारखे अनेक लोक करत असतात.

2020 मधील एका रिपोर्ट नुसार ९३ हजार data scientist या पदासाठी असलेले जागा खाली होते कारण खूप कमी लोकांकडे ती स्कील आहे तुम्ही जर ती शिकून घेताय तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

यांसारखे अनेक करीयर आहेत ज्याबद्दल तुम्हाला पुढील ब्लॉग मध्ये माहिती मिळेल त्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा.

  • UI/UX designer
    Artificial Intelligence engineer
    Machine Learning engineer
  • Drone Pilot
  • EV Industry
  • Robotics Engineer
  • Blockchain Developer
  • Cloud Architect
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version