डिलिव्हरी बॉय जॉब बद्दल संपूर्ण माहिती | डिलिव्हरी बॉयची नोकरी कशी मिळवता येते | How to get a delivery boy job

     आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकालाच कामाची आवश्यकता असते, त्यासाठी काही लोक नोकरी सोबत व्यवसाय करतात तर काही लोक व्यवसायासोबत पार्ट टाइम नोकरी किंवा फ्रीलान्सिंग वर्क सुद्धा करतात. काही लोक दिवसभर नोकरी करतात आणि नंतर छोटा मोठा व्यवसाय चालवतात. आज आपण ज्या लोकांना डिलिव्हरी बॉयचे काम करायचे आहे त्यांच्यासाठी हे काम कसे मिळवता येईल आणि त्याबद्दलची इतर माहिती जाणून घेणार आहोत…

डिलिव्हरी बॉय हा जॉब करण्यासाठी पुढील क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहे : –

१ . ई-कॉमर्स वेबसाईट प्रॉडक्ट्स –

ॲमेझॉन ,फ्लिपकार्ट , मीशो यांसारख्या कित्येक ई-कॉमर्स वेबसाईट आहे ज्यांना ग्राहकांनी ऑर्डर केलेले प्रॉडक्ट्स त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोच करण्यासाठी डिलिव्हरी बॉय ची आवश्यकता असते.

२ . फूड डिलिव्हरी कंपन्या –

स्विगी ,झोमॅटो यांसारख्या फूड डिलिव्हरी कंपन्या सुद्धा डिलिव्हरी बॉय नेमतात कारण डिलिव्हरी बॉय हे ग्राहकांनी दिलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स हॉटेलमधून ग्राहकांपर्यंत त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोच करतात, हे काम नियोजित वेळेमध्ये होणे गरजेचे आहे कारण फूड डिलिव्हरी ही वेळेमध्ये होणे गरजेचे असते.

३ .  कुरिअर कंपन्या –

DTDC, Blue Dart, FedEx यांसारख्या कुरिअर कंपन्या सुद्धा डिलिव्हरी बॉय नेमतात कारण इतर खूप साऱ्या कंपन्या किंवा खूप सारे कुरिअर असतात की जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवावे लागतात.

४ . मेडिकल संदर्भामधील कंपन्या –

1MG, pharmeasy, netmeds यांसारख्या फार्मा क्षेत्रामधील कंपन्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गोळ्या औषधे पोहोचवतात त्यामुळे या कंपन्यांना सुद्धा कुरिअर बॉय ची आवश्यकता असते.

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याचे फायदे | Benefits –

– हा जॉब पार्ट टाइम तसेच फुल टाइम करता येतो.

– तुम्ही इतर जॉब करत असला तरी सुद्धा हा जॉब पार्ट टाइम करू शकता.

– आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील आजूबाजूचा परिसर आपण निवडू शकतो.

– योग्य तो पगार मिळतो तसेच पेट्रोलचा खर्च सुद्धा मिळतो.

– ज्यांना फिरण्याची आवड आहे त्यांना या जॉबचा कंटाळा येणार नाही.

डिलिव्हरी बॉय हा जॉब करण्यासाठी लागणारी पात्रता | Eligibility –

– अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे.

– कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण असावे.

– स्थानिक भाषेसोबतच थोडीशी इंग्रजी भाषा आली तर उत्तम कारण काही कंपन्या इंटरनॅशनल सुद्धा असतात. 

– स्वतःकडे एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे, स्मार्टफोन व्यवस्थित रित्या वापरता यावा.

– स्वतःकडे दू चाकी असणे गरजेचे आहे.

डिलिव्हरी बॉय हा जॉब करण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents –

– ड्रायव्हिंग लायसन्स तसेच इन्शुरन्स,RC

– पर्सनल डॉक्युमेंट्स आधार कार्ड ,पॅन कार्ड, वोटर आयडी

– बँक अकाउंट डिटेल्स

– दहावी पास सर्टिफिकेट 

डिलिव्हरी बॉय जॉब साठी अर्ज | Application –

– हा जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून जॉब करायचे आहे त्या कंपनीच्या सेंटरमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता.

– तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतो.

– ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या कंपनीसाठी काम करायचे आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन “अप्लाय ऑनलाईन”ऑप्शन सिलेक्ट करा.

– त्यानंतर डिलिव्हरी बॉय साठी ज्या ठिकाणी एप्लीकेशन करता येते त्या ऑप्शन वर क्लिक करून तेथील फॉर्म व्यवस्थित भरावा.

– त्या कंपनीद्वारे समोरून कॉल करण्यात येतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment