दिवाळीमध्ये करता येणारे पाच व्यवसाय | Five businesses that can be done in Diwali | Diwali Business – 

दिवाळीमध्ये करता येणारे पाच व्यवसाय | Five businesses that can be done in Diwali | Diwali Business – 

      आजच्या लेखामध्ये आपण असे पाच व्यवसाय बघणार आहोत की जे दिवाळीमध्ये सुरू करता येऊ शकतात आणि कमी कालावधीमध्ये जास्त नफा सुद्धा मिळवून देऊ शकतात. चला तर सुरुवात करूयात…

१ . मातीच्या पणत्यांची विक्री करणे –

दिवाळी म्हटलं की मातीच्या पणत्या आल्याच… दिवाळीच्या पणत्या व्यतिरिक्त दिवाळीचा सण नक्कीच अपूर्ण वाटू शकतो. म्हणूनच मातीच्या पणत्या विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. या पणत्यांमध्ये अगदी साध्या पणत्या पासून ते आकर्षक अशा वेगवेगळ्या डिझाईन असणाऱ्या पणत्या बनवून सुद्धा तुम्ही विकू शकता. हँडमेड पणत्या सुद्धा सध्या जास्त ट्रेडिंगला आहेत. तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स लावून नक्कीच या व्यवसायामध्ये चांगला नफा कमवू शकता. पणत्या स्वतः बनवणे सगळ्यांना शक्य नसते, म्हणून तुम्ही होलसेल दरामध्ये पणत्या खरेदी करून नंतर त्या पणत्यांना डेकोरेट करून विकू शकता.

२ . आकाश कंदील विक्री व्यवसाय –

        दिवाळी सणा मधील महत्त्वाचा घटक म्हणजे आकाश कंदील. लहानपणी सुद्धा चित्र काढताना दिवाळी सणाचे चित्र काढायला लावलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपण आकाश कंदील काढायचो…आठवतंय ना…😇…?

       आकाश कंदील तुम्ही होलसेल दरामध्ये खरेदी करून मग त्याची विक्री करू शकता किंवा तुमच्याकडे जर आकाश कंदील बनवण्याची कौशल्य असेल तर तुम्ही सुद्धा स्वतः आकाश कंदील बनवून विकू शकता. अगदी कागदी आकाश कंदील पासून ते खणाच्या आकाश कंदील पर्यंत विविध प्रकार बनवून तुम्ही विकू शकता.

३ . पूजेचे साहित्य आणि फुलांची विक्री व्यवसाय –

दिवाळीमध्ये वेगवेगळ्या दिवशी आवश्यक असणारे पूजेचे साहित्य तसेच फुलांची विक्री हा व्यवसाय सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. हा व्यवसाय कमी कालावधीसाठी जरी असला तरी जास्त नफा मिळवून देऊ शकतो. दिवाळीमध्ये ज्या पूजेच्या साहित्याच्या आवश्यकता असते ते सर्व तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुले, फुलांपासून तयार केलेले हार, फुलांचे तोरण सुद्धा तुम्ही विकू शकता. पूजेचे साहित्य आणि फुले होलसेल दराने आणून त्याची विक्री करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

४ . रांगोळी आणि रांगोळीचे उपकरणे विक्री व्यवसाय –

अगदी कोणताही सण म्हंटला तर रांगोळी ही आलीच… अगदी सण समारंभ नसेल तरीसुद्धा बऱ्याच घरांमध्ये दररोज देवासमोर आणि दारासमोर रांगोळी काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला नक्कीच जास्त महत्त्व आहे. जे लोक दररोज रांगोळी काढत नाहीत ते लोक सुद्धा दिवाळीच्या वेळी आवर्जून दिवाळीच्या वेळी रांगोळी खरेदी करतात. आता रांगोळी काढण्यासाठी निरनिराळे उपकरणे सुद्धा उपलब्ध आहेत तसेच विविध डिझाईन्सचे स्टेन्सिल्स असे विविध उपकरणे सुद्धा तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता.

५ . सजावटीच्या वस्तू विक्री व्यवसाय –

दिवाळीच्या वेळी आपल्या घराला भरपूर सजावट केली जाते. वेगवेगळ्या सजावटीच्या गोष्टींनी आपले घर अगदी आपण छान पैकी सजवतो. म्हणूनच दिवाळीच्या वेळेस सजावटीच्या वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय जर सुरू केला तर नक्कीच फायद्यामध्ये हा व्यवसाय राहू शकतो. सजावटीच्या वस्तूंमध्ये खूप व्हरायटी उपलब्ध आहेत, ह्या सजावटीच्या वस्तू होलसेल दरामध्ये आणून त्याची विक्री दिवाळीच्या काळामध्ये आपण करू शकतो.

    अशाप्रकारे वरील व्यवसाय दिवाळीच्या काळामध्ये करून चांगला नफा कमवता येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment