पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा योजना | Post Office Gram Suraksha Yojana | रोज ५० रुपयांची बचत करून ३५ लाखांपर्यंतचा परतावा मिळवता येऊ शकतो…

पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा योजना | Post Office Gram Suraksha Yojana | रोज ५० रुपयांची बचत करून ३५ लाखांपर्यंतचा परतावा मिळवता येऊ शकतो…

      भारतीय पोस्ट ऑफिस मार्फत अनेक बचत योजना राबवल्या जात असतात. या योजनांमध्ये आपल्या भारतामधील असंख्य नागरिक गुंतवणूक सुद्धा करतात कारण या योजना लोकांना विश्वासार्ह अशा वाटतात आणि त्या असतात सुद्धा… भारतीय पोस्टमार्फत चालवली जाणारी अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना.

Advertisement
 या योजनेबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत…

पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा योजना | Post Office Gram Suraksha Yojana –

– पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही 1995 मध्ये आपल्या भारतामधील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

– या योजनेचा लाभ बँकेमार्फत किंवा पोस्ट ऑफिस मार्फत घेऊ शकतात.

– ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 19 वर्ष ते 55 वर्ष इतकी आहे.

– पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

– या योजनेचा प्रीमियम मासिक,त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अशा रीतीने भरता येऊ शकतो. 

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये किती गुंतवणूक केल्यास किती रकमेचा परतावा मिळू शकतो ,हे बघुयात…

– जर समजा एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला 1,515 रुपये या योजने मध्ये गुंतवले तर त्याला 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. 

– जर वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना सुरू केली असल्यास, 55 वर्षापर्यंत तर 1,511 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जर वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली तर दर महिन्याला 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत दर महिन्याला 1411 रुपये द्यावे लागतील.

– जर प्रिमियम चुकला तर ३० दिवसांच्या आत जमा करू शकता.

परतावा –

 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये

 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये 

 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

– ग्राम सुरक्षा योजने अंतर्गत वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम दिली जाते.

– जर समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे सोपवली जाते.

– ग्राहक ग्राम सुरक्षा योजना सुरू केल्यानंतर 3 वर्षानंतर योजना थांबवू शकतो, परंतु अशा वेळी त्या व्यक्तीस कोणताही फायदा मिळत नाही.

– या योजनेमध्ये गुंतवणूक करून चार वर्षे झाल्यानंतर कर्ज सुद्धा घेता येऊ शकते.

अर्ज कसा करावा ?

– सर्वप्रथम नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

– त्यानंतर त्या ठिकाणावरून या योजनेचा फॉर्म मिळवा अथवा भारतीय पोस्ट च्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म डाऊनलोड करता येऊ शकतो.

– फॉर्म मिळाल्यानंतर फॉर्म व्यवस्थित रित्या भरावा आणि त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत.

– नंतर तुम्हाला जी काही गुंतवणूक करायची आहे ती रक्कम जमा करून ही प्रक्रिया पूर्ण करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment