DPIIT Internship Scheme-2023 | Government Internship | गव्हर्नमेंट इंटर्नशिप –
डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था मधील अंडर ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ,पदवीधर पदवी किंवा संशोधन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप योजना घेवून आले आहेत . ह्या इंटर्नशिप योजनेचा उद्देश ही विद्यार्थ्यांना भारतीय गव्हर्मेंट चे वर्किंग कल्चर तसेच विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती समजून घेण्यासाठी मदत होईल.
DPIIT चे ऑनलाइन पोर्टल 1 मार्च ते 30 एप्रिल आणि 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज प्राप्त करण्यासाठी दरवर्षी या कालावधीत उघडले जाते. 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांचा
प्रत्येक वर्षी जून-ऑगस्ट या कालावधीत इंटर्नशिपसाठी विचार केला जाईल.मार्च-एप्रिल दरम्यान अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस ऑगस्टच्या शेवटी सर्व्हरवरून डिलीट होतो. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांचा इंटर्नशिपसाठी दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी ह्या दरम्यान विचार केला जाईल.जानेवारीच्या शेवटी सर्व्हर मधून ज्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस डिलीट होतो.
विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार एक महिना / दोन महिने किंवा तीन महिन्यांचा कालावधी निवडू शकतात.
या इंटर्नशिप साठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
पात्रता | Eligibility:
खालील डोमेन मध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा रिसर्च करत असलेले उमेदवार या इंटरशिप साठी अप्लाय करू शकतात.
i) इंजीनियरिंग
ii) मॅनेजमेंट
iii) लॉ
iv) इकॉनॉमिक्स
v)फायनान्स
vi) कम्प्युटर्स
vii) लायब्ररी मॅनेजमेंट
Note :- केस टू केस आधारावर आवश्यकतेनुसार इतर डोमेनमधील उमेदवार देखील कन्सिडर केले जाऊ शकतात.
इंटर्नशिपचा कालावधी:-
इंटर्नशिपचा कालावधी किमान एक महिना आणि जास्तीत जास्त तीन महिने आहे.
इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
जे इंटर्नशिपचा आवश्यक कालावधी समाधानकारकपणे पूर्ण करणार नाहीत त्यांना कोणतेही प्रमाणपत्र किंवा स्टायपेंड दिले जाणार नाही.
एका वेळी निवडलेल्या इंटर्नची कमाल संख्या – 20 पेक्षा जास्त नाही
स्टायपेंड: 10000/- रुपये (दहा हजार रुपये) प्रती महिना इंटर्नला स्टायपेंड दिले जाईल.
अधिक माहितीसाठी 👇🏻 –
Apply LINK- Form
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |