Election Business Ideas | Top 5 Business Ideas for the 2024 Election Season | इलेक्शन दरम्यान करता येणारे बिझनेस | Best business ideas –

Election Business Ideas | Top 5 Business Ideas for the 2024 Election Season | इलेक्शन दरम्यान करता येणारे बिझनेस | Best business ideas –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण इलेक्शन कालावधीमध्ये कोणते बिजनेस ( Election Business Ideas )करता येऊ शकतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या वेबसाईटवर तसेच आपल्या आयकॉनिक मराठी या यूट्यूब चॅनल वर विविध व्यवसायाबद्दल माहिती आपण घेऊन येत असतो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण असे काही व्यवसाय ( Election Business Ideas ) बघणार आहोत की जे निवडणुकीच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये चालू शकतात म्हणजेच या व्यवसायांना निवडणुकीच्या काळात नेहमीपेक्षा अधिक मागणी असते.

Advertisement

Election Business Ideas | निवडणुकीदरम्यान करता येणारे व्यवसाय –

Election Business Ideas

१.रेंटल बिझनेस – 

– निवडणूक प्रचारादरम्यान सतत प्रवास आणि वाहतुकीच्या गरजा असल्याने वाहन भाड्याने देणे या सर्विसेसला जास्त मागणी आहे.

– कार आणि व्हॅनपासून ते बसपर्यंत, उमेदवार, प्रचारक आणि पत्रकारांना निवडणुकीच्या काळामध्ये विश्वसनीय आणि एक्ससेबल वाहतुकीची आवश्यकता असते

– प्रचारासाठी किंवा इलेक्शन दरम्यान आवश्यक असणाऱ्या इतर सर्विसेस साठी बाईक किंवा रिक्षा किंवा इतर वाहने भाड्याने देऊन व्यवसाय करता येऊ शकतो. 

– निवडणुकीदरम्यान रिक्षा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वापरल्या जातात त्यामुळे वाहन भाड्याने देऊन चांगला व्यवसाय निवडणुकीदरम्यान चालू शकतो 

२.निवडणुकीच्या थीमवर आधारित वस्तूंचा व्यवसाय –

– आगामी निवडणुका ह्या उद्योजकांसाठी निवडणुकीच्या थीमवर आधारित वस्तूंच्या मागणी मध्ये होणाऱ्या वाढीचा फायदा उठवण्याची संधी देतात.

– टी-शर्ट आणि टोपीपासून बॅनरपर्यंत, राजकीय पक्ष आणि समर्थक त्यांची निष्ठा दर्शविणाऱ्या पक्षांसाठी अशा प्रकारच्या उत्पादनांवर खर्च करण्यास तयार असतात.

– होलसेल मार्केट मधून अशा वस्तू खरेदी करून विक्री केल्यास मोठा नफा मिळू शकतो. या वस्तू तुम्ही होलसेल दराने आणू शकता किंवा प्लेन वस्तू आणून त्यावर प्रिंटिंग करून मग विकू शकता किंवा स्वतःचा प्रिंटिंग व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. प्रिंटिंग व्यवसायाला सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान नेहमीपेक्षा जास्त मागणी असते.

– या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी होलसेल दरामध्ये वस्तू खरेदी करणे खूप महत्त्वाचे आहे.निवडणुकीशी संबंधित व्यापारासाठी प्रमुख उत्पादन केंद्रे मथुरा, उत्तर प्रदेश, सुरत, गुजरात आणि हैदराबाद येथे आहेत.

– या ठिकाणी जाऊन किंवा ऑनलाईन ऑर्डर देऊन होलसेल दरामध्ये वस्तूंची खरेदी करून, राजकीय पक्ष, प्रचाराचे कार्यकर्ते तसेच उत्साही मतदारांना विक्री करू शकता.

३.फूड बिजनेस –

– अन्नाला नेहमीच जास्त मागणी असते, निवडणुकीच्या काळात तर अजूनच जास्त मागणी असते. 

– राजकीय पक्ष त्यांच्या समर्थकांची पूर्तता करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, त्यांना विविध प्रकारचे आकर्षक पर्याय उपलब्ध करून देतात. वडा पाव आणि पोह्यांपासून ते पॅटीस आणि थाळीपर्यंत,स्नॅक्स आणि जेवण हे रॅली आणि कार्यक्रमांमध्ये असतात.

– जिल्हा मतदान पॅनेलने समोसे, चहा आणि बिर्याणी यांसारख्या वस्तूंसाठी निश्चित किंमती देखील निश्चित केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये प्रवेश करणे सोपे होऊ शकते.

– मतदानाच्या वेळी ज्या प्रचार सभा घेतल्या जातात किंवा मतदानाच्या ठिकाणी, प्रचार करतेवेळी अशा विविध ठिकाणी फूड बिजनेस सुरू करता येऊ शकतो.

४.फुलांचा व्यवसाय –

– निवडणुकीदरम्यान तसेच प्रचारादरम्यान फुलांचा खूप वापर केला जातो. राजकीय नेत्यांसाठी मोठमोठे हार बनवले जातात, त्या हारांची किंमत 500, 5000 रुपये किंवा अगदी पन्नास हजार रुपये सुद्धा असू शकते.

– राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्याकरता मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर केला जातो आणि त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान फुलांची विक्री सुद्धा अधिक प्रमाणामध्ये होत असते. 

– त्यामुळेच निवडणुकीच्या काळामध्ये फुलांच्या व्यवसायाला नेहमीपेक्षा अधिक मागणी असते.

५.फोटोग्राफी –

– तुम्ही अनुभवी फोटोग्राफर असाल किंवा कुशल ड्रोन पायलट असाल, तुम्ही इव्हेंट आणि रॅलींचे फोटोज डॉक्युमेंटेशन करू शकता.

– व्यावसायिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सर्विसेसची मागणी वाढत आहे.

– निवडणूक आयोगाने विविध उपकरणांच्या वापरासाठी विशिष्ट दर निश्चित केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमची किंमत निश्चित करणे सोपे होईल. 

– आवश्यक उपकरणांमध्ये गुंतवणूक करून आणि राजकीय पक्षांना आणि मीडिया आउटलेट्सना तुमच्या सर्विसेस ऑफर करू शकता.

      अशाप्रकारे हे पाच असे व्यवसाय  ( Election Business Ideas ) आहेत की जे निवडणुकीच्या काळामध्ये जास्त प्रमाणावर चालतात म्हणजेच नेहमीपेक्षा जास्त मागणी निवडणुकीच्या काळात या व्यवसायांना असते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment