Event Planner/Event Management Business
Introduction(प्रस्तावना)
मित्रांनो जगातील प्रत्येक व्यक्ती ज्याच्या जीवनात एक असा आनंदमय सोहळा असतो. तो सोहळा म्हणजे लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, सण उत्सव असतील, किंवा काही विशेष कार्यक्रम असेल. अश्या प्रत्येक सोहळ्यासाठी आपण आधी आयोजन/नियोजन करून planning करत असतो. पण तुम्हाला हे पण माहिती असेलच कि, प्रत्येक कार्यक्रम घरातील मंडळीच कार्यक्रमाची planning नाही करत. तर एक event plaaner असतो तोच व्यक्ती सर्व आयोजन/नियोजन पासून शेवट पर्यंत सर्व management करत असतो.
आणि हाच बिसनेस आपल्याला करता येईल जर तुम्हाला management जमत असेल तर या बिसनेस मध्ये hard work आणि smart work जास्त करावे लागते. त्यामुळे इथे डोक्याचा वापर करून सर्व लोकांना manage करूनच कोणताही event paln करून त्याला manage केले जात असते.
Management
ज्याही eventच management आपल्याला करायचे असेल त्यानुसार टीम hire करावी लागेल. त्यानंतर सर्व टीम लीडर्सची मिटिंग घ्यावी लागेल. आणि पुढील plan करावा लागेल. आणि जसा-जसा आपल्याला या क्षेत्रातला experience येत जाईल. आणि आपला पोर्टफोलिओ बिल्ड होत जाईल. तसे-तसे आपल्याला येणारे orderसुद्धा वाढत जातील.
कोणती टीमची गरज आपल्याला असेल(TeamWork)
समजा एखाद्या लग्नाचा event तुम्हाला manage करायचा आहे. यावेळेस तुमच्याकडे एक decoration टीम लागेल, cameraman, catering service, sound system, Pavilion(मंडप), ईत्यादी.
टीम कशी निवडावी
जे लोक आपल्याला टीममध्ये काम करतील हे सर्व आपल्या परिसरातील top levelला काम करणारे Professional लोक असले पाहिजेत. जेणेकरून तुम्ही लोकांकडून charges जरी जास्त घेणार पण तुमच work प्रोफेशनल असल तर भविष्यात तुमची खूप डिमांड असू शकते. आणि असे केल्यामुळे वेळ प्रसंगी तुम्ही जास्त order आल्यामुळे लोकांच्या order cancel करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते.
investment(गुंतवणूक)
या बिसनेस मध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. उलट समोरून तुम्हाला advance पैसे दिले जातील. आणि त्या advance पैश्यांमधूनच तुमचा पुढील टीमला तुम्ही payment करून शकणार.
आणि आपल्या बिसनेसच्या मार्केटिंग साठी जे पण आपण खर्च करतो. ते बिसनेसच्या investment मध्ये येतच नाही. तो एक मार्केटींगचा वेगळा भाग आहे.
मार्केटिंग
1. या बिसनेस मध्ये तुम्हाला सर्वात चांगली मार्केटिंग करता येऊ शकते. ती मार्केटिंग म्हणजे google ads आणि youtube द्वारे. तुम्ही फक्त 1000/- रुपये google ads वर लावले. त्यात 100 लोकांनी जरी तुमच्या adsला click केल आणि फक्त 2 लोकांनी जरी तुम्हाला order दिली. तर खूप मोठा फायदा फक्त 1000/- मध्ये होऊ शकतो.
असाच same formula youtube वगैरेच्या माध्यामतून तुम्ही वापरू शकतात.
2. तुमचे प्रोफेशनल visiting card असणे गरजेचे आहे.
3. एक अशी वेबसाईट, instagram/facebook page, google my business व ईतर सर्व ऑनलाईन platform वर तुमच्या बिसनेसच्या पोर्टफ़ोलिओ असणे गरजेचे आहे. तेथून पण order येण्याचे चान्सेस आहेत. आणि जेव्हा पण तुमच्या Clientला काही पहिले केलेली कामे दाखवायची असतील तर त्याद्वारे दाखवू शकतात.
ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार तर तुमचा पोर्टफोलिओ खाली असेल अश्यावेळेस तुमच्या मधील सर्व लोकांचा data collect करून तो दाखवू शकतो. कारण त्याच लोकांची टीम तुमचे काम करणार असेल.
4. प्रत्येक कॉन्फरन्स hall, मिटिंग hall, birthday hall, wedding लॉन्स ईत्यादींसोबत टाय-अप करून घ्यावा. आणि प्रत्येकाने आपल्याला जर customer आणून दिले. तर त्यांचे फिक्स कमिशन सुद्धा सेट करून द्यावे. असे केल्याने आपली मार्केटिंगसुद्धा फ्री मध्ये होईल. आणि order सुद्धा मिळतील. त्यामुळे प्रत्येक order मागे कमिशन सेट करून द्यावे.
Profit(नफा)
या बिसनेस मध्ये जेवढा profit असेल तो आपल्या smart work वर डिपेंड असणार आहे. तरी एका मोठ्या event मागे 15 ते 20 हजार आणि regular होणाऱ्या लहान event मागे 5 हजार रुपये सुरुवातीला तुमचा experience नसला तरी तुम्ही एवढा profit कमवू शकतात. ते सर्व तुमच्या कामावर डिपेंड आहे.
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम