पार्ट टाईम शिक्षणा सोबत करता येणारे जॉब | टॉप 3 सर्वात जास्त मागणी असणारे स्किल्स जे शिकून तुम्ही शिक्षणा सोबत पार्ट टाईम काम करू शकतात.

मित्रांनो तुमच्या कडे जर ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट राईटींग या तिघांपैकी कोणतीही एक स्कील असेल तर तुम्ही पार्ट टाईम शिक्षणासोबत साईड बाय साईड जॉब करू शकतात. आणि कोणकोणत्या क्षेत्रात त्या स्किल्सची डिमांड असेल त्याची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे.

YouTubeमित्रांनो एक Youtuber ला त्याचे channel manage ठेवण्यासाठी regular व्हिडिओ अपलोड करून channel maintain ठेवावे लागते. आणि व्हिडिओ बनविण्यासाठी त्याला मदत लागते. एक ग्राफिक डिझाईनरची जो ग्राफिक डिझाईनर त्याच्या व्हिडिओसाठी thumbnail create करून देऊ शकतो. channelचा लोगो तयार करून देऊ शकतो, channel आर्ट तयार करून देऊ शकतो. एक व्हिडिओ एडिटरही लागतो. जो व्हिडिओ एडीट करून देऊ शकतो. त्यानंतर एक content writer लागतो जो संपूर्ण script तयार करतो ज्या script द्वारे व्हिडिओ मध्ये सांगण्याची सर्व माहिती असते. आणि या तीनही स्किल्स अश्या आहेत. ज्यांची डिमांड youtube क्षेत्रामध्ये कधी संपणार नाही.

Advertisement

Bloggingब्लॉगिंग मध्ये सर्वात जास्त डिमांड असते writerची जो blog मध्ये जे content अपलोड करायचे आहे. ते write करू शकतो. आणि google जगातील 1 नंबरच सर्च इंजिन असल्यामुळे तिथे अनेक bloggers जे रोज लाखो blogs/article अपलोड करत असतात. त्याचबरोबर blog ला thumbnail सुद्धा असतो. ते thumbnail डिझाईन करण्यासाठी ग्राफिक डिझाईनरची आवश्यकता त्या bloggerला असते.

Instragram/Social Media Influencer tik tok भारतात banned झाल्यानंतर सध्याच्या स्थितीत instagram reels खूप trending वर सुरु आहे. आणि जे instagram influencer आहेत. त्यांना त्यांचे पोस्ट/रील्स किंवा ईतर व्हिडिओ एडीट करण्यासाठी ग्राफिक डिझाईनर व व्हिडिओ एडिटरची आवश्यकता असते. आणि सोबतच त्या व्हिडिओ किंवा रील साठी जे content लागणार आहे. ते पुरविण्यासाठी एका content writer/Researcher ची आवश्यकता आहे.

Digital Marketing/Advertising जगातली कुठलीही लहान-मोठी कंपनी असो वा बिसनेस असो. आजच्या स्थितीला त्यांच्या बिसनेसची मार्केटिंग ऑनलाईन केल्याशिवाय त्यांची मार्केटिंग अपूर्णच आहे. आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्र खूप अफाट आहे. यामध्ये व्हिडिओ एडीटर, ग्राफिक डिझाईनर यांची डिमांड रोज असते. फक्त कमी स्कीलफुल लोकांची आहे.

          डिजिटल मार्केटिंग द्वारे google/facebook/instagram/youtube किंवा ईतर सोशल मिडिया जिथे ads चालवून आपल्या बिसनेस किंवा सर्विस बद्दल लोकांपर्यंत visual चित्रीकरणाद्वारे जाहिरात करता येते.

फक्त याच क्षेत्रातील लोकांनाच का आपली सर्विस द्यावी – अनेक असे क्षेत्र आहेत जिथे तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग/व्हिडिओ एडिटिंग/ कंटेंट राईटींग करून पार्ट टाईम किंवा शिक्षणासोबत काम करू शकतात. पण त्या क्षेत्रात आज तुम्हाला order येईल. ती पूर्ण करून सबमिट केली तर उद्या परत order ची वाट बघावी लागेल. पण   YouTube, Blogging, Social Media Influencer, Digital Marketing या क्षेत्रात ज्यांना रोज आवश्यकता असते अश्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो. तर आपल्याला उद्याच्या प्रोजेक्टची वाट बघावी लागत नाही. आपल्या दुसऱ्या दिवसाचा schedule अगोदरच तयार असत.

सुरुवात कशी करावी – आपण ईतर वेळेस पहिले असेल तर जॉब साठी आपण कुठेपण apply करतो, तेव्हा त्याची कुठेतरी जाहिरात पाहून apply करत असतो. पण आपण YouTube सारखे ईतर क्षेत्र जे वरील माहितीत पहिले त्यात कुठे hiring निघत नाही. आणि निघत असेल तर ती आपल्याला माहित पडत नाही. त्यासाठी ज्या blogger साठी, infulencer साठी, youtuber साठी किंवा ज्या एजन्सीसाठी आपल्याला आपली सर्विस द्यायची असेल, तर त्यांच्या platform वर त्यांची mail id, सोशल मिडिया handle, किंवा बिसनेस mail मिळतो. तिथे त्यांना message करून रिक्वेस्ट पाठवायची आहे.

त्याआधी आपल्याला चांगले प्रोजेक्ट्स त्यांना दाखविण्यासाठी तयार करावे लागतील. ते आधीच तयार करून ठेवावे. त्यानंतर त्यांना message करावा.

या सर्व स्किल्स कुठून शिकाव्यात YouTube द्वारे तुम्ही सर्व स्किल्स फ्री मध्ये शिकू शकतात.

 

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment