EY Scholarship program I EY स्कॉलरशिप प्रोग्राम I 1 लाख रुपये + सर्टिफिकेट I Best internships 2025
आजच्या ब्लॉग मध्ये EY स्कॉलरशिप प्रोग्राम बद्दल माहिती बघणार आहोत ज्या अंतर्गत 1 लाख रुपये , सर्टिफिकेट आणि इतर काही चांगल्या संधी मिळू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
EY स्कॉलरशिप प्रोग्राम भारतातील महाविद्यालयांमध्ये पदवी कोर्स घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या प्रोग्रॅम मध्ये ‘Building a better working world’ या विषयावर बिझनेस केस सादर करणे याचा समावेश आहे. बिझनेस केस for profit’ किंवा ‘not for profit’ संस्थेसाठी असू शकते जेणेकरून एक चांगले काम करणारे जग निर्माण करण्यास मदत होईल.
बिझनेस केस आयडियामध्ये पूढील गोष्टींचा समावेश असावा:
नवीनता /Innovation
विचारांची स्पष्टता / Clarity to Thought
जिंकण्याची आवड / Passion to Win
कामकाजाच्या जगावर परिणाम / Impact on the working world
निवडलेल्या १० विजेत्यांना १ लाख रुपये बक्षीस आणि EY सोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप तसेच फ्युचर फोकस्ड कौशल्यावर इंडस्ट्री मान्यताप्राप्त डिजिटल क्रेडेन्शियल्स मिळविण्याची संधी दिली जाईल.
पात्रता / EY Scholarship program eligibility –
भारतातील सर्व महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले.
EY स्कॉलर जिंकतील :
१ लाख रुपये
२ महिन्यांची EY इंटर्नशीप
उद्योग मान्यताप्राप्त डिजिटल क्रेडिएन्शियल मिळविण्याची संधी
सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना “A Brand called YOU ” या विषयावर एक लर्निंग मॉड्यूल देखील दिले जाईल आणि त्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळू शकेल.