Finance skill and courses| 5 Essential Skills and Free Online Courses for 2024 | फायनान्स क्षेत्रासाठी आवश्यक असणारे पाच कोर्सेस तेही अगदी फ्री..
क्षेत्र कुठलेही असो, वेळोवेळी आवश्यक स्किल्स शिकत राहणे महत्त्वाचे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण असे काही फायनान्स स्किल्स आणि त्या संदर्भातील कोर्सेस ( Finance skill and courses ) यांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्याचा उपयोग फायनान्स इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतो. जाणून घेऊयात Finance skill and courses याबद्दलच अधिक माहिती…
Finance skill and courses| फायनान्स क्षेत्रासाठी आवश्यक असणारे पाच कोर्सेस –
Advertisement
Table of Contents
Risk Assessment with AI | ए आय सोबत रिस्क असेसमेंट –
– फायनान्सच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, रिस्क ॲनालिसिस आणि रिस्क कमी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण बनली आहे.
– आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे, क्रेडिट रिस्क एनालिसिस आणि फ्रॉड शोधण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल झाला आहे.
– फायनान्स क्षेत्रामधील व्यक्तींना आता या क्षेत्रांवर मशीन लर्निंग मॉडेल्स आणि मेथड कशा लागू केल्या जात आहेत याची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
– तुम्हाला यामध्ये मदत करण्यासाठी Coursera कोर्स महत्त्वपूर्ण ठरू शकतो ज्याचे नाव आहे ” एआय ऍप्लिकेशन्स इन मार्केटिंग अँड फायनान्स .” या 6 तासांच्या प्रोग्रॅम मध्ये रिस्क असेसमेंट साठी एआय कशाप्रकारे वापरायचे याचे फंडामेंटल्स, रिस्क ॲनालिसिस आणि एरर डिटेक्शन साठी असणारे मॉडूल्स यांचा समावेश आहे.
– टेक्निकल बॅकग्राऊंड असो किंवा नसो तरी या कोर्समुळे आवश्यकते फायनान्स स्किल आपल्याला मिळू शकेल.
कोर्स लिंक : https://www.coursera.org/learn/wharton-ai-applications-marketing-finance?specialization=ai-for-business-wharton
या लिंक वर क्लिक करून enroll for free या ऑप्शन वर क्लिक करा, त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यावर पेमेंट ऑप्शन दिसेल परंतु पेमेंट न करता खाली audit असा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा. यामुळे सर्व कोर्स फ्री मध्ये आपल्याला करता येईल किंवा त्यामध्ये असलेल्या सर्व कंटेंट वाचता येईल.
Investment and Wealth Management | इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंट –
– गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापनाच्या लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. पूर्वी व्यक्तींना त्यांचे पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करावे लागायचे किंवा केवळ ह्यूमन वेल्थ मॅनेजर वर अवलंबून रहावे लागायचे. आता एन्ट्री झाली आहे रोबो ॲडव्हायझरची…
– रोबो-ॲडव्हायझर, जे डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफर करत आहेत जे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे, रिस्क टोलरन्सचे मूल्यांकन करू शकतात आणि तुमच्या वतीने आपोआप गुंतवणूक सुद्धा करू शकतात.
– हे अत्याधुनिक असे कौशल्य शिकण्यासाठी, Coursera कोर्स आहे “इनोव्हेशन इन इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजी.” हा 10 तासांचा प्रोग्रॅम रोबो-ॲडव्हायझरचे रोल आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट वर AI चा प्रभाव यासह गुंतवणूक तंत्रज्ञानातील नवीन गोष्टी यांचा अभ्यास होईल.
– हा पूर्ण करून, गुंतवणूक आणि वेल्थ मॅनेजमेंट बद्दल अधिक ज्ञान मिळेल.
कोर्स लिंक :https://www.coursera.org/learn/invest-tech
Use Machine Learning in Portfolio Management | पोर्ट पोलिओ मॅनेजमेंट मध्ये मशीन लर्निंगचा युज –
– पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये मशीन लर्निंग (ML) च्या वापरामुळे गुंतवणूक निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे.
– गुंतवणुकीच्या समस्या सोडवण्यासाठी स्टॅटिस्टिकल एनालिसिस हे प्रायमरी टूल मानले जायचे. आता, कंपन्या त्यांची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वाढवण्यासाठी आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी एमएल मॉडेलच्या पावरचा उपयोग करत आहेत.
– तुमची इंजीनियरिंग बॅकग्राऊंड किंवा ML ची चांगली समज असल्यास, Coursera कोर्सची आहे जो तुम्ही करू शकता ” पायथन आणि एमएल फॉर ॲसेट मॅनेजमेंट .” हा 16-तासांचा प्रोग्रॅम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मध्ये पायथन आणि मशीन लर्निंग याचे नॉलेज देतो.
कोर्स लिंक :
https://www.coursera.org/learn/python-machine-learning-for-investment-management
AI in the insurance industry | ए आय इन द इन्शुरन्स इंडस्ट्री –
– AI आणि fintech च्या एकत्रीकरणामुळे विमा आणि रिअल इस्टेट उद्योगांमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. ही क्षेत्रे आवश्यक कौशल्ये असलेल्यांसाठी चांगली संधी निर्माण करतात.
– या इंडस्ट्री मधील AI- ड्रीव्हन बदलांची चांगली माहिती मिळविण्यासाठी, Coursera कोर्स आहे “Applications of AI, Insurtech, and Real Estate Tech.” हा 3 तासांचा प्रोग्रॅम केस स्टडीज एक्सप्लोर करतो.
कोर्स लिंक : https://www.coursera.org/learn/wharton-ai-application-insurtech-real-estate-technology
Blockchain in Payments | ब्लॉकचेन इन पेमेंट –
– ब्लॉकचेन तंत्रज्ञान आल्यामुळे पेमेंट इंडस्ट्रीवर काही परिणाम झाले आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केट अत्यंत अस्थिर असले तरी, ब्लॉकचेनच्या मूलभूत संकल्पना आणि पेमेंट लँडस्केपवरील त्याचे परिणाम समजून घेणे फायनान्स प्रोफेशनल साठी महत्त्वपूर्ण आहे.
– ब्लॉकचेन आणि पेमेंटमधील त्याचा रोल याविषयी माहिती मिळविण्यासाठी, कोर्सेरा कोर्स आहे “ब्लॉकचेन अँड क्रिप्टोकरन्सी एक्स्पलेनड.” या 8-तासांच्या प्रोग्रॅम मध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी, क्रिप्टोकरन्सीची स्ट्रेंथ आणि विकनेस यांचा समावेश आहे.
कोर्स लिंक :
https://www.coursera.org/learn/crypto-finance?specialization=financialtechnology
उपलब्ध असलेल्या मोफत ऑनलाइन कोर्सचा लाभ घेऊन या पाच आवश्यक अशा फायनान्स कौशल्यांमध्ये ( Finance skill and courses ) प्रभुत्व मिळवू शकता. फायनान्स करिअरमध्ये चांगले स्थान निर्माण करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक स्किल्स शिकणे महत्त्वाचे आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |