1 एप्रिल 2024 पासून आर्थिक क्षेत्रात होणारे बदल | finance updates 2024 | new updates of financial year 2024 – 25  | The changes from April 1 are going to be good or bad ?

1 एप्रिल 2024 पासून आर्थिक क्षेत्रात होणारे बदल | finance updates 2024 | new updates of financial year 2024 – 25 

     दरवर्षी आर्थिक वर्ष बदललं की आर्थिक क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल हे होतच असतात, यापैकी काही बदल हे फायदेशीर सुद्धा ठरतात,चला तर जाणून घेऊयात यावर्षी नेमकी काय बदल ( finance updates 2024 ) किंवा काय नवीन नियम लागू झाले आहेत.

1 एप्रिल 2024 पासून आर्थिक क्षेत्रात होणारे बदल | finance updates 2024 –

* New tax regime default –

न्यू टॅक्स रेजिम सेम राहणार आहे, कर सेम भरावा लागणार आहे.

*Old tax regime –

जर ओल्ड टॅक्स रेजिमने कर मोजणी करायची असेल तर तसं कंपनीला सांगावं लागणार आहे.

* New tax regime slab –

3 लाखांपर्यंत – 0%

3 ते 6 लाख – 5%

6 ते 9 लाख – 10%

9 ते 12 लाख – 15%

12 ते 15 लाख – 20%

15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास – 30%

*NPS new login rule | NPS सुरक्षिततेतील बदल | NPS नवीन लॉगिन नियम –

 देशभरात ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खात्यांसाठी चालू लॉगिन प्रक्रियेत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे, ती अशी की आता टू फॅक्टर आधार ऑथेंटीकेशन ( two factor Aadhar authentication ) प्रोसेस करावी लागणार आहे. यामध्ये आपला आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी मिळेल तो त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे.

* Insurance| विमा पॉलिसी परत करायची असेल तर आयआरडीए बदल –

आपण पॉलिसी घेतल्यानंतर एकतर सिंगल प्रीमियम भरतो किंवा हप्त्यांमध्ये प्रीमियम भरत असतो परंतु काही कारणास्तव मॅच्युरिटीपूर्वीच जर आपल्याला आपली पॉलिसी बंद करायची असेल तर अशावेळी सरेंडर चार्ज आकारला जातो, हा चार्ज कापून घेऊन उर्वरित रक्कम आपल्याला दिली जाते.

Single Premium | सिंगल प्रीमियम –

– पॉलिसी तिसऱ्या वर्षी बंद केली तर भरलेल्या रकमेच्या  75% पैसे मिळतील.

– पॉलिसीच्या शेवटच्या दोन वर्षांमध्ये बंद केलीत तर  भरलेल्या रकमेच्या 90% पैसे परत मिळतील.

Non – Single Premium | नॉन सिंगल प्रीमियम –

– जर पॉलिसी दुसऱ्याच वर्षी बंद केलीत तर भरलेल्या हप्त्यांच्या रकमेच्या 30% पैसेच परत मिळतील.

– पॉलिसी तिसऱ्या वर्षी बंद केली तर भरलेल्या हप्त्यांच्या रकमेच्या 35% पैसे परत मिळतील.

– पॉलिसी चौथ्या ते सातव्या वर्षादरम्यान बंद केली तर  भरलेल्या हप्त्यांच्या रकमेच्या 50% पैसे परत मिळतील.

– पॉलिसीच्या शेवटच्या दोन वर्षांमध्ये बंद केली तर भरलेल्या हप्त्यांच्या रकमेच्या 90% पैसे परत मिळतील.

थोडक्यात, या नियमानुसार जर तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये पॉलिसी बंद केली तर कमी पैसे मिळतील आणि जर तिसऱ्या वर्षा पेक्षा अधिक कालावधीनंतर बंद केली तर जास्त पैसे मिळतील.

OLA MONEY  | ओला मनी –

ओला मनीने Small prepaid payment instrument बद्दल कळवले आहे, आता दर महिन्याला जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतकी रक्कम ओला मनी वॉलेट (Ola Money Wallet) मध्ये लोड करता येणार आहेत ,पूर्वी हे लिमिट दोन लाखांपर्यंत होते.

EPFO Employees’ Provident Fund Organisation | एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन –

जर आपण नोकरी बदलली तर अशावेळी आपला प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स हा आपोआपच नवीन संस्थेसोबत च्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे, त्यासाठी पीएफ ट्रान्सफर प्रक्रिया करावी लागणार नाही.

Fastag KYC –

फास्ट टॅग केवायसी करणे अनिवार्य झाले असून जर तसे केले नाही तर फास्ट टॅग डिॲक्टिव्हेट होऊ शकते तसेच जर त्या मध्ये बॅलन्स असेल तर त्याचा सुद्धा उपयोग होणार नाही म्हणजेच तो बॅलन्स प्रोसेस होणार नाही आणि टोल सुद्धा दुप्पट भरावा लागू शकतो.

. अशाप्रकारे एक एप्रिल पासून काही आर्थिक बदल ( finance updates) होणार आहेत.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version