फुलांच्या वेस्ट पासून बनवा विविध प्रोडक्ट्स आणि सुरू करा हा व्यवसाय | Flower waste recycling Business | फ्लावर वेस्ट रिसायकलिंग बिझनेस | Best business ideas 2024

फुलांच्या वेस्ट पासून बनवा विविध प्रोडक्ट्स आणि सुरू करा हा व्यवसाय | Flower waste recycling Business | फ्लावर वेस्ट रिसायकलिंग बिझनेस

     फुले ही विविध ठिकाणी वापरली जातात, फुलांचा वापर मंदिरामध्ये, पूजेच्या ठिकाणी, सजावटीसाठी आणि इतर विविध ठिकाणी केला जातो. फुले सुकल्यानंतर फुले कचऱ्यामध्ये फेकून दिली जातात,परंतु त्याऐवजी जर फुलांचे रिसायकलिंग केले तर त्यापासून विविध प्रॉडक्ट्स बनवले जाऊ शकतात. यामुळे फुलांचा सुयोग्य उपयोग सुद्धा होईल , वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा होईल आणि आर्थिक विकास सुद्धा होऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण फ्लावर वेस्ट रिसायकलिंग बिजनेस ( Flower waste recycling Business ) बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

Advertisement
Flower waste recycling Business

Flower waste recycling Business | फ्लावर वेस्ट रिसायकलिंग बिझनेस –

फ्लॉवर वेस्ट रिसायकलिंग व्यवसायाचे फायदे  | Benefits of Flower waste recycling Business –

– फ्लॉवर वेस्ट रिसायकलिंग व्यवसायाचे वैयक्तिक फायदे तर आहेत त्याचबरोबर पर्यावरणाला आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा अनेक सकारात्मक असे परिणाम दिसून येतात.

– फुल विक्रेते, समारंभाचे ठिकाण अशा ठिकाणावरून फुलांचा पुनर्वापर केल्यामुळे कचरा कमी होण्यास मदत होते.

– मिथेन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.

– फुलांचे रीसायकलिंग करून कंपोस्ट, जैवइंधन तसेच सेंद्रिय खते तयार करतात, यामुळे रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी होते, हे खते शेतामध्ये वापरल्यामुळे मातीची सुपीकता वाढते व वनस्पतींचा विकास सुद्धा होण्यास मदत होते.

– जे सुकलेले फुले असतात ते तसे कचऱ्यामध्ये जमा होतात परंतु त्या ऐवजी जर त्यांचे रिसायकलिंग केले आणि उपयुक्त वस्तू किंवा उपयुक्त गोष्टी बनवल्या तर त्यामुळे कच्च्या मालाची गरज बऱ्यापैकी कमी होते आणि त्यामुळे एकूण उत्पादन खर्चामध्ये कपात होते आणि प्रॉफिट मार्जिन चांगले राहू शकते.

– हा व्यवसाय सुरू केल्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात.

– एकूणच फुलांच्या कचऱ्याचा पुनर्वापर केल्यामुळे चांगले फायदे बघण्यास मिळतात.

फ्लॉवर वेस्ट रिसायकलिंग व्यवसाय: प्रक्रिया | Flower waste recycling Business Process –

    फुलांच्या कचऱ्यापासून रिसायकलिंग करण्यासाठी सुकलेली फुले किंवा फ्लावर वेस्ट व्यवस्थितपणे गोळा करणे, व्यवस्थित रित्या हाताळणे आणि त्याचे उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतरण करणे गरजेचे आहे.

१. फुलांचा कचरा जमा करणे | Flower waste collection –

– विविध ठिकाणावरून जसे की धार्मिक ठिकाणे, फुलांची दुकाने, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी या ठिकाणी उरलेली फुले किंवा सुकलेली फुले असतात तिथून ती जमा करा.

– या ठिकाणावरील लोकांशी संपर्क साधून त्यांना व्यवसाय बद्दल सांगून त्यांच्याकडून नियमितपणे फ्लावर वेस्ट जमा करू शकता.

२ . फुलांच्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि साफसफाई | Flower waste sorting and cleaning –

– आता जमा केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थित रित्या वर्गीकरण करा आणि त्यामध्ये असणारे प्लास्टिक किंवा इतर कचरा बाजूला काढा.

– अशाप्रकारे व्यवस्थित रित्यासाठी सॉर्टिंग आणि क्लिनिंग केल्यामुळे जो फायनल प्रॉडक्ट बनवला जातो त्याची कॉलिटी अधिक चांगली बनते.

३ . श्रेडिंग किंवा चिपिंग | Shredding Or Chipping –

– समजा सुकलेल्या फुलाव्यतिरिक्त इतर उरलेली फुले सुद्धा आपल्याकडे असल्यास त्या फुलांचे छोटे छोटे तुकडे करा असे केल्यामुळे पुढील प्रक्रियेस मदत होते आणि गती मिळते.

४ .  उत्पादने |  Products –

– फुलांच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खते बनवली जाऊ शकतात, त्याच बरोबर बायोगॅस किंवा बायोमास इंधन यांसारख्या जैव ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो.

– त्याचबरोबर फुलांच्या कचऱ्यापासून सुगंधित अगरबत्ती, मेणबत्त्या, धूप, इसेन्शियल ऑईल, आर्ट वर्क्स, सौंदर्य प्रसाधने यांसारखी कित्येक उत्पादने बनवता येऊ शकतात.

– जे उत्पादन बनवण्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल ते उत्पादन बनवून त्याची मार्केटिंग करून चांगला व्यवसाय करता येऊ शकतो.

५ . पॅकेजिंग , वितरण आणि मार्केटिंग | Packaging , Distribution and Marketing –

– आपण जी कोणती उत्पादने बनवणार आहात ती उत्पादने पॅक करण्यासाठी सुद्धा जर आपण पर्यावरणास अनुकूल अशी सामग्री वापरली तर अधिकच चांगले, अशी पॅकेजिंग करून योग्यरीत्या मार्केटिंग करून ही उत्पादने विविध ठिकाणी विकू शकतो.

– जर आपण कंपोस्ट खते बनवली तर थेट शेतकऱ्यांना विक्री करू शकतो त्याचबरोबर रोपवाटिकांना सुद्धा विक्री करू शकतो किंवा खतांच्या रिटेल स्टोअर मध्ये विक्रीसाठी देऊ शकतो.

– फ्लावर वेस्ट पासून बनवलेली उत्पादने ही पर्यावरणास हानिकारक नसल्यामुळे ग्राहक नक्कीच या उत्पादनांकडे आकर्षित होतील, त्यामुळे मार्केटिंग करणे सुद्धा सोपे जाईल.

– मार्केटिंग करण्यासाठी ट्रॅडिशनल मार्केटिंग पद्धती सोबतच डिजिटल मार्केटिंग पद्धती सुद्धा वापरल्यामुळे एकंदरीतच सेल वाढण्यामध्ये मदत होते.

६.  फ्लावर वेस्ट रिसायकलिंग व्यवसायासाठी आवश्यक परवाने | Licences required for flower waste recycling Business –

या व्यवसायासाठी लागणारे सर्व आवश्यक परवाने काढून घेणे गरजेचे आहे.

– जीएसटी रजिस्ट्रेशन

– कंपनी रजिस्ट्रेशन

– ट्रेड लायसन्स

– NOC by the state pollution control board

– आणि इतर आवश्यक

    अशा रीतीने फ्लावर वेस्ट रिसायकलिंग व्यवसाय (Flower waste recycling Business) सुरू केल्यामुळे वैयक्तिकरित्या हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, त्याचबरोबर हा व्यवसाय पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे सुद्धा हा चांगला व्यवसाय ठरू शकतो.

⭕ पर्स आणि बॅग बनवण्याचा व्यवसाय

⭕ जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment