व्यवसाय सुरू करायचा आहे…? तर जाणून घ्या आर्थिक पर्याय…|7 Finance options for business | व्यवसायासाठी विविध आर्थिक पर्याय | Best options for business-

व्यवसाय सुरू करायचा आहे…? तर जाणून घ्या आर्थिक पर्याय…|7 Finance options for business | व्यवसायासाठी विविध आर्थिक पर्याय –

     बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, त्या व्यवसायाबद्दलच्या सर्व कल्पना तसेच बिजनेस प्लान सुद्धा त्यांच्याकडे असतो परंतु हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल किंवा गुंतवणूक कुठून उभे करायचे हा मोठा प्रश्न नवीन उद्योजकांपुढे असतो. आजच्या लेखामध्ये आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक पर्यायांबद्दल ( Finance options for business) माहिती बघणार आहोत. 

1. पारंपारिक पद्धत – बँक कर्ज:

– व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे बिझनेस प्लॅन तयार असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच कोणती बँक किती व्याजदराने कर्ज देते याबद्दल सर्व माहिती मिळवून ज्या ठिकाणी कमी व्याजदराने कर्ज मिळते त्या बँकेकडून आपण कर्ज घेऊ शकतो.

– बँकेकडून आपल्याला कर्ज मिळण्यासाठी सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्यामध्ये जर आपण बसत असू तर आपले कर्ज मंजूर होते आणि आपण व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतो.

2. सरकारी योजना आणि अनुदाने:

– आपल्या देशामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांनी नवनवीन व्यवसाय करावे यासाठी भारत सरकार तर्फे अनेक योजना राबवल्या जात असतात तसेच अनुदान सुद्धा दिले जात असते.

– सरकारतर्फे व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य किंवा कर्ज देत असलेल्या विविध योजना आपल्या वेबसाईटवर तसेच यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहेत त्या योजना आहेत :

– प्रधान मंत्री मुद्रा योजना (PMMY)

– क्रेडिट गॅरंटी फंड योजना (CGTMSE)

– स्टँड अप इंडिया स्कीम ( Stand up India scheme)

– National small industries corporation (NSIC) subsidy schemes | राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) सबसिडी योजना

https://www.viral-talk.in/government-loan-schemes/?amp=1

– आणि इतरही

3. व्हेंचर कॅपिटल (venture capital):

– ज्या व्यवसायांचे व्यवसाय मॉडेल चांगले असेल आणि त्यांच्यामध्ये उच्च वाढ होण्याची क्षमता असेल तर त्यांच्यासाठी वेंचर कॅपिटल गेम चेंजर ठरू शकतात.

– व्हेंचर कॅपिटलिस्ट इक्विटीच्या बदल्यात गुंतवणूक करतात आणि त्यांचे स्किल्स ऑपरेशन्स वाढवण्यासाठी मौल्यवान असू शकते. 

– तंत्रज्ञान, ई-कॉमर्स आणि इतर नाविन्यपूर्ण क्षेत्रातील स्टार्ट अप साठी अनेकदा उद्यम भांडवल आकर्षक वाटते.

4. एंजल गुंतवणूकदार ( Angel Invester) :

– एंजल इन्वेस्टर म्हणजे असे श्रीमंत व्यक्ती की जे त्यांना आवडणाऱ्या किंवा जे स्टार्टअप आशादायक वाटतात अशा मध्ये त्यांचा वैयक्तिक निधी गुंतवतात.

– एंजल इन्वेस्टर भांडवल तर पुरवतातच त्यासोबतच मेंटोरशिप आणि इंडस्ट्री कनेक्शन सुद्धा उपलब्ध करून देतात.

– व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे स्टार्टर्स आर्थिक शोधात असतात त्याचबरोबर ज्यांना इतर मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता असते त्यांच्यासाठी एंजल इन्वेस्टर हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

5 . प्रायव्हेट एक्विटी ( Private Equity ) :

– प्रायव्हेट इक्विटी कंपन्या एक्सपान्शन किंवा पुनर्रचना शोधत असलेल्या परिपक्व/mature व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतात.

– ते सहसा कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण भागभांडवल घेतात आणि परफॉर्मन्स वाढविण्यासाठी मॅनेजमेंटशी जवळून काम करतात.

– हा पर्याय पहिल्यापासूनच सुरू असलेल्या व्यवसायांसाठी अधिक योग्य आहे जे त्यांचा व्यवसाय वाढवू पाहत आहेत.

6. Crowdfunding ( क्राउडफंडिंग ) :

– आजच्या डिजिटल युगामध्ये क्राउड फंडिंग ही पद्धत नॉन ट्रॅडिशनल पद्धत असली तरी सुद्धा लोकप्रिय ठरलेली आहे.

– क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर उद्योजक त्यांची बिझनेस आयडिया सादर करतात आणि त्यांच्या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी इच्छुक असलेले व्यक्ती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्यांना योगदान देतात.

7. Peer-to-Peer Lending ( पियर टू पीयर लेंडिंग ):

– पीअर-टू-पीअर (P2P) कर्ज देणारे प्लॅटफॉर्म कर्जदारांना थेट वैयक्तिक सावकारांशी जोडतात. 

– हे ऑनलाइन मॉडेल पारंपारिक बँकिंग चॅनेलला पर्याय देते, ज्यामुळे व्यवसायांना जलद मंजूरी प्रक्रियेसह व्यवसायासाठी निधी मिळू शकतो.

      असे व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सध्या प्रस्थापित असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी विविध आर्थिक पर्याय ( finance options for business) उपलब्ध आहेत परंतु आपल्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक आर्थिक पर्यायाचे फायदे तसेच थोड्याफार प्रमाणामध्ये असणारे तोटे लक्षात घेऊन मग आपल्याला जो मार्ग सोयीस्कर वाटेल तो आपण निवडू शकतो.

⭕ टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment